agriculture news in marathi, rasin rate should be increase | Agrowon

बेदाणा दरात वाढ होण्याची शक्यता
टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

सांगली : फळ छाटणी दरम्यान झालेल्या पावसामुळे द्राक्ष बागांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे बेदाणा उत्पादनात सुमारे २५ टक्के घट होण्याची शक्‍यता बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. बेदाण्याचे उत्पादन घटणार असले तरी बेदाण्याचे दरात वाढ होईल, असा अंदाज व्यक्त होतो आहे.

सांगली : फळ छाटणी दरम्यान झालेल्या पावसामुळे द्राक्ष बागांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे बेदाणा उत्पादनात सुमारे २५ टक्के घट होण्याची शक्‍यता बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. बेदाण्याचे उत्पादन घटणार असले तरी बेदाण्याचे दरात वाढ होईल, असा अंदाज व्यक्त होतो आहे.

सांगली जिल्ह्यात बेदाणा हंगाम सुरू झाला आहे. बेदाणा निर्मितीस मार्चच्या पहिल्या आठवड्यात गती येईल. सध्या बाजारात नवीन बेदाण्याची आवक कमी अधिक प्रमाणात असली तरी गेल्यावर्षी शिल्लक असलेल्या बेदाण्याचे सौदे सुरू आहेत. बेदाण्याला प्रति किलोस १०० ते १६० रुपये असा दर मिळू लागला आहे. गेल्या महिन्यापेक्षा चालू महिन्यात बेदाण्याच्या दरात १५ ते २० रुपयांनी वाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

द्राक्ष हंगाम सुरू होताना अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकरी हतबल झाला. मात्र, त्यातूनही पुन्हा फळ छाटणी शेतकऱ्यांनी घेतली. मात्र, बेदाणा निर्मितीपासून ते विक्रीपर्यंतच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी द्राक्षांची विक्री केली आहे. या दोन कारणांमुळे बेदाणा उत्पादनात घट होण्याची शक्‍यता आहे.

उत्तर प्रदेशातून बेदाण्याला मागणी...
गेल्यावर्षी द्राक्ष हंगामात चांगला गेला. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे नुकसान केले नाही. तसेच द्राक्षाला चांगले दर असल्याने द्राक्षाची विक्री केली. त्यामुळे बेदाणा उत्पादन १० टक्‍क्‍यांनी घटले होते. मात्र, बेदाण्याला अपेक्षित दर नसल्याने शेतकरी चिंतेत होता. यंदा नवीन बेदाणा कमी अधिक प्रमाणात बाजारात दाखल होतो आहे. त्यात होळीचा उत्सवाला उत्तर प्रदेशमध्ये बेदाण्याला मागणी अधिक असते. यामुळे बेदाण्याच्या दरात वाढ झाली आहे. यंदाच्या हंगामात बेदाण्याचे उत्पादन कमी होण्याची शक्‍यता असल्याने दर वाढण्याची शक्‍यता आहे.

इतर ताज्या घडामोडी
मत्स्यपालनामध्ये योग्य तांत्रिक बदलांची...सध्याच्या मत्स्यपालन पद्धतीमध्ये कोणतेही बदल न...
जळगाव बुरशीयुक्त शेवयांच्या प्रकरणात...जळगाव ः शालेय पोषण आहार वाटपानंतर अंगणवाडीमधील...
सातगाव पठार परिसरात बटाटा लागवडीस सुरवातसातगाव पठार, जि. पुणे : काही गावांमध्ये पावसाने...
सोलापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह...सांगोला/करमाळा : जिल्ह्याच्या काही भागांत...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात...पुणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी...
मातीचा प्रत्येक कण सोन्यासारखा; तो वाया...नाशिक : शेतातील माती म्हणजे कोट्यवधी सूक्ष्म...
नांदेड जिल्ह्यात १ लाख ६५ हेक्टरवर पेरणीनांदेड ः नांदेड जिल्ह्यामध्ये यंदाच्या खरीप...
शेतकऱ्यांना पीककर्ज देणे टाळले तर ठेवी...नगर  ः शेतकऱ्यांना सध्या खरीप हंगामासाठी...
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायमसातारा  ः जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, माण,...
नांदेड जिल्ह्यात फक्त ८.२९ टक्के...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील यंदा खरीप पीककर्ज...
तापीच्या पाण्यास गुजरातचा नकारमुंबई  ः पार-तापी नर्मदा नद्याजोड...
कापूस पीक नियोजनातून हमखास उत्पादन वाढसोनगीर, जि. धुळे ः कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी...
औरंगाबाद जिल्ह्यात अखेर पाऊस बरसलाऔरंगाबाद  : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या...
`दमणगंगा नदीजोड योजनेचे फेरसर्व्हेक्षण...नाशिक : दमणगंगा (एकदरे) नदीजोड योजनेचे...
मराठवाड्यात साडेतीन लाख हेक्‍टरवर पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ३ लाख ६७...
पीककर्जासाठी बँक अधिकाऱ्याने केली...दाताळा, जि. बुलडाणा : पीककर्ज मंजूर करून...
माॅन्सून सक्रिय, सर्वत्र चांगल्या...महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी झालेले असून १००४...
‘एसआरआय’पद्धतीने भात लागवडीचे तंत्रएसआरआय पद्धतीने भात लागवड केल्यामुळे रोपे, माती,...
भूमिगत निचरा प्रणालीद्वारे जमिनींची...पाणी व रासायनिक खते यांच्या अनियंत्रित वापरामुळे...
लागवड सावा पिकाची...जून महिन्यात सावा पिकाची पेरणी करावी. दोन ओळीतील...