शेतकऱ्यांची दुग्ध उत्पादक कंपनी तयार करणार

दुध
दुध

नागपूर: विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना शेतीला जोडधंदा मिळावा या उद्देशाने राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ, आनंद यांच्या समवेत राज्य शासनाने सामंजस्य करार केला आहे. त्यातून विदर्भ-मराठवाड्यातील ११ जिल्ह्यांमध्ये दररोज २ लाख  लिटर दूध संकलित होत आहे. यापुढे खासगी कंपनीच्या धर्तीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांची कंपनी स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय अतिरिक्त आयुक्त व दुग्ध विकास प्रकल्पाचे विभागीय संचालक रवींद्र ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.   शेतकरी आपल्याकडील जनावरे विक्रीला काढीत होते. त्यासाठी विविध करणे असली तरी दुधाला दर नसल्याचे सुद्धा कारण होते. त्याची दखल घेत उत्पादकता वृद्धी कार्यक्रम हाती घेण्यात आला. यात शेतकऱ्यांना कृत्रिम रेतनाची सेवा दारापर्यंत पोहोचविणे, संतुलित पशु खाद्य व पूरक पशु खाद्य पुरवठा करणे, वैरण विकास कार्यक्रम, जनावरांमधील वांझपणाचे निदान व ऍनिमल ईडक्‍शन व गाव पातळीवर पशु वैद्यकीय सेवा पुरविणे आदी समाविष्ट आहे. त्याच्या परिणामी विदर्भ-मराठवाड्यातील ७७७ संकलन केंद्रात ११६४ गावांतील २६ हजार ८११ शेतकरी दूध संकलित करण्यासाठी सरसावले आहेत. विभागाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून नव्या तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांना दूध उत्पादन करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच, शेतकऱ्यांना फॅटनुसार दुधाचे चांगले दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल वाढतो आहे. सध्या शेतकऱ्यांकडून म्हशीचे ३४ व गाईचे दूध २४ या दरात खरेदी करीत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या शहरात ७९ ठिकाणी मदर डेअरीचे स्टॉल्स उभारल्याची माहिती त्यांनी दिली. या वेळी माहिती अधिकारी अनिल गडेकर उपस्थित होते.     

शहर     केंद्र     गाव शेतकरी
अमरावती     १४०     २२९     ३०५९
चिखलदरा   ७      ७     ७४
वर्धा     ९५ १८८     २७३९
नागपूर     ७४     ११४     ३१३४
चंद्रपूर     ६२     ८०     २३७८
बुलडाणा ७४     ७४     १७६०
नांदेड     १४४     २७७     ६९५२
उस्मानाबाद     ११३ ११३     ३७२५
लातूर     ६८     ८२     २९९०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com