agriculture news in marathi, rate of ginger become stable, satara, maharashtra | Agrowon

आले पिकाचे दर स्थिर
टीम अॅग्रोवन
बुधवार, 9 जानेवारी 2019

सातारा   ः गेल्या तीन ते चार महिन्यांपासून आले पिकाचे दर स्थिर आहेत. राज्यातील प्रमुख बाजारपेठेत आल्यास २५ ते २६ हजार रुपये प्रतिगाडी (५०० किलो) याप्रमाणे दर मिळत आहे. दरात अपेक्षित वाढ होत नसल्याने शेतकऱ्यांनी आले काढणी कमी केली आहे. 

सातारा   ः गेल्या तीन ते चार महिन्यांपासून आले पिकाचे दर स्थिर आहेत. राज्यातील प्रमुख बाजारपेठेत आल्यास २५ ते २६ हजार रुपये प्रतिगाडी (५०० किलो) याप्रमाणे दर मिळत आहे. दरात अपेक्षित वाढ होत नसल्याने शेतकऱ्यांनी आले काढणी कमी केली आहे. 

सातारा जिल्ह्यासह औरंगाबाद जिल्ह्यात आले पिकाचे मोठे क्षेत्र आहे. सातारा जिल्ह्यात आले पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र दोन हजार हेक्‍टर असून या दरम्यान लागवड झाली असल्याचा अंदाज आहे. जुलै, आॅगस्ट महिन्यांत या पिकावर कंदकुजचा प्रादुर्भाव वाढला होता. हा रोग नियंत्रणात येत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आले काढून विक्री केली. या वेळी प्रतिगाडीस २५ हजार रुपयांदरम्यान दर मिळाला होता. त्यापासून आजपर्यंत हेच दर स्थिर राहिले होते.

केरळ राज्यात आलेला पूर आणि मराठवाड्यात पडलेला दुष्काळ यांमुळे आल्याच्या उत्पादनात मोठी घट झाली असल्याने मार्च - एप्रिल दरम्यान दरात वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, सध्या तरी तशी परिस्थिती दिसत नाही. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून दर स्थिर राहिले आहेत. सध्या आले पिकाचा पाला पडण्याची अवस्था सुरू आहे. दर वाढत नसल्याने मार्च माहिन्यातच आले काढणी केली जाईल असे बोलले जात आहे. सध्या सातारी आल्यास प्रतिगाडीस २५ ते २६ हजार तर बेंगलोरी आल्यास २६ ते २७ हजार रुपयेप्रमाणे दर व्यापाऱ्यांकडून दिला जात आहे.

इतर बाजारभाव बातम्या
जळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (...
जळगावात गव्हाची आवक रखडत; दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक टिकून;...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
विदर्भात कापूस पोचला प्रतिक्विंटल ५९१५...नागपूर ः शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यापनंतर आता...
पुणे बाजारात घेवडा, मटारच्या भावात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादला कैरी प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
लाल कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव : लाल कांद्याची जळगावसह धुळे, साक्री येथील...
परभणीत शेवगा प्रतिक्विंटल ३००० ते ३५००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात टॉमेटो २०० ते २७५० रुपये...अकोल्यात प्रतिक्विंटल २००० ते २७५० रुपये अकोला ः...
नाशिकमध्ये वांगे प्रतिक्विंटल २००० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
अकोल्यात हरभरा प्रतिक्विंटल ३५०० ते...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन...
औरंगाबादेत द्राक्षाच्या आवकेत चढ-उतार;...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात केळीची आवक वाढली, दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात केळीची आवक वाढली असून, नवती...
नगरमध्ये चिंच प्रतिक्विंटल ७००० ते...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
गुलटेकडी बाजारात भाजीपाल्याची आवक कमी;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत काकडीला प्रतिक्विंटल १५०० ते...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ३५०० ते...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात वांगी ३०० ते ५००० रुपये...पुण्यात १०० ते २५० रुपये प्रतिदहा किलो ...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते १३१००...सांगली ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीची...
अकोल्यात तूर सरासरी ५००० रुपये...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...