सोलापुरात गवार, घेवड्याचे दर वधारले

गवार
गवार

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवार, भेंडी, घेवड्याला चांगला उठाव राहिला. त्यांच्या दरातही पुन्हा तेजी राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. त्याशिवाय कांद्याचे दरही पुन्हा टिकून राहिले. बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवारची १० ते १५ क्विंटल, भेंडीची २० ते २५ क्विंटल आणि घेवड्याची ५ते १० क्विंटल आवक झाली. गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून त्यांना सातत्याने उठाव मिळतो आहे. मागणीच्या तुलनेत आवक तशी कमीच आहे. पण मागणीत सातत्य असल्याने त्यांचे दर वधारले. गवारला प्रतिदहा किलोसाठी १७० ते ४५० व सरासरी ३०० रुपये, भेंडीला ४० ते ३५० व सरासरी १७० रुपये आणि घेवड्याला ३५० ते ४५० व सरासरी ४०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय वांगी, टोमॅटो यांच्या दरातही तेजी राहिली. त्यांची आवकही चांगली होती. वांग्याची साधारणपणे रोज ४० ते ५० क्विंटल, टोमॅटोची ३०० ते ४०० क्विंटलपर्यंत आवक होती. वांग्याला प्रतिदहा किलोसाठी ८० ते ५०० व सरासरी २७० रुपये तर टोमॅटोला ६० ते ३०० व सरासरी २०० रुपये असा दर मिळाला.  भाज्यांची आवक रोज १० ते १५ हजार पेंढ्यांपर्यंत आवक होती. कोथिंबिरीला शंभर पेंढ्यांसाठी ५०० ते ८०० रुपये, मेथी ९०० ते १२०० रुपये आणि शेपूला ६०० ते ८०० रुपये असा दर मिळाला. कांद्याचे दर याही सप्ताहात टिकून राहिले. कांद्याला मागणीही वाढली. कांद्याची आवक स्थानिक भागातूनच सर्वाधिक होती. कांद्याची रोज ७० ते १०० गाड्यांपर्यंत आवक राहिली. कांद्याला प्रतिक्विंटल ३०० ते ४००० व सरासरी १७०० रुपयांपर्यंत दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com