नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः पालकमंत्री शिंदे

पालकमंत्री राम शिंदे
पालकमंत्री राम शिंदे

नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही जनतेचीच इच्छा आहे आणि पालकमंत्री म्हणून जनतेची इच्छा पूर्ण करणे हे माझे काम आहे. जिल्हा विभाजनासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. काहीही झाले तरी नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी सांगितले. माझ्या मतदारसंघात कोणी कितीही चकरा मारल्या, तरी काही फरक पडणार नाही. मी काम केलेय, त्यामुळे मीच पुन्हा जिंकणार, असा दावा शिंदे यांनी केला. 

सोमवारी (ता.२१) जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पालकमंत्री शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना आता विषय राहिलेला नाही. आपल्या काळात आलेले अपयश झाकण्यासाठी निवडणुका जवळ आल्या की हे लोक नवीन युक्‍त्या शोधत असतात. भाजप सरकारने केंद्र व राज्यात अनेक प्रभावी कामे केली आहेत. कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. त्यामुळे लोकांनी आतापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांत पाठबळ दिले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांनी काहीही करो, फरक पडणार नाही.

मी माझ्या मतदारसंघात (कर्जत-जामखेड) विकासाचा डोंगर उभा केला आहे. अनेक प्रभावी योजना राबवल्या आहेत. त्यामुळे बाहेरून येऊन चकरा मारू लागले, ते (रोहित पवार) येथून नशीब आजमावत आहेत. प्रत्येकाला इच्छा व्यक्त करण्याचा, नशीब आजमावण्याचा अधिकार आहे. ते निवडणूक जिंकण्याची इच्छा व्यक्त करू लागले म्हणून जिंकता येत नाही. मला त्याचा काहीही फरक पडणार नाही. मीच कर्जत-जामखेडमधून जिंकणार, असा दावा शिंदे यांनी केला.

नगर लोकसभा मतदारसंघात भाजपकडे अनेक दावेदार आहेत. सध्याचे खासदार (दिलीप गांधी) यांचेही काम चांगले आहे. त्यामुळे तेच पुन्हा येथून लढतील, असे पालकमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com