agriculture news in Marathi, rate of jaggery will increased this year, Maharashtra | Agrowon

कोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणार
राजकुमार चौगुले
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

गेल्या वर्षी बाजारपेठांमध्ये बाहेरचा गूळ येऊनही कोल्हपुरी गुळाला मागणी वाढली. ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगली बाब आहे. शेतकऱ्यांनी बाजारपेठेच्या मागणीनुसार अधिकाधिक चांगला गूळ केल्यास यंदा गेल्या वर्षीपेक्षा गुळाला चांगला दर मिळेल हे निश्‍चित आहे. 
- निमेष वेद, गूळ व्यापारी, कोल्हापूर
 

कोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात, राजस्थानच्या बाजारात कोल्हापुरी गुळाला मागणी राहिल्याने दोन्ही राज्यांतील कोल्हापुरी गुळाचा स्टॉक संपला आहे. यामुळे यंदाच्या हंगामात गुळाला चांगले दर मिळण्याची शक्‍यता आहे. सातत्याने दर घसरणीचा सामना करावा लागणाऱ्या गूळ उत्पादकांच्या दृष्टीने यंदाचा हंगाम नक्कीच गोड जाईल, अशी शक्‍यता गूळ उद्योगातून व्यक्त होत आहे. 

कोल्हापुरी गुळाचे मार्केट मुख्यत्वे  करून गुजरात व राजस्थान आहे. हंगामात सुमारे पंचवीस लाख गूळ रव्यांचे उत्पादन होते. गेल्या वर्षी उत्तर प्रदेशात कारखाने सुरू होण्यास विलंब झाल्याने तेथे गुळाचे  उत्पादन वाढले. महाराष्ट्रातील गुळाच्या वाहतुकीपेक्षा गुजरात, राजस्थानला उत्तर प्रदेशातून कमी खर्चात गूळ उपलब्ध होत असल्याने कोल्हापुरी गुळासाठी ही चिंतेची बाब ठरली होती. उत्तर प्रदेशचा गूळ आल्याने तेथील व्यापाऱ्यांनी तिकडून गूळ घेऊनच शीतगृहात ठेवला होता.

यामुळे गेल्या वर्षी कोल्हापुरी गुळाला मागणी कमी राहिली. यातच कर्नाटकी गूळही त्यांना स्वस्त मिळत असल्याने प्रतिकूल परिणाम कोल्हापुरी गुळावर झाला. परंतु सरत्या पावसाळ्यात मात्र ग्राहकांकडून कोल्हापुरी गुळालाच जास्त मागणी राहिल्याने व्यापाऱ्यांनी हा गूळ विकण्यास प्रारंभ केला. यामुळे ज्या व्यपाऱ्यांनी कोल्हापूर भागातून गूळ खरेदी करून ठेवला होता. त्यांचा गूळ लवकर विकला गेला. कोल्हापुरी गुळापेक्षा कर्नाटकी, उत्तर प्रदेशचा गूळ क्विंटलला एक हजार रुपये गूळ स्वस्त असूनही ग्राहकांनी कोल्हापुरी गुळाला पसंती दिली. याचा सकारात्मक परिणाम यंदाच्या गूळ हंगामावर होणार आहे. याला व्यापारी सूत्रांनीही दुजोरा दिला आहे. 

दरवाढीची शक्‍यता
सध्या कोल्हापूर जिल्ह्यात उसासाठी संमिश्र हवामान आहे. सलग तीन महिने पाऊस राहिल्याने उसाचे मोठे नुकसान    झाले आहे, याचप्रमाणे हुमणी व अन्य    कीड रोगांमुळे उसाचे एकरी टनेज   घटण्याची शक्‍यता आहे. परिणामी गूळनिर्मितीही धीम्या गतीनेच होइल अशी शक्‍यता आहे. गुळाचे कमी उत्पादन व बाहेरच्या बाजारात मागणीची शक्‍यता गृहीत धरून यंदा दर चांगले रहातील, असा अंदाज आहे. 

प्रतिक्रिया
सध्या यंदाचा गूळ हंगाम प्राथमिक टप्प्यात आहे. यंदा गुळास क्विंटलला सुरवातीचा दर ३८०० रुपयांच्या आसपास आहे. गेल्या वर्षीपेक्षा हा दर शंभर ते दोनशे रुपयांनी जास्त आहे. जिल्ह्यातील एकूण परिस्थिती पाहता गेल्या वर्षीपेक्षा गुळाला क्विंटललला १०० ते २०० रुपये वाढतील, असा प्राथमिक अंदाज आहे. गेल्या वर्षी गुळाचा हंगामातील सरासरी दर ३००० ते ३१०० रुपये इतका होता. यंदा यात वाढ होण्याची शक्‍यता आहे. 
- मोहन सालपे, सचिव, कोल्हापूर बाजार समिती

इतर अॅग्रो विशेष
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
हरवले जलभान कोनाड्यात‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’...
मोदी लाटेचे गारुडसतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...
राजू शेट्टींच्या पराभवाने शेतकरी...कोल्हापूर ः शेतीविषयक विविध प्रश्‍नांबाबत देश...
मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित...नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...
पुन्हा मोदी लाट, काँग्रेस भुईसपाट नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
ये नया हिंदुस्थान है' : पंतप्रधानआज देशातील नागरिकांनी आम्हाला कौल दिला. मी...
जलदारिद्र्य निर्देशांकातही आपली पिछाडीचएखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे मूल्यमापन करणार...
पांढऱ्या सोन्याची काळी कहाणीजागतिक पातळीवर कापसाखाली असलेल्या क्षेत्राच्या एक...
...आवाज कुणाचा? लोकसभा २०१९चा आज निकालनवी दिल्ली : संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या...
कृषी विद्यापीठांना नकोय शिक्षण परिषदेचे...नागपूर : भारतीय कृषी संशोधन परिषदेने तयार...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील...
राज्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरूमुंबई : राज्यातील यंदाच्या भीषण दुष्काळाची...