नगर जिल्हा विभाजन राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य

नगर जिल्हा विभाजन राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य
नगर जिल्हा विभाजन राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य

नगर ः नगर जिल्ह्याच्या विभाजनाच्या चर्चेला वरचेवर वेग आहे. जिल्हा विभाजन होण्याला नागरिकांचीही पसंती आहे. मात्र त्याकडे राजकारण म्हणूनही पाहिले जात आहे. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसने ‘निर्णय मान्य असेल’ असे सांगून अप्रत्यक्षपणे जिल्हा आणि तालुका विभाजनाला सकारात्मकता दार्शवल्याने नगर जिल्ह्यामध्ये अनेक राजकीयांच्या भुवया उंचावल्या आहेत.   नगर जिल्ह्याचे विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या आधी विभाजन करणार असल्याचे काही दिवसांपूर्वी वक्तव्य केल्याने राजकीय, सामाजिकांसह लोकांच्या भुवया उंचावल्या. त्यानंतर काही दिवसांत नगरला आलेल्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही ‘नगरसह राज्यातील अन्य जिल्ह्यांचे व तालुक्‍यांचे विभाजन करण्याला सकारात्मकता दर्शवली होती. ‘‘जिल्हा विभाजनासंबंधीचा अहवाल आला आहे, अहवाल पाहून जिल्हा आणि आवश्‍यक तेथे तालुका विभाजनाबाबत लोकभावनेवर निर्णय घेणार आहे’’ असे स्पष्टपणे सांगून टाकल्याने जिल्हा विभाजन होणार हे नक्की झाल्याचे लोकांत बोलले जात आहे. त्यात आज (रविवारी) पत्रकारांशी संवाद साधताना ‘‘जिल्हा आणि तालुके विभाजनाचा निर्णय राष्ट्रवादीला मान्य असेल’ असे स्पष्टपणे सांगून टाकल्याने राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.  नगर जिल्ह्याच्या विभाजनाचा विषय तसा अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. जिल्हा विभाजन झाले तर राजूर (अकोले), तीसगाव (पाथर्डी), बोधेगाव (शेवगाव), देवळाली प्रवरा (राहुरी) निघोज (पारनेर), सोनई (नेवासा) ही प्रमुख बाजारपेठांच्या गावांना तालुक्‍याचा दर्जा मिळावा ही मागणी आहे. जिल्हा विभाजनाला जिल्ह्यामधील बहुतांश भागांतील लोकांचा पाठिंबा असला तरी राजकीय इच्छाशक्ती नसल्याचे सातत्याने जाणवले आहे. पालकमंत्री राम शिंदे यांनी जिल्हा विभाजनावर केलेल्या भाष्यानंतर विधानसभेतील विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिंदे यांच्या वक्‍त्यव्याची खिल्ली उडवली.  जिल्ह्याच्या दक्षिणेत बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील, मधुकर पिचड, यशवंतराव गडाख या मातब्बर नेत्याचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांचा भागही उत्तरेशीच निगडित असल्यासारखे आहे. दक्षिणेच्या तुलनेत उत्तरेतील शेती, सहकारही अधिक बळकट आहे. सिंचनाचे क्षेत्र जास्त असल्याने प्रगत भाग आहे. जिल्ह्यामधील दुष्काळी तालुके दक्षिणेत आहेत. पालकमंत्री राम शिंदे व माजी मंत्री बबनराव पाचपुते हे दोन प्रमुख नेते दक्षिणेतील असले, तरी उत्तरेच्या तुलनेत दक्षिण जिल्ह्यांमध्ये विकास झालेला नाही. त्यामुळे जिल्हा विभाजन झाले तर दक्षिणेला न्याय मिळेल, असे लोकांना वाटत आहे. मात्र जिल्हा विभाजनाचा विषय राजकीय सबंधाशी जोडला जात आहे. जिल्हा विभाजन ही भाजपची खेळी असल्याचे काही राजकीय मंडळी उघडपणे बोलत असताना, राष्ट्रवादीने मात्र जिल्हा आणि तालुका विभाजनाचा निर्णय मान्य असल्याचे सांगून टाकल्याने अनेक राजकीयांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

अजून अनेकांच्या भूमिका अस्पष्ट  नगर जिल्ह्याचे विभाजन होणार, मात्र मुख्यालय कोठे असेल हे स्पष्ट नाही. जिल्हा विभाजन करावे ही लोकांची मागणी असल्याचे लपून राहिलेले नाही. पालकमंत्र्याच्या वक्‍तव्यानंतर राधाकृष्ण विखे यांचे एक आणि आज राष्ट्रवादीने स्पष्ट केलेली भूमिका वगळता अजून अन्य राजकीय नेत्यांनी भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे जिल्हा विभाजनाबाबत कोणत्या नेत्यांची काय भूमिका आहे याकडेही लोकांचे लक्ष लागले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com