गाय, म्हैसवाटप योजनेस मान्यता

गाय, म्हैसवाटप योजनेस मान्यता
गाय, म्हैसवाटप योजनेस मान्यता

पुणे : मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर दुष्काळी भागांतील शेतकऱ्यांना पशुपालनातून स्वयंराेजगार उपलब्ध होण्यासाठी २ देशी किंवा संकरीत गाई, २ म्हशींचा गट आणि २० शेळ्या आणि २ बाेकड गट वाटप याेजनेला (२०१७-१८) पशुंसवर्धन विभागाने मंजुरी दिली आहे. ५० टक्के अनुदानावरील ही याेजना पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद, यवतमाळ, गाेंदिया, सातारा आणि दुसऱ्या टप्प्यात बीड व भंडारा या जिल्ह्यामंध्ये ही याेजना राबविण्यात येणार आहे.

निम्मे अनुदान दाेन संकरीत गाईंसाठी ५६ हजार, आणि म्हशींसाठी ६६ हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे, तर शेळी गटासाठी १ लाख १४ हजार ७०० रुपयांचे अनुदान असणार आहे. अनुदान सहा महिन्यांच्या दाेन टप्प्यांत २५-२५ टक्के लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. या याेजनेमध्ये सहभागी झालेल्या लाभार्थ्यांना तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार असून, लाभार्थ्यांच्या निवडीसाठी संबंधित जिल्ह्याच्या पशुसंवर्धन उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

प्रशिक्षण देणार प्रशिक्षणामध्ये देशी, संकरीत दुधाळ जनावरांच्या जाती, म्हशींच्या जाती, त्यांचे संगाेपन, निवारा, आहार, जनावरातील माज आेळखणे, कृत्रिम रेतनाचे महत्त्व, त्याची वेळ, लसीकरण, गाभण जनारांची निगा, वासरांचे संगाेपन, आहार, वैरणींच्या जाती आदी बाबींचा समावेश असणार आहे. जनावरे खरेदी करताना त्यांचा विमादेखील उतरविण्यात येणार आहे.  

लाभार्थी निवड लाभार्थी निवडताना त्यांच्याकडे चारा उत्पादना बराेबरच बंदिस्त आणि मुक्त गाेठा पद्धतीसाठी स्वतःची पुरेशी जमीन उपलब्ध असणे आवश्‍यक असणार आहे. तसेच छाेटे कुटुंब संकल्पनेवर आधारित लाभार्थी निवडला जाणार आहे. संबंधित याेजनेशी संलग्न याेजनेचा लाभ घेतला असेल अशा लाभार्थी या याेजनेसाठी अपात्र असणार आहेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

या याेजनेसाठी तालुका पंचायत समितीमधील पशुधन विकास (विस्तार) अधिकाऱ्यांकडे अर्ज करावयाचा असून, लाभार्थी निवडीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच जनावरे खरेदीसाठी पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली  असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

गाय-म्हैस खरेदी - अनुदान

क्र . गटाचे स्वरूप खरेदी खर्च परराज्यांतील वाहतूक खर्च एकूण गट अनुदान
२ गाय (देशी/संकरित) (प्रतिगाय : ५१०००) १लाख २ हजार दोन जनावरे १००००१ लाख १२ हजार १ लाख १२ हजार ५६०००
२ म्हशी (प्रतिम्हैस : ६१०००) १ लाख २२ हजार १०००० १ लाख ३२ हजार ६६ हजार

शेळी खरेदी-अनुदान

क्र. तपशील दर* २० शेळ्या + २ बोकड

१)

 

शेळी खरेदी ६००० १ लाख २० हजार
२) बोकड खरेदी ७००० १४, ०००
३) शेळ्यांचा वाडा** २१२ रु. प्रतिचौ. फूट ९५, ४००

एकूण २ लाख २९हजार ४००

क्र. गटाचे स्वरूप गटाची किंमत अनुदान
१) २० + २ शेळी गट वाटप  २ लाख २९ हजार ४०० १ लाख १४ हजार ७००.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com