जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (ज्वारी) आवक सुरू झाली असून, मागील आठवड्यात
बातम्या
सातारा ः शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वाहून घेणाऱ्या ‘रयत’चे विद्यापीठ झाले पाहिजे. त्यासाठी सर्व सहकार्य करणार असल्याचे केंद्रीय मानव संसाधन विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. शोधातूनच देश समृद्ध होतो, नवा विचार केल्याशिवाय शोध लागत नाहीत; म्हणूनच अटल टिंकरिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला वाव द्यायचा आहे, असेही त्यांनी सांगितले.
सातारा ः शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वाहून घेणाऱ्या ‘रयत’चे विद्यापीठ झाले पाहिजे. त्यासाठी सर्व सहकार्य करणार असल्याचे केंद्रीय मानव संसाधन विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. शोधातूनच देश समृद्ध होतो, नवा विचार केल्याशिवाय शोध लागत नाहीत; म्हणूनच अटल टिंकरिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला वाव द्यायचा आहे, असेही त्यांनी सांगितले.
रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवाचा प्रारंभ गुरुवारी (ता. ४) कर्मवीर समाधी परिसरात झाला. त्या वेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, प्रा. डॉ. एन. डी. पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, आमदार विश्वजित कदम, शशिकांत शिंदे, टाटा टेक्नॉलॉजीचे दिलीप बंड, डॉ. राजेंद्र जगदाळे, डॉ. आनंद भदे, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, डॉ. भगीरथ शिंदे, डॉ. भाऊसाहेब कराळे आदी उपस्थित होते. या वेळी मंत्री जावडेकर बोलत होते.
रयतच्या रॅलीत कर्मवीरांची शेवरलेट गाडी (व्हिडिअो)
या वेळी मंत्री जावडेकर यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य, सौ. लक्ष्मीबाई पाटील यांनी केलेला त्याग आणि संस्थेच्या प्रगतीचे कौतुक केले. ते म्हणाले, की संस्थेने ९९ वर्षांत शिक्षणाचा प्रसार करून गुणवत्ताही मिळविली आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी श्रमाला प्रतिष्ठा दिली. चांगले विद्यार्थी आणि शिक्षक तयार केले. आता संस्थेने गुणवत्तेला महत्त्व दिले आहे. त्यामुळेच सायन्स टेक्नॉलॉजी सेंटर सुरू होत आहे. शिक्षणातील परिवर्तन हेच देशाचे परिवर्तन आहे. श्री. पवार म्हणाले, की रयत विद्यापीठाला मान्यता देण्याचे श्री. जावडेकर यांनी मान्य केल्याने आता येत्या १० तारखेलाच त्यांच्याकडे विद्यापीठाचा प्रस्ताव देणार आहे. शताब्दी वर्षात जावडेकर यांच्या माध्यमातून कर्मवीर भाऊराव पाटील यांचे रयत विद्यापीठाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. नव्या पिढीत संशोधक वृत्ती वाढवायची आहे. नवनिर्मितीत युवक कसे सहभागी होतील हे पहायचे आहे.
या वेळी डॉ. अनिल पाटील यांनी संस्थेचा इतिहास आणि प्रगतीची माहिती दिली. प्राचार्य डॉ. कराळे यांनी प्रास्ताविक केले. सहसचिव विजय सावंत यांनी आभार मानले. या वेळी विविध पुस्तकांचे प्रकाशनासह कर्मवीर भाऊराव पाटील व सौ. लक्ष्मीबाई पाटील यांचे चित्र असलेल्या पोस्टाचे पाकीट व तिकिटाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
- 1 of 566
- ››