agriculture news in Marathi, rate up to lady finger, guar and read chili | Agrowon

जळगावात गवार, भेंडी, मिरचीचे दर टिकून
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 8 जानेवारी 2019

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील सप्ताहात गवार, भेंडी व हिरव्या मिरचीची आवक काहीशी कमी राहिली. परिणामी दर टिकून होते. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल १४०० ते २४००, भेंडीला १२०० ते २००० आणि गवारीला ३००० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. 

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील सप्ताहात गवार, भेंडी व हिरव्या मिरचीची आवक काहीशी कमी राहिली. परिणामी दर टिकून होते. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल १४०० ते २४००, भेंडीला १२०० ते २००० आणि गवारीला ३००० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. 

भेंडीची लागवड जळगाव जिल्ह्यात धरणगाव, पारोळा, जळगाव व एरंडोल या भागांत अधिक केली जाते. परंतु, धरणगाव तालुक्‍यातील धार, पथराड व एरंडोलमधील काही गावांमध्ये आवर्षणप्रवण स्थितीचा फटका या भेंडीला बसल्याने बाजार समितीमधील आवक मागील २० ते २२ दिवसांपासून कमी आहे. सरासरी दर १८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भेंडीला मिळाला. आवक प्रतिदिन १८ क्विंटलपर्यंत हाेती. हिरव्या मिरचीची आवक पारोळा, जामनेर व धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा भागातून होते. परंतु धुळे जिल्ह्यातील आवक जवळपास बंद आहे. तिखट बारीक आकाराची मिरची आंध्र प्रदेशातून काही अडतदार मागील २० ते २२ दिवसांपासून मागवित असून, या मिरचीची फक्त रोज चार ते पाच क्विंटल आवक झाली. 

सर्व भागातून मिळून हिरव्या मिरचीची प्रतिदिन २१ क्विंटल आवक झाली. मिरचीला सरासरी २००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. गवारची आवक यावल, जामनेर व पाचोरा भागांतून होत असून, कूस असलेल्या गवारीला अधिक उठाव आहे. गवारीची प्रतिदिन तीन क्विंटल आवक झाली. एकच दर गवारीला लिलावात मिळत असल्याची माहिती मिळाली. मेथी, कोथींबीर यांची आवक स्थिर असून, दरात चढउतार होत आहे. 

मेथीला प्रतिक्विंटल १२०० रुपयांपर्यंतचे दर मिळाले. आवक प्रतिदिन नऊ क्विंटल झाली. कोथिंबीरची आवक प्रतिदिन सात क्विंटल झाली. कोथिंबीरला प्रतिक्विंटल ९०० ते १४०० रुपये दर मिळाला. टोमॅटोची आवक रोडावली. टोमॅटोची प्रतिदिन १२ क्विंटल आवक झाली. टोमॅटोला कमाल १६०० रुपयांपर्यंतचा दर राहिला. बोरांची आवक कमी झाली असून, प्रतिदिन आठ क्विंटल आवक झाली. बोरांना प्रतिक्विंटल १४०० ते २२०० रुपये दर होता.

कांदेबाग केळीची आवक जळगाव, चोपड्यात घटली
कांदेबाग केळी लागवडीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव, चोपडा व जामनेर भागांत कांदेबाग केळीची काढणी जवळपास संपली आहे. उशिरा लागवडीच्या बागांमधील काढणीदेखील अंतिम स्थितीत असून, यामुळे कांदेबाग केळीचे स्वतंत्र दर जाहीर करणे रावेर येथील बाजार समितीने बंद केले आहे. आगाप लागवडीच्या नवती केळीची काढणी पाचोरा, रावेर व यावल भागांत सुरू असून, नवतीचे दर मागील सप्ताहात ९७० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर राहिले, अशी माहिती मिळाली.

इतर बाजारभाव बातम्या
जळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (...
जळगावात गव्हाची आवक रखडत; दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक टिकून;...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
विदर्भात कापूस पोचला प्रतिक्विंटल ५९१५...नागपूर ः शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यापनंतर आता...
पुणे बाजारात घेवडा, मटारच्या भावात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादला कैरी प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
लाल कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव : लाल कांद्याची जळगावसह धुळे, साक्री येथील...
परभणीत शेवगा प्रतिक्विंटल ३००० ते ३५००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात टॉमेटो २०० ते २७५० रुपये...अकोल्यात प्रतिक्विंटल २००० ते २७५० रुपये अकोला ः...
नाशिकमध्ये वांगे प्रतिक्विंटल २००० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
अकोल्यात हरभरा प्रतिक्विंटल ३५०० ते...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन...
औरंगाबादेत द्राक्षाच्या आवकेत चढ-उतार;...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात केळीची आवक वाढली, दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात केळीची आवक वाढली असून, नवती...
नगरमध्ये चिंच प्रतिक्विंटल ७००० ते...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
गुलटेकडी बाजारात भाजीपाल्याची आवक कमी;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत काकडीला प्रतिक्विंटल १५०० ते...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ३५०० ते...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात वांगी ३०० ते ५००० रुपये...पुण्यात १०० ते २५० रुपये प्रतिदहा किलो ...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते १३१००...सांगली ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीची...
अकोल्यात तूर सरासरी ५००० रुपये...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...