agriculture news in marathi, R&D, integration with service sector key to doubling farm income: Experts | Agrowon

कृषी-आर्थिक क्षेत्राची नव्याने मांडणी आवश्यक
वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

चंडीगड : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी संशोधन, विकासाच्या बरोबरीने विविध सेवा क्षेत्रांची योग्य पद्धतीने सांगड घालणे आणि कृषी-आर्थिक क्षेत्राची नव्याने मांडणी आवश्यक अाहे, असे मत तज्ज्ञांनी मांडले.

शेतीमधील बदलत्या धोरणांबाबत चर्चा करण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगाने एका बैठकीचे नुकतेच आयोजन केले होते. यामध्ये देशभरातील कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषी अर्थतज्ज्ञ, नाबार्डचे अधिकारी आणि पंजाब राज्य शेतकरी आयोगाचे सदस्य सामील झाले होते.

चंडीगड : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी संशोधन, विकासाच्या बरोबरीने विविध सेवा क्षेत्रांची योग्य पद्धतीने सांगड घालणे आणि कृषी-आर्थिक क्षेत्राची नव्याने मांडणी आवश्यक अाहे, असे मत तज्ज्ञांनी मांडले.

शेतीमधील बदलत्या धोरणांबाबत चर्चा करण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगाने एका बैठकीचे नुकतेच आयोजन केले होते. यामध्ये देशभरातील कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषी अर्थतज्ज्ञ, नाबार्डचे अधिकारी आणि पंजाब राज्य शेतकरी आयोगाचे सदस्य सामील झाले होते.

या बैठकीत मार्गदर्शन करताना कृषी शास्त्रज्ञ एस. एस. जोहल म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीमध्ये कृषी संशोधनाला गती देण्याची गरज आहे. याचबरोबरीने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक खेड्यामध्ये माहिती केंद्र उभारण्याची गरज आहे. यामुळे कृषी क्षेत्रातील नवीन तंत्र जलद गतीने शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचण्यास मदत होईल. 

अभिजित सेन म्हणाले की, कृषी-आर्थिक विभागाची आता नव्याने मांडणी करावी लागणार आहे. त्याचा फायदा शेती सुधारण्यासाठी होईल. वित्त आयोगाचे सदस्य अशोक लाहिरी म्हणाले की, कृषी क्षेत्राची गरज लक्षात घेऊनच देशाच्या आर्थिक विकासाची दिशा ठरविणे गरजेचे आहे. यासाठी समानता, गुणवत्ता आणि शाश्वत धोरणाची येत्या काळात आवश्यकता आहे. याचबरोबरीने कृषी क्षेत्राचे फेरमूल्यांकन, हवामान बदल, किमान आधारभूत किंमत, बाजारपेठ व्यवस्थापन, पीक विविधता या विषयांच्या बाबतही देशभरात व्यापक चर्चेची गरज आहे. या बैठकीमध्ये पीक बदल, पीक उत्पादकता, लहान क्षेत्र असलेले शेतकरी, कृषी अनुदान, खासगी क्षेत्राची गुंतवणूक याचबरोबरीने कृषी विद्यापीठांचे बळकटीकरण या विषयांवर व्यापक चर्चा झाली.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात पंचवीस...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्याच्या...
उरुग्वेतील गायीमधील लेप्टोस्पायरा...जगभरामध्ये प्राणी आणि मनुष्यामध्ये...
सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र...कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन...
कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम...कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची...
पुणे विभागात ७३,७४० हजार हेक्टरवर...पुणे   ः  गेल्या साडेतीन महिन्यांत...
मराठवाड्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार...औरंगाबाद  : मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी...
पावसाअभावी वऱ्हाडात सोयाबीनचे उत्पादन...अकोला   ः या हंगामात वऱ्हाडात सर्वाधिक लागवड...
पुणे जिल्ह्यात महिनाभरात नऊ जणांचा...उरुळी कांचन, जि. पुणे : संपूर्ण राज्यात चिंतेचा...
मी 35-40 रूपयांनी पेट्रोल-डिझेलची...नवी दिल्ली : सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मोदी...
लाल मातीचा सन्मान वाढविणारे आंदळकरकोल्हापुरातील २२ जून १९७० चा म्हणजे ४८...
डी.आर. कुलकर्णी यांचे निधनपुणे : 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीतील मुख्य उपसंपादक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिन...भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 68 वा वाढदिवस...
देशात सर्वाधिक महाग पेट्रोल मराठवाड्यात...लातूर : गेली सलग अठरा दिवस देशात पेट्रोल आणि...