agriculture news in Marathi, rate decrease of capsicum, Maharashtra | Agrowon

ढोबळी मिरचीने आणले डोळ्यांत पाणी
अभिजित डाके
शनिवार, 28 एप्रिल 2018

गेल्या चार दिवसांपूर्वी ढोबळी मिरचीची जागेवर ६ ते ८ रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली. मार्केटमध्ये नेऊन सौद्यास लावली तर १० ते १२ रुपये दर मिळतोय. पण वाहतूक धरली तर काहीच परवडत नाही.
- प्रमोद गावडे, देवराष्ट्रे, ता. कडेगाव, जि. सांगली

सांगली ः पाण्याची टंचाई, त्यातच शेतीपंपाची होणारी खंडित वीज, त्यावर मात करून ढोबळी मिरचीची लागवड केलीय, पण ढोबळी मिरचीचे दर कमी झालेत. मुंबईच्या मार्केटमध्ये मिरचीला एका किलोस गेल्या तीन वर्षांतील नीचांकी ६ ते ७ रुपये दर आहेत. दर परवडत नसल्याने मिरचीचा तोडा थांबवलाय, घातलेला खर्चही निघेना झालाय. मिरचीला दर नसल्याने हतबल झालेले कवठेपिरान (ता. मिरज) येथील शेतकरी हतबल होऊन आपली व्यथा सांगत होते. 

सांगली जिल्ह्यातील मिरज पश्‍चिम भागातील कठवेपिरान, समडोळी, दूधगाव या गावांसह अन्य भागातही मोठ्या प्रमाणात ढोबळी मिरचीची लागवड केली जाते. या परिसरातून सुमारे ७० ते ८० टन ढोबळी मिरची मुंबई आणि पुढे मार्केटमध्ये जाते. मिरचीला दर चांगला मिळत असल्याने जिल्ह्यातील ढोबळी मिरचीच्या क्षेत्रातही वाढ झाली होती. मात्र, गेल्या वर्षापासून पाणीटंचाई आणि मिरचीला मिळणारा दर यामुळे क्षेत्रात कमालीची घट झाली असल्याचे चित्र आहे. 

‘‘एक एकर ढोबळी मिरची लागवडीपासून ते पहिला तोडा होईपर्यंतचा सुमारे दीड ते दोन लाख खर्च येतोय. त्यानंतरची मजुरी, कीटकनाशक, एक दिवसाला एक लाख खर्च येतो. यामुळे एक पीक घेण्यासाठी सुमारे पाच ते सहा लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो. यंदा गेल्या वर्षीपेक्षा निम्म्याने दर कमी झालेत, त्यामुळे घातलेला खर्चही मिळणे मुश्‍कील झाले आहे,’’ असे सुहास कुलकर्णी सांगत होते.

जयंत शिरतोडे देवराष्ट्रे (ता. कडेगाव) म्हणाले की, मार्केटमध्ये ढोबळी मिरचीची आवक मोठ्या प्रमामात होते आहे, यामुळे दर कमी आहेत, असे व्यापारी सांगत आहेत. मात्र, मार्केटमध्ये गेल्यानंतर वस्तुस्थिती वेगळी पहायला मिळते आहे. मुळातच व्यापाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे मिरचीचे दर कमी झाले आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे. 

प्रतिक्रिया
मी गेली आठ वर्षांपासून ढोबळी मिरचीचे पीक घेतोय. गेल्या तीन वर्षांपासून ढोबळी मिरचीचे दर खालीच येत आहेत. आजमितीस ढोबळी मिरचीस ६ ते ७ रुपये प्रतिकिलो असा दर मिळतोय, यातून घातलेला खर्च मिळणे मुश्‍कील झाले आहे.
- सुहास कुलकर्णी, कवठेपिरान, ता. मिरज, सांगली

 

इतर अॅग्रो विशेष
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...
बॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील...विशाखापट्टण व त्यानंतर हैद्रराबाद येथे खासगी...
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
दरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...