agriculture news in marathi, Ravikant Tupkar demands hundred percent compensation to farmers | Agrowon

तुटपुंजी मदत नको, शंभर टक्के भरपाई द्या : रविकांत तुपकर
टीम अॅग्रोवन
रविवार, 18 फेब्रुवारी 2018

अकोला : गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई म्हणून सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून आम्हाला ती मान्य नाही. गहू, हरभरा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ५० हजार रुपये, तर फळबागांना हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत द्या. अन्यथा गारपीटग्रस्तांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला.

अकोला : गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई म्हणून सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून आम्हाला ती मान्य नाही. गहू, हरभरा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ५० हजार रुपये, तर फळबागांना हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत द्या. अन्यथा गारपीटग्रस्तांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला.

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा योग्य मोबदला द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तुपकर यांच्या नेतृत्वात संग्रामपूर पंचायत समितीवर शनिवारी (१७) मोर्चा काढण्यात आला. या वेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना तुपकर बोलत होते. तुपकर यांनी बैलगाडी चालवत नेतृत्व केले. 

तुपकर म्हणाले, की भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून केवळ उद्योगपतींचेच अच्छे दिन आले. मल्ल्या हजारो कोटींचा डल्ला मारून परदेशात पळून गेला. आता नीरव मोदीने आमच्या बँकांवर डाका टाकून तोही फरार झाला. शेतकरी मात्र हजार, दोन हजार रुपयांच्या मदतीसाठी सरकारपूढे हात पसरवित आहेत. काय चाललय या देशात, ‘सब का साथ, सबका विकास’ म्हणनाऱ्या मोदींने कोणाचा विकास केला?  बोंड अळीच्या अनुदानाचे काय झाले? सोयाबीनने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आता पुन्हा नैसर्गीक आपत्तीने शेतकरी कोलमडून पडला.

गारपिटीने शेतकऱ्यांचा गहू, हरभरा, कांदा, द्राक्ष ही पिके उद्ध्वस्त झाली. त्यामुळे या अस्मानी आणि सुलतानी संकटात शेतकरी सापडला असताना त्याला मदतीचा हात देण्याऐवजी सरकार आता विमा कंपन्यांकडे बोट दाखवत आहे. अनेक शेतकऱ्यांना विमा भरता आला नाही. मग अशा शेतकऱ्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडणार काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दुसरीकडे नुकसानग्रस्तांचे पंचनामे करतांना प्रशासन दुजाभाव करीत आहे. गावपुढारी पटवाऱ्यांना हाताशी धरुन आपल्या जवळच्या लोकांचे पंचनामे करुन घेत आहे. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यावर अन्याय होत आहे. ही हुकुमशाही वेळीच बंद न झाल्यास व सर्वांना समान न्याय न मिळाल्यास अधिकाऱ्यांना झोडपून काढा असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला. या मोर्चामध्ये स्वाभिमानी जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर, मोहन पाटील, उज्वल चोपडे, रोषण देशमुख, संतोष दाने, विलास तराळे, योगेश घायल, गणेश मालोकार, ज्ञानेश्वर हागे यासह शेकडो शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
शेतमालाला भाव न देणारे उत्पन्न दुप्पट...भंडारा : शेतमालाला भाव नसल्याने अधिक...
भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष : रावतेनागपूर : भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष...
कृषी सल्ला : भात, भुईमुग, आंबा,...भात ः सध्या रोपवाटिकेसाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू...
द्राक्ष बागेत रोगांच्या प्रादुर्भावाची... सर्व द्राक्ष विभागांमध्ये...
कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्‍यासक्रम...मुंबई : राहुरी येथील महात्मा फुले कृषी...
सातारा जिल्ह्यात आले लागवडीस गतीसातारा  ः उष्णतेत वाढीमुळे रखडलेल्या आले...
शेतकऱ्यांना मिळणार पाच रुपयांत पोटभर...लातूर  : शंभर-दीडशे किलोमीटर अंतरावरून आपला...
रोहित्राच्या बाॅक्समधील फ्यूज तारांच्या...परभणी ः जिल्ह्यातील कृषी पंपाना वीजपुरवठा...
नष्ट होत असलेल्या देशी वाणांचे संवर्धन...पुणे ः हरितक्रांतीच्या नादात अधिक उत्पादनाच्या...
यवतमाळ जिल्ह्यात फळबागांनी टाकल्या मानायवतमाळ  : कडाक्‍याच्या उन्हामुळे...
कागदपत्रांची पूर्तता करूनही लिलाव बंद...मालेगाव, जि. नाशिक  : मालेगाव कृषी उत्पन्‍न...
शेतकऱ्यांना ‘करार शेती’च्या माध्यमातून...नवी दिल्ली : शेतमालाचा बाजार आणि किंमतीतील...
सोलापूर बाजार समितीत ३९ कोटींचा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
साताऱ्यात गवार २०० ते ३०० रुपये दहाकिलोसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला,...नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा व...
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...