agriculture news in marathi, Recognition of Geir, Sahiwal, cow-guarding and poultry schemes in Sindhudurg district | Agrowon

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल गायीपालन, कुक्कुटपालन योजनांना मान्यता
टीम अॅग्रोवन
रविवार, 16 डिसेंबर 2018

पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट उत्पादनवाढीसाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने गीर आणि साहिवाल गायींपालन, शेळी गटांचे वाटप आणि कुक्कुट ग्राम योजनांना मान्यता दिली आहे. याद्वारे दुग्ध उत्पादनासह मांस आणि अंडी उत्पादनाला चालना दिली जाणार असून, अंडी विपणन आणि निर्यातीसाठी हॅपी हेन एग्ज आॅरगॅनिक एग्ज या ब्रॅण्डची निर्मिती केली जाणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली. 

पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट उत्पादनवाढीसाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने गीर आणि साहिवाल गायींपालन, शेळी गटांचे वाटप आणि कुक्कुट ग्राम योजनांना मान्यता दिली आहे. याद्वारे दुग्ध उत्पादनासह मांस आणि अंडी उत्पादनाला चालना दिली जाणार असून, अंडी विपणन आणि निर्यातीसाठी हॅपी हेन एग्ज आॅरगॅनिक एग्ज या ब्रॅण्डची निर्मिती केली जाणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली. 

या विविध योजनांमध्ये वैयक्तिक, सामूहिक आणि महिला बचत गटांसाठीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने वैयक्तिक योजनेमध्ये २ दुधाळ शुद्ध गीर किंवा साहिवाल गायींचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी गोठा बांधणीसह गायी खरेदी करता येणार आहे. यासाठी २ लाख ८ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तर सामूहिक गोपालनासाठी ५० गायींसाठी ४५ लाखांची योजना असून, या योजनेमध्ये सर्वसाधारण गटांसाठी ७५ टक्के अनुदान तर अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी ९० टक्के अनुदान असणार आहे. 

शेळीपालन योजनेमध्ये १० शेळ्या आणि १ बोकड गटाचे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये स्थानिक हवामानाला तग धरणाऱ्या कोकण कन्याल, उस्मानाबादी, मलबेरी या जातींचे वाटप केले जाणार आहे. ही योजना ९४  हजार २०० रुपयांची असणार आहे. तर महिला बचत गट सदस्यांसाठी देखील कुक्कुटपालनाची योजना आखण्यात आली असून, गटातील १० लाभार्थी महिलांना प्रत्येकी १०० कुक्कुट पिलांचे वाटप केले जाणार आहे. यासाठी एका गटासाठी १ लाख रुपयांचे अनुदान दिले जाणर असून, ४० महिला बचत गटांचा समूह तयार करून, क्कुटग्रामसाठी ४० लाख रुपयांच्या निधीची तरतूददेखील करण्यात आली आहे. या योजनेतून उत्पादित होणारी अंडी खरेदीसाठी बायबॅक योजनादेखील राबविण्यात येणार आहे. 

इतर ताज्या घडामोडी
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...
दक्षिण महाराष्ट्रात पक्षांपेक्षा ‘...कोल्हापूर: राज्याच्या इतर भागांप्रमाणे दक्षिण...
पिनाकीचंद्र घोष लोकपालपदीनवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह नवे नौदलप्रमुखनवी दिल्ली: व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह यांची भारतीय...
हरभरा चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पोलिस...बुलडाणा : गेल्या वर्षात हमीभावाने विक्री केलेल्या...
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध...सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट...
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची...सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ...
पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘...अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी...
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखाकिनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (...
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...