agriculture news in Marathi, recommendations for reduce the west of perishable agri products, Maharashtra | Agrowon

शेतमाल नुकसान कमी करण्यासाठी उपाययोजनांची शिफारस
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

देशातील भाजीपाल्याच्या एकूण ५० टक्क्यांपर्यंतच्या उत्पादनाचे हाताळणी सुविधांअभावी नुकसान हाेते. हे टाळण्यासाठी बांधावरच प्राथमिक प्रक्रिया, मूूल्यवर्धन, टिकवण क्षमता, साठवणूक आणि निर्यात या विविध पातळ्यांवर काम करावे लागणार आहे. शीतगृहे वीज बिलांच्या दरामुळे परवडत नसल्याने साेलर यंत्रणेवर छाेटी छाेटी शीतगृहे बांधण्याचादेखील विचार करण्यात आला आहे. या सर्व घटकांचा विचार करून विविध शिफारसी करण्यात आल्या असून, त्याप्रमाणे याेजना कराव्या लागणार आहेत.
- पाशा पटेल, समिती सदस्य आणि राज्य शेतमाल दर समिती अध्यक्ष.

पुणे ः हाताळणीच्या सुविधांअभावी देशात ५० टक्क्यांपर्यंत शेतमालाच्या नुकसानीतून दरवर्षी सुमारे ४४० अब्ज काेटी रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. हा ताेटा कमी करण्याच्या विविध उपाययाेजनांबराेबरच नाशवंत शेतमालाच्या उत्पादन खर्चाच्या कमी दराने शेतमाल बाजार समित्यांमध्ये विक्री करू नये, यासाठी नियमावली किंवा कायद्याची शिफारस नाशवंत शेतमाल हमीभाव समितीने केली आहे. समितीचा अहवाल शासनाला लवकरच सादर हाेणार आहे. 

नाशवंत शेतमालाची नासाडी टाळण्याबराेबरच हमीभाव देण्यासाठीच्या उपाययाेजना करण्यासंदर्भात शासनाने पणन मंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली हाेती. या समितीने राज्याच्या विविध भागात शेतकरी, तज्ज्ञ, अभ्यासकांच्या बैठका घेऊन शिफारसी मागविल्या हाेत्या. या विविध बैठकांमधील झालेल्या चर्चेनंतर अहवालाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, अहवाल ३१ आॅक्टाेबरअखेर शासनाला सादर करण्याच्या सूचना हाेत्या; मात्र लवकरच हा अहवाल शासनाला सादर हाेणार आहे.  

विविध शिफारसींमध्ये शेतमालाच्या उत्पादनापासून ते विक्री व्यवस्थेपर्यंतच्या विविध टप्प्यांतील करावयाच्या अंमलबजावणीचा समावेश आहे. यामध्ये विविध शेतमालाच्या अप्रमाणित बियाण्यांमुळे शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम हाेऊन उत्पादन कमी हाेणे. बांधावरच हाताळणी, प्रतवारी आणि पॅकिंग सुविधांचा अभाव, बाजार समित्या आणि बाजारपेठांमधील हाताळणीमधील बेफिकीर आणि बेशिस्तपणा, साठवणुकीसाठी बांधावरच शीतगृह, वाहतुकीसाठी शीतवाहने, प्राथमिक आणि आैद्याेगिक प्रक्रिया उद्याेगांचा अभाव आदी विविध कारणांनी शेतमालाला दर मिळत नाही. या विविध टप्प्यांवरील घटकांसाठी स्वतंत्र याेजना प्रस्तावित करण्यात याव्यात, अशा शिफारसी समितीने केल्या आहेत.

प्रमुख शिफारसींमध्ये दैनंदिन आहारात वापर हाेणाऱ्या विविध भाजीपाला, फळभाज्यांच्या उत्पादन खर्चाचा आधार घेण्यात आला आहे. विविध कृषी विद्यापीठांनी तयार केलेल्या उत्पादन खर्चाच्या अहवालांचा आधार समितीने घेतला असून, विद्यापीठांनी काढलेल्या उत्पादन खर्चाच्या रकमेपेक्षा कमी दराने शेतमाल बाजार समित्यांमधून विक्री करू नये, अशीदेखील शिफारस करण्यात आली आहे. यासाठी दरवर्षी विविध शेतमालाचे दर शासन जाहीर करणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...
नगर बाजारात तूर प्रतिक्विंटल ४४०० ते...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक...
सोयाबीन दरात काही अंशी तेजीचा अंदाजनागपूर ः सोयाबीन दरात आलेली तेजी शेतकऱ्यांना...
जळगावात चवळी, कारल्याचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
हळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचीलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...
सागरी तापमानाची जुनी माहिती मिळवणे...माहितीच्या नोंदीच्या अभावामुळे बहुतांश जागतिक...
मधमाश्यांचे सर्वेक्षण सातत्याने...गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक मधमाश्यांच्या...
बुलडाणा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडेबुलडाणा : उष्णतेच्या झळा सुरू होण्यापूर्वीच...
खानदेशात तूर खरेदी केंद्रे सुरू कराजळगाव : खानदेशात तुरीची मळणी पूर्ण होत आली आहे....
ऊस गाळपात नंदुरबार जिल्हा आघाडीवरजळगाव : खानदेशात ऊस गाळपात नंदुरबार जिल्ह्यातील...
नाचणी बीजोत्पादक शेतकऱ्यांना पन्हाळ्यात...कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात आत्माच्या...
गोदावरी दूध संघ शेतकऱ्यांसाठी ठरला ‘...नगर : ‘‘गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...
परभणी, हिंगोलीतील सिंचनासाठीच्या...परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात २०१७-१८...
खरीप नुकसानीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांच्या...सोलापूर : गतवर्षीच्या २०१८ च्या खरीप हंगामात...