agriculture news in marathi, Ratnagiri, Devgad, Alibag Alphonso to get Seprate GI | Agrowon

रत्नागिरी, देवगड, अलिबाग हापूसला स्वतंत्र 'जीआय'
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

मुंबई : हापूस ‘कोणा’चा हा गुंता आता सुटण्याच्या मार्गावर असून, लवकरच हापूस ‘कोकण’चाच यावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत मिळाले आहेत. कोकणच्या हापूसबरोबरच देवगड, रत्नागिरी, अलिबाग यांना स्वतंत्र अस्तित्वही सरकारी पातळीवर मान्य होणार असल्याने बागायतदारांच्या दृष्टीने ही आनंदाची वार्ता असणार आहे.

मुंबई : हापूस ‘कोणा’चा हा गुंता आता सुटण्याच्या मार्गावर असून, लवकरच हापूस ‘कोकण’चाच यावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत मिळाले आहेत. कोकणच्या हापूसबरोबरच देवगड, रत्नागिरी, अलिबाग यांना स्वतंत्र अस्तित्वही सरकारी पातळीवर मान्य होणार असल्याने बागायतदारांच्या दृष्टीने ही आनंदाची वार्ता असणार आहे.

भौगोलिक निर्देशांक (जीआय) विषयातील अभ्यासक प्रा. गणेश हिंगमिरे यांनी या संदर्भात माहिती दिली. देशात प्रामुख्याने चार राज्यांत हापूसचे उत्पादन घेतले जाते. यामुळे कोकणचा मूळ निवासी असलेल्या हापूसला स्वतंत्र ओळख मिळत नव्हती. परिणामी देवगड, रत्नागिरी, अलिबाग येथील आंबा बागायतदारांना हापूसच्या भौगोलिक दर्जाचा आर्थिक लाभ घेता येत नव्हता. सर्वच राज्यांतील हापूस एकच अशी कृषी विद्यापीठाची भूमिका यास मारक ठरत असल्याने गेल्याकाही वर्षांपासून हा लढा सरकार दरबारी सुरू होता. अखेर सरकार दरबारी याबाबत गुरुवारी (ता. १९) झालेल्या सुनावणीत हापूस कोकणचाच या विषयावर एकमत होण्यास व तत्त्वतः मंजुरी मिळविण्यात यश आल्याचे प्रा. हिंगमिरे यांनी सांगितले. 

कोकणच्या हापूसला बल्साड, धारवाड हापूसशी स्पर्धा असते. मात्र, स्वाद आणि गंध यांच्या भौगोलिक गुणधर्मामुळे महाराष्ट्रातील कोकणपट्ट्यात देवगड, रत्नागिरी आणि अलिबाग हापूसचा स्वतंत्र दर्जा आणि वैशिष्ट्ये असल्याने शेतकऱ्यांना अधिक दराचा लाभ मिळत असतो. परंतु, चार राज्यांत पिकणारा हापूस हा एकच असल्याच्या कृषी विद्यापीठाच्या भूमिकेमुळे यास देशात अाणि परदेशात बाजारपेठेत अधिकचा लाभ मिळविण्यात अडचणीत येत होत्या. भौगोलिक निर्देशांकाकरिता (जीआय) दाखल दाव्यांनासुद्धा अडचणी निर्माण होत होत्या, अखेर यावर दर्जा, चव आणि गंध यासह इतर मूळस्थान आदी वैशिष्ट्यांचा लाभ ‘कोकण हापूस’ला देण्याचे संकेत मिळाले आहेत. परिणामी कोकणातील हापूस परदेशात अधिकृतरीत्या स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यास यशस्वी ठरेल असे दिसते. वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत ‘जिआॅग्राफिकल इंडिकेशन्स रजिस्ट्री’ कार्यालयाकडून येत्या २७ एप्रिलला याबाबत अधिकृत निर्णय जाहीर होण्याचे संकेत प्रा. हिंगमिरे यांनी दिले आहेत.  

देवगड, रत्नागिरी हापूसच्या नावावर शिक्कामोर्तब 
आपल्या मातीतील अस्सल स्वाद आणि गंध असलेल्या हापूस आंब्याला ‘जीआय’ मिळावा यासाठी कोकणातील आंबा बागायतदार सुमारे साडेचार- पाच वर्षांपासून झगडत होते. त्यानुसार ‘जिआॅग्राफिकल इंडिकेशन्स रजिस्ट्री’कडून मागील वर्षी देवगड आणि रत्नागिरी हापूस असे स्वतंत्र ‘जीआय’ देण्यात आले. त्यानंतर या निर्णयावर आक्षेप नोंदवण्यासाठी साडेचार महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. त्यामध्ये देवगड व रत्नागिरी असे स्वतंत्र प्रकार न करता हापूस सरसकट कोकणचा याप्रकारचे ‘जीआय’ मिळावे असा एक आक्षेप नोंदवण्यात आला. मात्र दोन्ही भागांतील भौगौलिकता, जमीन, हवामान, लागवड इतिहास आदी बाबी तपासून पाहता त्यांना स्वतंत्रपणे ‘जीआय’ देण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे.    

इतर अॅग्रो विशेष
आर्थिक स्थैर्याचे अनुकरणीय मॉडेलराज्यातील शेतीमधील समस्यांची यादी केली तर ती खूप...
पॉलिहाउस शेडनेट नायकांची करुण कथाउच्च तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत भरघोस नफा...
पाणी व्यवस्थापनासाठी सूक्ष्मजीवांचा...पाणी व्यवस्थापन म्हटले, की आपल्या डोळ्यासमोर ठिबक...
शिवरायांच्या आदर्शावर राज्य कारभार सुरू...पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...
वनक्षेत्राने वेढलेल्या भागामध्ये...कृषी क्षेत्रानजीक वनक्षेत्र असलेल्या परिसरामध्ये...
चारा छावण्या लांबणीवरमुंबई: राज्यात दुष्काळ तीव्र होत चालला असला...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ होत...
खरीप पीकविमा परतावाप्रश्नी उच्च...परभणी: परभणी जिल्ह्यात २०१७ च्या खरिपातील...
शेतकरी आठवडे बाजारातून विस्तारताहेत...संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी...
मार्केटच्या अभ्यासातून गुलाब शेतीत...निमगाव (ता. राहाता) येथील हर्षल प्रभात पाटील या...
आजचा चंद्र हा सर्वांत जवळ : 'ग्रेट...या वर्षी जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या...
समजून घ्या पाण्याचे महत्त्वपाण्याची समस्या शाश्वत पद्धतीने सोडवण्यासाठी...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...
एका संदेशाने आयुष्य केले बळकटटाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः काही तासांपूर्वी...
'दावणीलाही नाही आणि छावणीत नाही; जनावरे...सोलापूर :  मागील सरकारच्या काळात छावणीत...