agriculture news in Marathi, rashtrawadi will fight for support of swabhimani, Maharashtra | Agrowon

स्वाभिमानीसोबत दिलजमाईसाठी बुलडाण्यात राष्ट्रवादीची कसरत !
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 मार्च 2019

बुलडाणा ः लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने बुलडाणा मतदारसंघाची जागा डॉ. राजेंद्र शिंगणे यांना सोडली. या घोषणेने बुलडाणा लोकसभा मतदारसंघ महाअाघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळेल, या चर्चांना पूर्णविराम मिळाला. येथपर्यंत राष्ट्रवादीसाठी सर्व काही सुरळीत झाले. मात्र अाता खरी कसोटी अाहे ती स्वाभिमानीचे मतदान कसे मिळवता येईल याचीच. 

बुलडाणा ः लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने बुलडाणा मतदारसंघाची जागा डॉ. राजेंद्र शिंगणे यांना सोडली. या घोषणेने बुलडाणा लोकसभा मतदारसंघ महाअाघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळेल, या चर्चांना पूर्णविराम मिळाला. येथपर्यंत राष्ट्रवादीसाठी सर्व काही सुरळीत झाले. मात्र अाता खरी कसोटी अाहे ती स्वाभिमानीचे मतदान कसे मिळवता येईल याचीच. 

स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी या मतदारसंघात गावागावात नेटवर्क उभे केले अाहे, हे सर्वच जाणतात. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लढा देत न्याय मिळवून देण्यासाठी ही संघटना अोळखली जात होती. लोकसभेसाठी स्वाभिमानीचे सर्वेसर्वा खासदार राजू शेट्टी यांनी रविकांत तुपकर हे येथे लढतील हे सांगत महाअाघाडीकडे बुलडाण्याची जागा प्रतिष्ठेची केली होती.

वाटाघाटीत शेवटच्या क्षणी स्वाभिमानीचा बुलडाण्यावरील दावा धुडकावण्यात अाला. यामुळे तुपकरांचे येथून उभे राहण्याचे स्वप्न अपूर्ण राहले. अाता महाअाघाडीत बुलडाण्याची जागा न मिळाल्याने या जिल्ह्यातील कार्यकर्ते किती प्रमाणात राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. शिंगणे यांचे काम करतात हे येत्या मे महिन्यात जाहीर होणाऱ्या निकालातून समोर येईल.

वास्तविक या वेळी बुलडाण्यात विद्यमान खासदारांना जोरदार टक्कर देणारी लढत होईल, अशी शक्यता होती. परंतु युती झाल्याने शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांचे काम बरेच सुकर झाले. त्यातच ही जागा स्वाभिमानीला न मिळणेही त्यांच्या पथ्यावर पडले. त्यांच्यापेक्षा महाअाघाडीच्या उमेदवारालाच अधिक कसरत करावी लागत अाहे. रविकांत तुपकर यांना २०१४ च्या निवडणुकीत थांबविण्यात अाले होते.

अाता दुसऱ्यांदा त्यांच्यावर तशीच वेळ अाली अाहे. महाअाघाडीचा उमेदवार घोषित झाल्यापासून संपूर्ण जिल्ह्यात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झालेल्या अाहेत. त्यामुळेच पुढील भूमिकेवर सर्व गणिते अवलंबून असल्याच्या चर्चा सुरू होत अाहेत.

महाअाघाडीने जागा दिली नसली तरी, स्वतंत्र लढा असा अाग्रह स्वाभिमानीचे कार्यकर्ते तुपकरांजवळ करीत अाहेत. परंतु ‘अापण संघटनेला, खासदार राजू शेट्टी यांच्या शब्दाला जागणारे अाहोत. कुठल्याही पदापेक्षा, विचार व नेतृत्व देईल तो अादेश पाळणे महत्त्वाचे असल्याचे तुपकर कार्यकर्त्यांना सांगत अाहेत.’ 

तुपकरांची गोची कार्यकर्त्यांना माहिती अाहे. त्यामुळे ते सांगतील त्याचे काम कार्यकर्ते करतीलच याबाबत शाश्वती देता येत नाही. तिकीट न दिल्याने स्वाभिमानीतील अनेकांच्या मनात महाअाघाडीच्या नेत्यांबाबत रोष अाहे. दरम्यान रविवारी (ता. १७) अाघाडीचे उमेदवार डॉ. शिंगणे यांनी तुपकरांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोघांमध्ये दोन ते अडीच तास चर्चा झाली. यावरूनही अाघाडीला तुपकरांच्या भूमिकेचे महत्त्व किती अाहे, हे अधोरेखित झाले.

इतर ताज्या घडामोडी
कृषी भूसुक्ष्मजीवशास्त्रातील तथ्येमागील भागामध्ये उल्लेख आलेल्या डॉ. रंगास्वामी...
योग्य वेळी करा कडधान्य पेरणीमूग, उडीद :     मध्यम ते...
नियोजन चारा पिकांचे...सकस चाराउत्पादन केल्यास जास्तीत जास्त पोषणमूल्ये...
संत्रा, मोसंबी उत्पादकांना हेक्टरी एक...अमरावती : जिल्ह्यातील तापमान, पाणीटंचाई आणि...
विखे, क्षीरसागरांना मंत्रीपदे देऊन...नाशिक : ‘‘घटना माहीत असूनही त्याविरोधात निर्णय...
पाऊसकाळातही मराठवाडा टॅंकरग्रस्त औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ५७ लाख...
रत्नागिरी : बळिराजाला आता आर्द्रा...रत्नागिरी :  मृग नक्षत्रात पावसाने पाठ...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील ८४...लातूर  : मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर...
सांगलीसह पश्‍चिमेकडे पाऊस सांगली : दोन दिवसांपासून पावसाने पश्‍चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
सोलापूर झेडपी सदस्यांची दुष्काळापेक्षा...सोलापूर : दुष्काळाच्या दाहकतेत जिल्हा पुरता...
नाशिकमध्ये वांगी ३००० ते ६००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात होणार...पुणे : दरवर्षी शेती कामांसाठी मजुरांची चांगलीच...
बांबू उत्पादनवाढीसाठी पुणे जिल्ह्यातील...पुणे  ः बांबू उत्पादनवाढीसाठी भोर, वेल्हा...
नगर जिल्ह्यातील ६३६ वैयक्तिक पाणी योजना...नगर  ः जिल्ह्यात यंदा दुष्काळाचा सर्वाधिक...
पाच जिल्ह्यांतील ६६८ छावण्यांमध्ये चार...औरंगाबाद  : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत...
पीकविमा अर्ज करण्यासाठी तालुका कृषी...मुंबई ः पीकविम्याबाबतच्या तक्रारी लक्षात...
‘लोकमंगल’प्रकरणी विधान परिषदेत गोंधळमुंबई : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा...
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना लेखी,...मुंबई ः राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील...
दोषी कंपनीलाच शासनाचे १५ कोटींचे...मुंबई : केंद्र सरकारच्या ‘आयएलएफएस’ या...