रामदेव बाबाच खरे ‘लाभार्थी’ : अशोक चव्हाण

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई  : ‘आपले सरकार’ सेवा केंद्रामार्फत पतंजलीची उत्पादने विकण्यास परवानगी देणारे राज्य सरकार पतंजलीचे एजंट झाले असून, बाबा रामदेवच या सरकारचे खरे लाभार्थी आहेत. त्यामुळे सरकारने ‘मी लाभार्थी’ जाहिरातीत बाबा रामदेवांचा फोटो टाकावा, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी लगावला आहे. 

या संदर्भात बोलताना खासदार चव्हाण म्हणाले की, सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पतंजलीची उत्पादने विकण्याचा घाट सरकारने घातला आहे. यापूर्वीही राज्य सरकारने कवडीमोल दराने पतंजलीला ६०० एकर जमीन दिली आहे.

बाबा रामदेव यांनी काँग्रेस सत्तेत असताना विदेशातील काळ्या पैशाबद्दल अनेक बेछूट आरोप केले होते. विदेशी बॅंकांमध्ये भारतीयांचे २५ लाख कोटी रुपये असल्याचा जावईशोध रामदेव बाबांनी लावला होता. त्या वेळी मोदींनी त्यांची पाठराखण केली होती; परंतु भाजप सत्तेत आल्यानंतर मोदींनीच विदेशी बॅंकांमध्ये २५ लाख कोटी नसल्याचे जाहीर करून घूमजाव केले. सत्तेत येण्यासाठी बाबा रामदेवांनी भाजपची मदत केली होती, त्याची परतफेड म्हणून सरकार पतंजलीवर मेहेरबान झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com