agriculture news in marathi, rates of gram decrease due to procurement stop, nagar, maharashtra | Agrowon

खरेदी केंद्रे बंद होताच बाजारातही हरभरा दर खाली
टीम अॅग्रोवन
सोमवार, 4 जून 2018

शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली, मात्र शासनाने हरभरा खरेदी न करताच शासकीय खरेदी केंद्र बंद केले. खरिपाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. जर खरेदी केंद्राला मुदतवाढ मिळाली नाही तर तोच हरभरा कमी दराने बाजारात विकावा लागणार आहे. त्यात केंद्रे बंद होताच हरभऱ्याचे बाजारातील दरही पाडले आहेत.
- मिलिंद बागल, शेतकरी नेते

नगर ः राज्यात हमीभावाने हरभऱ्याची खरेदी करण्यासाठी सुरू असलेली शासकीय हरभरा खरेदी केंद्रे बंद झाली अन्‌ राज्यभरातील बाजारात हरभऱ्याचे दर २०० ते २५० रुपये क्विंटलने खाली आले. खरेदी केंद्रे बंद होण्याच्या दिवशी नगर बाजार समितीत ३१७५ ते ३३०० रुपये क्विंटल असलेला दर दुसऱ्या दिवशी ३००० ते ३२०० रुपयांवर आला. त्यामुळे सरकारी खरेदी केंद्रे बंद झाल्यावर हरभऱ्याचे दर खाली आल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. शासकीय हरभरा खरेदी केंद्रांना मुदतवाढ मिळण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

राज्यातील जवळपास २५ पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये यंदा हरभऱ्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. बाजारात आवक वाढली की लगेच हरभऱ्याचा दर्जा चांगला नसल्याचे कारण पुढे करत बाजारात हरभऱ्याची हमी दरापेक्षा कमी दराने खरेदी केली जात होती. त्यामुळे हमीभावाने खरेदी करण्यासाठी सरकारी खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी झाल्याने केंद्रे सुरू झाली होती. बुधवारी (ता. २९) खरेदी केंद्राची मुदत संपल्याने खरेदी केंद्रे बंद झाली आहेत.

सरकारी खरेदी केंद्रे बंद होताच बाजारात हरभऱ्याचे दर २०० ते २५० रुपयांनी खाली आहेत. मुळात सध्या बाजारात १२०० ते १५०० रुपये कमी दराने हरभऱ्याची खरेदी सुरू आहे. महिनाभरापूर्वी बाजारात ३२०० ते ३६०० रुपयांचा दर होता. चार दिवसांपूर्वी खरेदी केंद्रे बंद होताच ३१७५ ते ३३०० रुपये मिळणारा दर ३००० ते ३२०० रुपयांवर आला आहे. दर खाली येण्याचे कारण मात्र सांगितले जात नाही.

खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे. खते, बियाणे खरेदी करण्यासह मशागतीची उधारी शेतकऱ्यांना मिटावयची आहे. त्यामुळे हरभरा विकल्याशिवाय पर्याय नाही. सरकारने खरेदी केंद्रांना मुदतवाढ दिली नाही, तर बाजारात हरभऱ्याची आवक अजून वाढून हरभऱ्याचे दर खाली येण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

राज्यातील हरभरा खरेदी केंद्रे बंद झाल्याने अनेक शेतकऱ्यांना नोंदणी करूनही हरभरा विक्री करता आली नाही. त्यामुळे हरभरा खरेदी केंद्रांना पुन्हा मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. एकट्या नगर जिल्ह्यात आतापर्यंत १४ हजार ३३१ शेतकऱ्यांकडून १ लाख ५४ हजार ३७१ क्विंटल हरभरा खरेदी झालेली आहे. हरभरा विक्रीसाठी २४ हजार ६४५ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे, असे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी भारत पाटील यांनी सांगितले. अजून सुमारे दहा हजार ३१४ शेतकऱ्यांना हरभरा विक्रीसाठी खरेदी केंद्रे सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...