विदर्भात राष्ट्रवादीला जादा जागा मिळण्यासाठी आग्रही : जयंत पाटील

जयंत पाटील
जयंत पाटील

नागपूर   ः आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी दोन्ही काँग्रेसने आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसला जादा जागा मिळाव्यात याकरिता आम्ही आग्रही राहणार आहोत, असे असले तरी संख्येसाठी वाद निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाईल. त्यासाठी जागावाटपाची चर्चा बंदद्वार व्हावी, असे प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केले जातील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

श्री. पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग, आमदार प्रकाश गजभिये उपस्थित होते.  श्री. पाटील म्हणाले, की आगामी निवडणुकीत काँग्रेससह सर्व समविचारी पक्ष व घटकांना आघाडीत सामावून घेण्यात येणार आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यात आघाडीसंदर्भात दोन वेळा चर्चा झाली. मात्र, जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही.

२००९ मधील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला ६२ पैकी विदर्भात १४ जागा देण्यात आल्या होत्या. त्यात आणखी वाढ व्हावी, असे आमचे प्रयत्न राहणार आहेत. सांगलीतील पराभवाने आम्ही बरेच काही शिकलो. बंडखोरांचा मोठा फटका आम्हाला बसला. आता विधानसभेत आघाडी करताना उभय पक्षांच्या नेत्यांसोबत बंडखोरीच्या मुद्यावर चर्चा केली जाईल, असे श्री. पाटील यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com