agriculture news in marathi, rashtrawadi congress party published manifesto, mumbai, maharashtra | Agrowon

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती : 'राष्ट्रवादी'चा जाहिरनामा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 मार्च 2019

मुंबई ः शेतीच्या शाश्वत सुधारणेला गती देण्यासाठी शेती क्षेत्रात संरचनात्मक सुधारणा घडवून आणतानाच सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देऊ, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात केली आहे. पक्षाच्या वतीने सोमवारी (ता. २५) हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. 

मुंबई ः शेतीच्या शाश्वत सुधारणेला गती देण्यासाठी शेती क्षेत्रात संरचनात्मक सुधारणा घडवून आणतानाच सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देऊ, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात केली आहे. पक्षाच्या वतीने सोमवारी (ता. २५) हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. 

जाहीरनाम्यात देशातील शेती क्षेत्राच्या सध्याच्या दयनीय स्थितीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. जाहीरनाम्यात पुढे म्हटले आहे, की आज देशाची शेती व्यवस्था मोठ्या संकटातून जात आहे. भाजपने दिलेले ‘अच्छे दिन’चे आश्वासन केव्हाच हवेत विरून गेले आहे. प्रत्यक्षात फक्त शब्दांच्या बुडबुड्यावर शेतकऱ्यांची बोळवण केली जाते. सध्याच्या केंद्र सरकारच्या कारकिर्दीच्या पहिल्या चार वर्षांमध्ये कृषी क्षेत्राच्या सरासरी वार्षिक जीडीपीतील वाढ फक्त अडीच टक्के आहे. वाढीचा हा दर यूपीए सरकारच्या शेवटच्या चार वर्षांमध्ये ५.२ टक्के इतका होता.  

कर्जबाजारीपणा, आत्महत्यांचे वाढते प्रमाण आणि शेतीमालाला पुरेशी किंमत मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर संकटांची कुऱ्हाड कोसळली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कृषी क्षेत्र विकासाकडे, उत्पादकता, उत्पन्न आणि बाजारपेठेची उपलब्धता वाढविण्याकडे पुरेसे लक्ष देत राहील. शेतीच्या शाश्वत सुधारणेला गती देण्यासाठी आम्ही संरचनात्मक सुधारणा घडवून आणू, असे सांगतानाच आम्ही सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देऊ, अशी घोषणा राष्ट्रवादीने जाहीरनाम्यात केली आहे. 

हातमाग आणि यंत्रमाग उद्योग खूप मोठ्या लोकसंख्येला रोजगार पुरवितो, मात्र सध्या हे उद्योगक्षेत्र स्वतःच संकटात आहे. या क्षेत्रातील संधींना पाठबळ देण्यासाठी या क्षेत्रांकडे विशेष लक्ष पुरवण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.  मोदी सरकारच्या नोटाबंदीमुळे देशाच्या आर्थिक विकासाची गती मोठ्या प्रमाणात मंदावली आहे. या निर्णयाचा जीडीपीवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे देशातील नागरिकांच्या सुमारे पावणेदोन कोटी नोकऱ्या गेल्या आहेत. या विषयावर श्वेतपत्रिका जाहीर करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीने जाहीरनाम्यात म्हटले आहे. कररचना अधिक तर्कसुसंगत आणि सुटसुटीत करू तसेच वस्तू व सेवाकरातील (जीएसटी) विपरीत बाबी दूर करू असेही राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात म्हटले आहे. 

इतर अॅग्रो विशेष
हमीभाव वाढीचा बागुलबुवा आणि वास्तवलोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांच्या...
‘कॅप्सूल’ सुधारणार मातीचे आरोग्यमहाराष्ट्र राज्यासाठी या वर्षी रासायनिक खतांची...
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
शासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर...नागपूर  : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी...
बीटी बियाणे १५ मेपूर्वी विक्रीस मनाईपुणे : राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५...
जमिनीचे जैविक पृथक्करणआजकाल शेतकऱ्यांना मातीचा पृथक्करण अहवाल करून...
सांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यातसांगली ः यंदा प्रतिकूल परिस्थतीतही जिल्ह्यातील...
काळजी घ्या : उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने विदर्भ,...
शून्यातून राऊत दांपत्याने उभारली...लातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत...
संत्रा बागेत काटेकोर पाणी व्यवस्थापन संत्रा पिकात पाणी व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवावे...
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...