agriculture news in marathi, Ration food grains will also be found in migrant villages | Agrowon

स्थलांतरित गावांतही मिळणार रेशनचे अन्नधान्य
सूर्यकांत नेटके
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

नगर : रोजगारासाठी गाव सोडलेल्या कुटुंबांना आता स्थलांतरित झालेल्या गावांत रेशनचे अन्नधान्य मिळणार आहे. स्थलांतरित झालेली कुटुंबे रेशनच्या धान्यापासून वंचित राहू नयेत यासाठी ‘आधारआधारीत सार्वजनिक वितरण प्रणाली’च्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जात आहे.

नगर : रोजगारासाठी गाव सोडलेल्या कुटुंबांना आता स्थलांतरित झालेल्या गावांत रेशनचे अन्नधान्य मिळणार आहे. स्थलांतरित झालेली कुटुंबे रेशनच्या धान्यापासून वंचित राहू नयेत यासाठी ‘आधारआधारीत सार्वजनिक वितरण प्रणाली’च्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जात आहे.

सध्या राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम सुरू झाला असून, उर्वरित ३८ जिल्ह्यांमध्ये (मुंबईसह) एप्रिलपासून सुरू होणार आहे. राज्याच्या ग्रामीण भागातून दरवर्षी जवळपास पंचवीस लाखांच्या वर कुटुंबे रोजगारासाठी काही महिने गाव सोडून स्थलांतरित होतात. स्थलांतरित होणाऱ्यांमध्ये बीड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी, जळगाव, नगर जिल्ह्याचा दक्षिण भाग, जळगाव, चाळीसगाव भागातून जवळपास दहा लाख ऊसतोड कामगार कुटुंबे स्थलांतरित होतात. या कुटुंबांना स्थलांतरित झाल्यानंतर सहा ते सात महिने रेशनच्या अन्नधान्यापासून वंचित राहावे लागत होते.

गतवर्षी स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांना एकाच वेळी (सुरवातीला) सहा महिन्यांचे अन्नधान्य देण्याचा प्रयोग राबवला, मात्र तो यशस्वी झाला नाही. आता मात्र ‘आधारआधारीत सार्वजनिक वितरण प्रणाली’शी सर्व शिधापत्रिकाधारकांचे ‘डेटा क्‍लिनिक सिस्टीम’शी आधारकार्ड ‘लिंक’ केले आहे. ही जोडणी थेट दिल्लीतील सर्व्हरला जोडलेली आहे. नगर जिल्ह्यामध्ये नव्वद टक्के शिधापत्रिका आधार लिंक केलेल्या आहेत. रेशन दुकानदाराला ‘बायोमेट्रिक’ मशिन दिलेली असून त्याद्वारे अन्नधान्य वितरण केले जात आहे.

शासन स्थलांतरित कुटुंबांना रेशन दुकानात धान्य देणार असून त्यासाठी कुटुंबप्रमुखाच्या बायोमेट्रिकचा आधार घेतला जाणार आहे. आधार क्रमांक जोडला नसलेल्यांसाठी स्थानिक पातळीवर पुरवठा विभागाचा कर्मचारी ओळख पटवून धान्य मिळवून देतील.
‘डेटा क्‍लिनिक सिस्टीम’चे काम पूर्ण झालेल्या सोलापूर शहर, जालना, नांदेड, नागपूर या जिल्ह्यामध्ये हा उपक्रम सुरू झाला असून एप्रिलपासून राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुरू होणार आहे.

गावातून स्थलांतरित झालेली कुटुंबे रेशनच्या धान्यापासून वंचित राहू नयेत यासाठी जेथे स्थलांतरित झाली आहेत, त्या गावांतील दुकानांतून धान्य मिळेल. साधारण एप्रिलपासून हा चांगला उपक्रम सुरू होणार आहे.
- जितेंद्र इंगळे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी, नगर 

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...