मतदान केंद्रावरील रांगेपेक्षा पाण्यासाठी रांगा

मतदान केंद्रावरील रांगेपेक्षा पाण्यासाठी रांगा
मतदान केंद्रावरील रांगेपेक्षा पाण्यासाठी रांगा

सोलापूर  : सोलापूर लोकसभा मतदारसंघात सर्वत्र मताधिकार बजावण्यासाठी मतदान केंद्रावर गुरुवारी (ता. १८) मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. पण त्याच वेळी ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मात्र पाण्यासाठी रांगा अधिक लागल्याचे दिसून आले. दक्षिण सोलापुरातील कासेगाव येथे मतदान केंद्रावर प्रकर्षाने ही स्थिती जाणवली. अशा फरकाने उत्तर सोलापूर, अक्कलकोट भागांतही अनेक ठिकाणी पाण्यासाठी रांगाची स्थिती होती. 

दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील कासेगावच्या शिवारात पाण्याअभावी बागा इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहेत. जिथे पिण्याच्या पाण्यासाठी रात्रंदिवस जागल्याप्रमाणे लोक फिरत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. उत्तर सोलापुरातील रानमसले, अक्कलकोट तालुक्‍यातील कोन्हाळी, आळगे भागातही अशीच काहीशी स्थिती राहिली. 

कासेगाव ग्रामपंचायतीने सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरी अन्‌ आडाच्या पुढे जात गावाला पाणीपुरवठा योजना आणली. या योजनेच्या विहिरीचा तळ कायम उघडा पडल्याने पुढील पर्याय म्हणून पाझर तलावाच्या भरावाजवळ पंचायतीने विहिर घेतली. त्या विहिरीवरून काही वर्षे पाणी घेण्यात आले. पण पावसाच्या घटत्या प्रमाणामुळे तलाव कधी भरले नाहीत. त्यामुळे त्या विहिरीची गतही तलावात नाही, तर आडात कुठले अशी गत झाली. जवळपास डिसेंबर उजाडला, की या गावच्या ग्रामस्थांची भटकंती सुरू होते.

या पाणी समस्येवर तात्पुरती मलमपट्टी  म्हणून काही शेतकऱ्यांच्या विंधन विहिरी अधिग्रहण करून ते पाणी छोट्या-छोट्या टाक्‍यात सोडून गावकऱ्यांना देण्याचा ग्रामपंचायतीने प्रयत्न केला.

अशा वा ग्रामपंचायतीच्या विंधन विहिरीवर ग्रामस्थांना पाणी भरण्यासाठी विजेच्या वेळेनुसार दिवसा उन्हात आणि रात्रीचा दिवस करून घागर-घागर पाण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते. गुरुवारी मतदानाच्या दिवशीही हेच चित्र पाहायला मिळाले. मतदान केंद्रावर रांगाऐवजी पिण्याच्या पाण्यासाठी घागरीसह रांगा दिसल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com