agriculture news in Marathi, rate not increased even jaggery production fell, Maharashtra | Agrowon

गुळाचे उत्पादन घटूनही दरात वाढ नाहीच
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

कोल्हापूर : यंदा गुळास गेल्या वर्षीपेक्षा चांगला दर मिळेल, ही अपेक्षा यंदाच्या हंगामातील पहिल्या दोन महिन्यांत फोल ठरली आहे. यंदा उत्पादनात तब्बल पस्तीस टक्क्‍यापर्यंत घट होऊनही गेल्या वर्षीइतकेच दर असल्याने जादा दर मिळण्याच्या आशा संपुष्टात येत असल्याचे चित्र आहे.

कोल्हापूर : यंदा गुळास गेल्या वर्षीपेक्षा चांगला दर मिळेल, ही अपेक्षा यंदाच्या हंगामातील पहिल्या दोन महिन्यांत फोल ठरली आहे. यंदा उत्पादनात तब्बल पस्तीस टक्क्‍यापर्यंत घट होऊनही गेल्या वर्षीइतकेच दर असल्याने जादा दर मिळण्याच्या आशा संपुष्टात येत असल्याचे चित्र आहे.

यंदा गूळ पट्यात तब्बल ९५ दिवस सलग पाऊस झाल्याने उसाचा दर्जा नीट राहिला नाही. याचा परिणाम गुळाच्या दर्जावरही झाला. दर्जेदार गुळाची आवक कमी प्रमाणात होत आहे. दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकांच्या गुळाचे उत्पादन जास्त होत असल्याने याचा परिणाम गुळाच्या दरावर होत आहे. परिणामी गूळ उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसानच होत आहे. 

हंगाम सुरू होण्यापूर्वी गूळ बाजारात तेजीचे वातावरण होते. आवक कमी होण्याची शक्‍यता असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम गूळ बाजारावर झाला होता. आवकेत घटीच्या शक्‍यतेने व्यापाऱ्यांनीही जादा गूळ खरेदी करण्यास सुरवात केली होती. परिणामी क्विंटलला दोनशे ते चारशे रुपयांनी दरात वाढ झाली होती. परंतु जसे उत्पादन वाढले तशी बाजारातील नकारात्मकता दिसून येऊ लागली. दर्जेदार गुळात घट होत असल्याने प्रमुख बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या गुजरातमधून गुळाच्या मागणीत घट येत असल्याचे लक्षात येताच गुळाच्या दरातही घसरण होऊ लागली. याचा फटका शेतकऱ्याला बसत आहे. 

अडचणी वाढल्या
यंदा केवळ शंभर ते दीडशेच्या दरम्यानच कशीतरी गुऱ्हाळे सुरू झाली आहेत. त्यातच ऊस मिळत नसल्याने गुऱ्हाळचालकही हैराण झाले आहेत. उसाचा दर्जाच खराब असल्याने दर्जेदार गूळ तयार करणे गुऱ्हाळमालकांना अशक्‍य होत आहे. याचाच फटका हंगामाला बसत आहे. शेवटच्या टप्प्यात गुळाची आवक एकदमच मंदावली, तर क्विंटलला शंभर रुपयांच्या आसपास दर वाढतील, अन्यथा दराची स्थिती कायम राहण्याची भीती गूळ उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केली. 

प्रतिक्रिया
हंगामाच्या सुरवातीला यंदाचा हंगाम उत्पादकांसाठी चांगला जाईल अशी अपेक्षा होती. पण अपेक्षित मागणी नसल्याने दरही वाढत नसल्याची स्थिती आहे. गुजरातमधून दर्जेदार गुळाची मागणी होत आहे. पण पावसामुळे उसाचा दर्जा खराब झाल्याने तितका दर्जेदार गुळ येत नसल्याने दर वाढीला मर्यादा येत आहेत. 
- निमेष वेद, गूळ व्यापारी

अशी आहे दराची स्थिती

गूळ प्रकार दर (क्विंटल)
स्पेशल  ३८०० ते ४२००
क्रमांक एक ३१०० ते ३६००
क्रमांक दोन  ३००० ते ३५००
क्रमांक तीन  २८०० ते २९००

 

इतर बातम्या
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर  : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...
लोकसभेसाठी माढ्यातून तुल्यबळ उमेदवारकऱ्हाड : लोकसभेसाठी माढा मतदारसंघात भारतीय जनता...
उपोषणासाठी बाजार समित्यांच्या...नाशिक : नियमनमुक्तीमुळे बाजार समित्यांचे...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर : परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
युवकांच्या सहकारी संस्था स्थापणार :...कऱ्हाड : राज्यातील सहकारी संस्थांचे सभासद हे ६०...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
किमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...
जन्मोजन्मी दास । व्हावे हेचि माझी आस ।।जन्मोजन्मी दास । व्हावे हेचि माझी आस ।। पंढरीचा...
शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी...तासगाव, जि. सांगली ः छत्रपती शिवाजी महाराज, डॉ....
दीड हजार कोटींचा दुसरा हप्ता...मुंबई  ः गेल्या वर्षी खरीप हंगामात अपुऱ्या...
राज्यात गारठा पुन्हा वाढण्याची शक्यतापुणे : उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह येऊ...
बाजार समित्यांमधील...नाशिक : तेलंगण, तमिळनाडू व कर्नाटकच्या धर्तीवर...
पंतप्रधान मोदी आज करणार महिला बचत...यवतमाळ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (ता...
पदव्युत्तर कृषी अभ्यासक्रमात पुढील...नागपूर ः कृषी अभ्यासक्रमात आजची परिस्थिती आणि...