agriculture news in marathi, Raw sugar export to Indonesia | Agrowon

कच्ची साखर निर्यातीसाठी इंडोनेशियाला प्राधान्य
राजकुमार चौगुले
मंगळवार, 9 जानेवारी 2018

कोल्हापूर : भारतातून कच्ची साखर इंडोनेशियात निर्यात करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. वाहतुकीच्या दृष्टीने हा देश जवळ असल्याने त्यांच्याशी निर्यातीचा करार करण्याबाबतचे प्रयत्न राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाकडून सुरू आहेत.

इंडानेशियाने भारतातून साखर आयात करण्याचे ठरविले, तर त्याचा फायदा साखर उद्योगाला होऊ शकतो. कच्ची साखर निर्यात करण्यासाठी इंडोनशियाबरोबरच चीन, तर पक्‍क्‍या साखरेच्या निर्यातीसाठी श्रीलंका, बांगलादेश आदी देशांच्या धोरणावरही नजीकच्या काळात अभ्यास करून सकारात्मक बोलणी अपेक्षित आहेत. 

कोल्हापूर : भारतातून कच्ची साखर इंडोनेशियात निर्यात करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. वाहतुकीच्या दृष्टीने हा देश जवळ असल्याने त्यांच्याशी निर्यातीचा करार करण्याबाबतचे प्रयत्न राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाकडून सुरू आहेत.

इंडानेशियाने भारतातून साखर आयात करण्याचे ठरविले, तर त्याचा फायदा साखर उद्योगाला होऊ शकतो. कच्ची साखर निर्यात करण्यासाठी इंडोनशियाबरोबरच चीन, तर पक्‍क्‍या साखरेच्या निर्यातीसाठी श्रीलंका, बांगलादेश आदी देशांच्या धोरणावरही नजीकच्या काळात अभ्यास करून सकारात्मक बोलणी अपेक्षित आहेत. 

इंडोनेशियाशी प्राथमिक बोलणी 
जगात ब्राझील व थायलंडमध्ये सर्वाधिक कच्ची साखर तयार होते. इंडोनेशियात त्यांना हवी तेवढी साखर तयार होत नसल्याने त्यांना कच्ची साखर आयात केल्याशिवाय पर्याय नाही. हा देश बाहेरील राष्ट्रावर अवलंबून आहे. थायलंडने याबाबत इंडोनेशियाशी करार करताना आयात शुल्क इतर देशांच्या तुलनेत कमी करून घेतले. फक्त ज्यावेळी हवी असेल, त्यावेळी साखर उपलब्ध करून देण्याचा सामंजस्य करार या दोन देशांत आहे. यामुळे दोन्ही देशांना त्याचा फायदा झाला. असाच करार भारतालाही करता येईल का, याबाबत प्रयत्न सुरू आहेत. इंडोनेशियाच्या शिष्टमंडळाशी प्राथमिक बोलणीही झाली. 

इतर पदार्थ करण्याकडेही कल हवा 
सध्याच्या साखर उद्योगाकडे पाहिले तर पक्‍क्‍या साखरेला बाहेर काहीच मागणी नसते. यामुळे भारतात जर अतिरिक्त साखर झाली तर ती बाहेर विकता येत नाही. सरकारी धोरणे व आंतरराष्ट्रीय मागणी याचा विचार केल्यास पक्की साखर निर्यात करण्याचा धंदा हा आतबट्ट्याचा होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. यापेक्षा कच्ची साखर व मोलॅसिस, इथेनॉलची निर्मिती ही फायदेशीर ठरू शकते, असा सूर साखर उद्योगाचा आहे. कच्या साखरेची निर्गत झाल्यास कारखान्यांचा ताण हलका होऊ शकतो, असा या उद्योगाचा प्रवाह आहे. 

पुण्यात विचारमंथन शक्‍य 
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या शिष्टमंडळाने नुकतीच वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी भेट घेतली. झालेल्या चर्चेत इंडोनेशियाचा मार्ग त्यांना संयुक्तिक वाटला. श्री. प्रभू यांनी तातडीने हालचाली करीत या उद्योगातील अधिकारी, तज्ज्ञ यांना सूचना देऊन काय करता येईल, याबाबत बैठक घेण्याचे आदेश दिले. काही दिवसांत ही बैठक पुण्यात होण्याची शक्‍यता आहे. चीन, श्रीलंका, बांगलादेश या पर्यायावर चर्चा होऊन बैठकीत विचारमंथन होण्याची दाट शक्‍यता आहे. साखर तज्ज्ञांबरोबर केंद्र सरकारचे प्रतिनिधी, अधिकारीही सहभागी होतील. 

भविष्यात निर्यातीबाबत काय करता येईल, याची पाहणी करण्यासाठी महासंघाचे पदाधिकारी शेजारील देशांचा दौरा करून परिस्थितीचा अंदाज घेणार आहेत. यानुसार निर्यातीचे सकारात्मक वातावरण तयार करण्याचे काम हे पदाधिकारी करतील. केंद्र सरकार त्यांच्या पातळीवरचे करार करेल. दोन्हीच्या समन्वयाने बाहेरच्या देशात निर्यातीसाठी प्रयत्न करण्यात येतील. तज्ज्ञांबरोबर विचारमंथन करणे व देशांना भेटून परिस्थिती जाणून घेण्याबाबतचा प्रस्ताव महासंघाने श्री. प्रभू यांना दिला आहे. 
- प्रकाश नाईकनवरे,
 व्यवस्थापकीय संचालक, 
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...