agriculture news in Marathi, Ramvilas Paswan says, stock limit on onion extended till 31 march | Agrowon

कांद्यावरील साठवणूक मर्यादा ३१ मार्चपर्यंत : रामविलास पासवान
कोजेन्सिस वृत्तसेवा
रविवार, 24 डिसेंबर 2017

नवी दिल्ली : कांद्यावर लावण्यात आलेली साठवणूक मर्यादा ३१ मार्चपर्यंत वाढविण्याची परवानगी राज्यांना देण्यात आली आहे. राज्य सरकार ३१ मार्चपर्यंत कांद्यावरील साठवणूक मर्यादा वाढवू शकते, अशी माहिती केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी शुक्रवारी (ता. २२) ट्विटरद्वारे दिली.

देशातील कांद्याच्या साठ्याविषयी माहिती मिळण्यासाठी कांद्यावरील साठवणूक मर्यादेला ३१ डिसेंबरपासून ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे मंत्री पासवान यांनी ट्वीट केले आहे.

नवी दिल्ली : कांद्यावर लावण्यात आलेली साठवणूक मर्यादा ३१ मार्चपर्यंत वाढविण्याची परवानगी राज्यांना देण्यात आली आहे. राज्य सरकार ३१ मार्चपर्यंत कांद्यावरील साठवणूक मर्यादा वाढवू शकते, अशी माहिती केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी शुक्रवारी (ता. २२) ट्विटरद्वारे दिली.

देशातील कांद्याच्या साठ्याविषयी माहिती मिळण्यासाठी कांद्यावरील साठवणूक मर्यादेला ३१ डिसेंबरपासून ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे मंत्री पासवान यांनी ट्वीट केले आहे.

या आधी देशात व्यापाऱ्यांनी कांदा साठा तयार करून कृत्रिम तुडवडा निर्माण केल्याने दर वाढल्याच्या कारणावरून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना कांदा साठ्यावर ३१ डिसेंबरपर्यंत मर्यादा घाण्यास सांगितले होते. परंतु महाराष्ट्र आणि कर्नाटक या महत्त्वाच्या कांदा उत्पादक राज्यांनी साठा मर्यादा घातल्या नव्हत्या. 

राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन आणि विकास महामंडळाच्या आकडेवारीनुसार देशातील महत्त्वाच्या लासलगाव बाजार समितीत सध्या कांद्याचे सरासरी दर प्रतिक्विंटल २७०० रुपयांपर्यंत आहेत. आॅक्टोबर- नोव्हेंबरमध्ये कमी आवक आणि पीक नुकसानीमुळे कांद्याचे दर प्रतिक्विंटल ३२०० ते ३४०० रुपयांपर्यंत वाढले होते. 

या आधी साठा मर्यादेला ३१ आॅक्टोबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. सध्या बाजारात आवक कमीच आहे. मात्र खरिपातील नवीन कांदा बाजारात आल्यानंतर दर आणखी नियंत्रणात येतील, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे. लासलगाव बाजार समितीत मंगळवारी (ता. १९) ३ हजार ३०० टन आवक झाली होती. मागील महिन्यात याच तारखेला केवळ ८०० टन आवक झाली होती. 

कर्नाटक हे महाराष्ट्रानंतर नंबर दोनचे कांदा उत्पादक राज्य आहे. यंदा कर्नाटकमध्ये दुष्काळीस्थिती आहे. त्याचा परिणाम कांदा पिकावर होऊन उत्पादन कमी झाले आहे. सध्या येथील बाजारांमध्ये ७० टक्के कमी कांदा आवक होत आहे. परिणामी येथील दर काही प्रमाणात वाढले आहेत, अशी माहिती कर्नाटकातील कांदा व्यापाऱ्यांनी दिली.

कांदा दराची स्थिती
आक्टोबर-नोव्हेंबरमध्ये देशांतर्गत कांदा दर वाढले होते. व्यापाऱ्यांनी कांदा साठवणूक करून कृत्रिम टंचाई निर्माण केल्याने दर वाढल्यामुळे केंद्र सरकारने कांद्यावर ३१ आॅक्टोबरपर्यंत साठवणूक मर्यादा घातली. दर अपेक्षेप्रमाणे नियंत्रणात न आल्याने कांद्यावरील साठवणूक मर्यादेला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. शुक्रवारी (ता. २२) केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी साठवणूक मर्यादा ३१ मार्चपर्यंत वाढविण्याची परवानगी राज्यांना दिल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली.

इतर अॅग्रो विशेष
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
शासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर...नागपूर  : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी...
बीटी बियाणे १५ मेपूर्वी विक्रीस मनाईपुणे : राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५...
जमिनीचे जैविक पृथक्करणआजकाल शेतकऱ्यांना मातीचा पृथक्करण अहवाल करून...
सांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यातसांगली ः यंदा प्रतिकूल परिस्थतीतही जिल्ह्यातील...
काळजी घ्या : उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने विदर्भ,...
शून्यातून राऊत दांपत्याने उभारली...लातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत...
संत्रा बागेत काटेकोर पाणी व्यवस्थापन संत्रा पिकात पाणी व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवावे...
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...