agriculture news in marathi, Rapid reduction of dams in Pune district | Agrowon

पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वेगाने घट
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

पुणे : धरण क्षेत्रात झालेल्या पावसाने ऑगस्ट महिन्यात ओसंडून वाहणारी धरणे सप्टेंबरमधील पावसाची ओढ आणि ऑक्टोबर हीटमुळे वाढलेली मागणी यामुळे वेगाने रिकामी होऊ लागली आहेत. सोमवारी (ता. २९) उजनीसह जिल्ह्यातील सर्व २५ धरणांमध्ये मिळून १८५.४१ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाण्याची मागणी वाढल्याने धरणांच्या कालव्यातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे.

पुणे : धरण क्षेत्रात झालेल्या पावसाने ऑगस्ट महिन्यात ओसंडून वाहणारी धरणे सप्टेंबरमधील पावसाची ओढ आणि ऑक्टोबर हीटमुळे वाढलेली मागणी यामुळे वेगाने रिकामी होऊ लागली आहेत. सोमवारी (ता. २९) उजनीसह जिल्ह्यातील सर्व २५ धरणांमध्ये मिळून १८५.४१ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाण्याची मागणी वाढल्याने धरणांच्या कालव्यातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे.

उजनीसह जिल्ह्यातील सर्व २५ धरणांची उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता २१६.८४ टीएमसी आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात (ता. ८) सर्व धरणांमध्ये २०१.१३ टीएमसी (९३ टक्के) पाणीसाठा होता. मात्र, त्यानंतरच्या दोन महिन्यांच्या आतच धरणांच्या पाणीसाठ्यात तब्बल १६ टीएमसीची घट झाल्याचे दिसून येत आहे. उजनी धरणातील अचल (६३.६५ टीएमसी) आणि उपयुक्त (४६.९७ टीएमसी) पाणीसाठ्याचा विचार करता धरणामध्ये एकूण ११०.६२ टीएमसी (९४ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.

खडकवासला कालव्याला भिंत फुटल्यानंतर कालव्यातून बंद करण्यात आलेला पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाला आहे. कालव्यातून ७०२ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. पिंपळगाव जोगे, येडगाव, डिंभे, घोड, खडकवासला, वीर या धरणांच्या कालव्यातून पाणी सोडण्यात येत आहे. तर माणिकडोह, आंद्रा, पवना, टेमघर, उजनी धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाणीसाठा वेगाने कमी होत असल्याने उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे.

सोमवारी (ता. २९) जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये) कंसात टक्केवारी : टेमघर ०.५२ (१४), वरसगाव १२.७४(९९), पानशेत १०.०४ (९४), खडकवासला १.२८ (६५), पवना ७.५८ (८९), कासारसाई ०.५० (८९), मुळशी १५.८४ (८६), कलमोडी १.५१ (१००), चासकमान ६.२९ (८४), भामा आसखेड ७.५० (९८), आंद्रा २.८५ (९७), वडिवळे १.०२ (९५), गुंजवणी ३.०८ (८३), भाटघर २३.४० (९९), नीरा देवघर ११.५० (९८), वीर ५.३७ (५७), नाझरे ०.०, माणिकडोह ७.३६ (६३), पिंपळगाव जोगे २.४१ (६२), येडगाव १.८५ (६६), वडज ०. ७७ (६६), डिंभे ११.०४ (८८), घोड ४.०३ (७४).

 

इतर बातम्या
दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नांदेड...
कृषी क्षेत्रातील उत्पन्नाची तफावत दूर...औरंगाबाद : गेल्या कित्येक वर्षांतील परिवर्तनात...
मोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...
पालखेडमधून आज आवर्तन सोडण्याची तयारीनाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून येत्या दोन...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
पॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे   : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आता कोठे धावे मन । तुझे चरण देखलिया...पंढरपूर, सोलापूर (प्रतिनिधी) :  आता कोठे...
दूध अनुदान योजनेस ३१ जानेवारीपर्यंत...पुणे : राज्यात उत्पादित होणाऱ्या (पिशवी बंद...
दुष्काळग्रस्तांना सरसकट हेक्टरी ५० हजार...मुंबई : राज्यात यंदा १९७२ पेक्षाही भयंकर...
तमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...