agriculture news in marathi, Recognize the potential of the district in food processing industry: Modi | Agrowon

प्रक्रिया उद्योगात जिल्ह्यांच्या क्षमता ओळखून बळ द्या
पीटीआय
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

जागतिक बॅंकेच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार भारताने ‘ईझ आॅफ डुइंग बिझनेस’मध्ये मानांकनात मोठी भरारी घेतली आहे. देशातील कररचनाही सोपी झाली आहे. या बाबी लक्षात घेऊन जागतिक कंपन्या आणि उद्योगांनी भरघोस गुंतवणूक करून भारताच्या अन्नप्रक्रिया उद्योगातील विकासयात्रेचे भागीदार व्हावे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेत टिकाव धरेल अशा किमान एका शेतीमालाचे राज्यांनी विपणन केले पाहिजे. अन्नप्रक्रिया उद्योगामध्ये प्रत्येक जिल्ह्याची काय क्षमता आहे, हे ओळखून त्यास बळ दिले पाहिजे. तरच जगाचे लक्ष आपल्याकडे आकर्षित होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (ता. ३) केले.

पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी वर्ल्ड फूड इंडिया २०१७ चे उद्घाटन केले. पंतप्रधान म्हणाले, की भारतात मोठी ग्राहक संख्या आहे. यामुळे अन्नसाखळीला (फूड चेन्स) चांगली संधी आहे. ग्रामीण भागातील उत्पन्नवाढीसाठीही अन्नप्रक्रिया उद्योग अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भारतीय अर्थव्यवस्था वेगाने घोडदौड करत आहे. वस्तू आणि सेवाकरामुळे करव्यवस्था अतिशय सोपी आणि सुटसुटीत झाली आहे. खाद्यपदार्थांच्या उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यासोबतच कररचना सोपी झाल्याने त्याचा फायदा उद्योगांना होत आहे. त्यामुळे जगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश होतो. भारत एका मोठ्या क्रांतीसाठी तयार आहे. भारतात फूड चेन्सना चांगली संधी आहे. भारतात ग्राहकांची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळे फूड चेन्स यशस्वी होऊ शकतात

परकीय गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशाने वर्ल्ड फूड इंडियाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जगभरातील गुंतवणूकदारांसोबत प्रमुख कंपन्या सहभागी झाल्या आहेत. अन्नप्रक्रिया मंत्रालयाकडून याचे आयोजन करण्यात आले असून, तीन दिवस हा कार्यक्रम चालणार आहे. अन्नप्रक्रिया उद्योगाशी संबंधित अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडवणे, परकी गुंतवणूकदारांना आकर्षित करणे, हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. याशिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हादेखील हेतू या कार्यक्रमामागे आहे.

इतर अॅग्रो विशेष
समजून घ्या पाण्याचे महत्त्वपाण्याची समस्या शाश्वत पद्धतीने सोडवण्यासाठी...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...
एका संदेशाने आयुष्य केले बळकटटाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः काही तासांपूर्वी...
'दावणीलाही नाही आणि छावणीत नाही; जनावरे...सोलापूर :  मागील सरकारच्या काळात छावणीत...
वनहक्काच्या ४३ हजारांहून अधिक...मुंबई : राज्यात मागील अवघ्या तीन महिन्यांत...
खानदेशात मका दरात वाढजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
पशूपालन अन्‌ गूळनिर्मितीतून शेती केली...राशिवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील...
दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले...लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी...
रयत राजाची अन् राजा रयतेचाहिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा लोककल्याणकारी...
थकीत एफआरपीचा तिढासा  खरेच्या किमान विक्री मूल्यात प्रतिक्विंटल २००...
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...