रविकांत तुपकरांची लाेकसभेसाठी माढामधून 'फिल्डिंग'

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकाेला : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुलख मैदानी ताेफ म्हणून अाेळखल्या जाणारे वस्राेद्याेग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी माढा लाेकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसला धाेबीपछाड देण्यासाठी फिल्डिंग लावणे सुरू केले अाहे. अागामी लाेकसभा निवडणुकीत माढा मतदार संघाचा खासदार स्वाभिमानीचाच हाेणार असे विधान खासदार राजू शेट्टी यांनी केल्यानंतर रविकांत तुपकरांच्या उमेदवारीला बळ मिळाले अाहे.

देशात राजू शेट्टी तर महाराष्‍ट्रात रविकांत तुपकर यांनी स्वाभिमानीच्या विविध अांदाेलनाचे नेतृत्व यशस्वीपणे सांभाळून सरकारला सळो की पळो करून साेडले. त्यामुळे पश्चिम विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात रविकांत तुपकर यांची लाेकप्रियता वाढत अाहे.

अागामी लाेकसभा, विधानसभा निवडणुकीला अद्याप एक-दिड वर्ष वेळ असला तरी स्वाभिमानीकडून अातापासून अागामी निवडणुकीची व्युव्हरचना अाखणे सुरू केले अाहे. पंढरपुर तालुक्यातील उपरी येथे झालेल्या स्वाभिमानी संघटनेच्या मेळाव्यात खासदार शेट्टी यांनी माढ्याचा खासदार स्वाभिमानीचाच असणार असल्याचे जाहीर केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com