Agriculture News in Marathi, rayat kranti sanghatana Agitation, Solapur district | Agrowon

सहकारमंत्र्यांच्या घराकडे निघणाऱ्या ‘रयत’च्या कार्यकर्त्यांना रोखले
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 16 नोव्हेंबर 2017
सोलापूर ः उसाला पहिली उचल २७०० रुपये देण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या शेतकरी संघटनांकडून आंदोलनाची धार दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवारी (ता. १५) सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापुरातील निवासस्थानासमोर रयत क्रांती संघटनेने उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यासाठी जिल्ह्यातून कार्यकर्ते सोलापूरकडे निघाले होते. पण शहराबाहेर सावळेश्‍वर टोल नाक्‍यावरच पोलिसांनी कार्यकर्त्यांच्या गाड्या अडवल्या. 
 
सोलापूर ः उसाला पहिली उचल २७०० रुपये देण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या शेतकरी संघटनांकडून आंदोलनाची धार दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवारी (ता. १५) सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापुरातील निवासस्थानासमोर रयत क्रांती संघटनेने उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यासाठी जिल्ह्यातून कार्यकर्ते सोलापूरकडे निघाले होते. पण शहराबाहेर सावळेश्‍वर टोल नाक्‍यावरच पोलिसांनी कार्यकर्त्यांच्या गाड्या अडवल्या. 
 
तरीही या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर मंत्री देशमुख यांच्या होटगी रस्त्यावरील निवासस्थानाजवळ मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. दरम्यान, बुधवारीही जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको, उपोषण, सरकारच्या निषेधार्थ मुंडण यांसारखी आंदोलने सुरूच आहेत. त्यामुळे ऊसदराचे हे आंदोलन चिघळण्याची चिन्हे आहेत. 
 
अक्कलकोट, पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा, माढा या तालुक्‍यांत आंदोलनाची धग वाढते आहे, पण ना प्रशासन, ना कारखानदार ना मंत्री कोणीच याची दाखल घेत नसल्याने त्याची धार वाढतच राहणार आहे, अशीच परिस्थिती राहिली, तर आंदोलन आणखी चिघळण्याची शक्‍यता आहे. बुधवारी ठरल्याप्रमाणे रयतचे कार्यकर्ते दीपक भोसले यांच्या नेतृत्वाखाली सहकारमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे निघाले होते. पण सोलापूर-पुणे महामार्गावर त्यांच्या गाड्या अडवल्या, त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या देण्याचा निर्णय घेतला.
 
माचणूरला रास्ता रोको
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बुधवारी (ता. १५) सकाळी दहाच्या सुमारास माचणूर येथे सोलापूर-मंगळवेढा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. उसाला पहिला हप्ता ३००० रुपये द्यावा, अशी मागणी या वेळी आंदोलनकर्त्यांनी केली. पंढरपूर-मंगळवेढा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राहुल घुले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. 
 
माढा, उंदरगावातही अांदोलने
माढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व उंदरगाव येथे बळिराजा शेतकरी संघटना, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटनेने ‘रास्ता रोको' केला. यंदाच्या हंगामात उसाला ३४०० रुपये दर द्यावा, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या होटगी रस्त्यावरील घरासमोर शुक्रवारी (ता. १७) रक्तदान शिबिराचे आयोजन केले अाहे. 

इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर  : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...
सांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली  ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...
औरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद  : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...
नगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर  ः कृषी विभागाच्या विविध योजना...
धुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव  ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...
सातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा  : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...
साताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा  : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...
साखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...
जालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...
तंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...
ग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला  : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...
जमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी  ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...
नाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक  : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...
मोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...
संत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...
पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...
पुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...
साताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...
साखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर  : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...