agriculture news in Marathi, Ravsaheb Danwe says, farmers satisfy on government, Maharashtra | Agrowon

शेतकरी सरकारवर पुरता समाधानी : रावसाहेब दानवे
टीम अॅग्रोवन
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

नगर ः देशात आणि राज्यात सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घेतले. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकरी पुरता समाधानी आहे. त्यामुळे कॉँग्रेस-राष्ट्रवादी व अन्य विरोधकांनी कितीही बाता मारल्या, टीका केली तरी शेतकरी आमच्या बाजूनेच आहे. आमचे सरकार चांगले काम करत आहे. म्हणून तर गेल्या चार वर्षांत झालेल्या सर्व निवडणुका भाजपने जिंकल्या आहेत असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला. यानंतरही आमचीच सत्ता येईल, शिवसेना भाजपवर आजिबात नाराज नाही. ते आमच्यासोबतच आहेत, असेही श्री. दानवे म्हणाले.

नगर ः देशात आणि राज्यात सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घेतले. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकरी पुरता समाधानी आहे. त्यामुळे कॉँग्रेस-राष्ट्रवादी व अन्य विरोधकांनी कितीही बाता मारल्या, टीका केली तरी शेतकरी आमच्या बाजूनेच आहे. आमचे सरकार चांगले काम करत आहे. म्हणून तर गेल्या चार वर्षांत झालेल्या सर्व निवडणुका भाजपने जिंकल्या आहेत असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला. यानंतरही आमचीच सत्ता येईल, शिवसेना भाजपवर आजिबात नाराज नाही. ते आमच्यासोबतच आहेत, असेही श्री. दानवे म्हणाले.

भारतीय जनता पक्षातर्फे ‘एक बूथ पंचवीस यूथ’ उपक्रम राबवला जात असून, त्याचा आढावा घेण्यासाठी सोमवारी (ता. ८) श्री. दानवे नगरला आले होते. श्री. दानवे म्हणाले, की शेतीमालाला दर मिळावा यासाठी दीडपट हमीदर, कर्जमाफी व अन्य शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. सरकारने शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशीच सरकारची भूमिका राहिली आहे. शेतकरी सरकारच्या कामावर समाधानी आहे. केंद्रात राज्यात सरकारचे काम चांगले आहे. त्यामुळे चार वर्षांत पंधरा महापालिका आणि दहा जिल्हा परिषदांत सत्ता मिळवली. आताही पाच राज्यांत होत असलेल्या निवडणुका भाजपच जिंकेल. कोणत्याही कामाचे मुल्यमापन करण्याचे साधन म्हणजे निवडणूका आहेत.

आम्ही चांगले काम केले, म्हणून तर राज्यातील सर्व निवडणुका जिंकल्या आहेत. लोकसभा आणि विधानसभेतही भाजपच सत्तेवर येणार आहे. आगामी निवडणुका आम्ही २०१४ ला सोबत असलेल्या समविचारी पक्षांना बरोबर घेण्याचा प्रयत्न असेल, पण जर सन्मानाची युती झाली नाही तर मग स्वबळावर लढण्याची भाजपची तयारी झाली आहे. राज्यातील ९८ हजार बूथपैकी ८३ हजार बूथची बांधणी पूर्ण झालेली आहे. 

पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, आमदार मोनिका राजळे, बाळासाहेब मुरकुटे, माजीमंत्री बबनराव पाचपुते, पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड या वेळी उपस्थित होते.

इतर अॅग्रो विशेष
असाही एक छुपा करनव्वदच्या दशकापासून राबवल्या जात असलेल्या आर्थिक...
शेततळे की गळके भांडेमा  गेल त्याला शेततळे योजनेची सांगड रोजगार हमी...
इक्रीसॅट पद्धतीतून वाढविले भुईमूग...सोहाळे (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील प्रयोगशील...
गौरीनंदन ने ठेवले दर्जेदार, भेसळमुक्त...शनी शिंगणापूर (ता. नेवासा, जि. नगर) येथील...
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी पाच दिवसांत...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
गतवर्षी नष्ट झाल्या ४० टक्के मधमाशी...गेल्या वर्षी एप्रिल २०१८ ते एप्रिल २०१९ या...
तुरळक ठिकाणीच जोरदार पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती...
एचटीबीटी बियाणे विक्रीप्रकरणी सहा अटकेतवणी, जि. यवतमाळ  : चंद्रपूर जिल्ह्यातील...
राज्यात मध्यम ते हलक्या सरी पुणे ः मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्याच्या...
मराठवाड्यात पिककर्जवाटप केवळ १३...औरंगाबाद : कर्जपुरवठ्याबाबत पुन्हा एकदा ...
‘एचटीबीटी’ लागवडप्रकरणी शेतकरी...अकोला ः जिल्ह्यात एचटीबीटी कापूस बियाणे लागवड...
नाशिक येथे आज पाणी व्यवस्थापन परिषदनाशिक: दर्जेदार पीक उत्पादनासाठी सुपीक जमिनीच्या...
मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
उत्पन्नवाढीचे गणित चुकते कुठे?साधारणपणे एप्रिल महिन्याच्या आरंभास विविध...
पीकविम्याचे कवित्वप तप्रधान पीकविमा योजनेची देशपातळीवर अंमलबजावणी...
‘वैद्यकीय' प्रवेशास मराठा आरक्षण लागू...नवी दिल्ली : वैद्यकीय आणि दंतवैद्यकीयच्या...
राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी पुणे : राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर सर्वदूर...
तीव्र दुष्काळाच्या प्रदेशात ११० एकरांवर...आटपाडी (जि. सांगली) येथील राजेश सातारकर यांची...
आठवडाभराच्या खंडानंतर पुन्हा चांगला...पुणे: राज्याच्या बहुतांशी भागात मॉन्सूनचे आगमन...
मालेगाव बाजार समितीत ‘इतर’च्या नावाखाली...नाशिक: मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘इतर...