agriculture news in Marathi, Reconciliation agreement between Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth and copenhagen university, Maharashtra | Agrowon

‘पंदेकृवि’ आणि कोपेन्हेगन विद्यापीठामध्ये सामंजस्य प्रकल्प
टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

अकोला ः  येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (पंदेकृवि) अाणि डेन्मार्कमधील कोपेन्हेगन विद्यापिठ यांच्या सामंजस्य प्रकल्प राबविला जाणार अाहे. दोन्ही विद्यापीठांचे तज्ज्ञांनी ‘गहू पीक आधारित पीक फेरपालट पद्धतीतील विविध पिकांची उत्पादकता वाढविणेसाठी पीक पैदासकरण पद्धतीचा अवलंब’ या विषयावरील अभ्यासाकरिता सामंजस्य प्रकल्प प्रस्तावित केला अाहे.  

विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले यांच्या मार्गदर्शनात शिक्षण, संशोधन आणि कृषी विस्तार कार्यात अग्रेसर राहण्यासाठी जागतिक पातळीवरील विविध शैक्षणिक संस्थांशी सामंजस्य करार केले जात आहेत.

अकोला ः  येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (पंदेकृवि) अाणि डेन्मार्कमधील कोपेन्हेगन विद्यापिठ यांच्या सामंजस्य प्रकल्प राबविला जाणार अाहे. दोन्ही विद्यापीठांचे तज्ज्ञांनी ‘गहू पीक आधारित पीक फेरपालट पद्धतीतील विविध पिकांची उत्पादकता वाढविणेसाठी पीक पैदासकरण पद्धतीचा अवलंब’ या विषयावरील अभ्यासाकरिता सामंजस्य प्रकल्प प्रस्तावित केला अाहे.  

विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले यांच्या मार्गदर्शनात शिक्षण, संशोधन आणि कृषी विस्तार कार्यात अग्रेसर राहण्यासाठी जागतिक पातळीवरील विविध शैक्षणिक संस्थांशी सामंजस्य करार केले जात आहेत.

वैदर्भीय शेती शाश्वत आणि शेतकरी समृद्ध करण्याची आपली कटीबद्धता अधिक वृद्धींगत करीत विद्यापीठाने नुकतेच डेन्मार्क देशातील कोपेन्हेगन विद्यापीठा सोबत ‘गहू पीक आधारित पीक फेरपालट पद्धतीतील विविध पिकांची उत्पादकता वाढविणेसाठी पीक पैदासकरण पद्धतीचा अवलंब’ या विषयावर अभ्यासाकरिता सामंजस्य प्रकल्प प्रस्तावित केला अाहे. हा प्रकल्प ‘पंदेकृवि’, कोपेन्हेगन विद्यापीठ डेन्मार्क व स्वित्झर्लंड येथील सेंद्रिय कृषी संशोधन संस्था यांच्या संयुक्त सहयोगाने राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये पंजाबराव देशमुख कृषीविद्यापीठाचे कृषी वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. विजयकुमार गावंडे, कोपेन्हेगन विद्यापीठ, डेन्मार्क येथील रोप पैदासकार शास्त्रज्ञ डॉ. बी. घली आणि सेंद्रिय कृषी संशोधन संस्था, स्वित्झर्लंड येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मोनिका मेस्मार हे प्रमुख संशोधक म्हणून आपले योगदान देणार आहे. 

या प्रकल्पाअंतर्गत संशोधनासाठी पंदेकृविमधील कृषिवनस्पती शास्त्र विभागातील आचार्य पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याची निवड करण्यात आली अाहे. उभय देशांतील तांत्रिक सहयोगाने गहू पिक आधारित खरीप पिकांच्या फेरपालटीसाठी कापूस पिकाची निवड करून त्यामधील शेतकऱ्यांना असणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्या प्रकारचे संशोधनासह योग्य वाण/ संकाराची निवड करून उत्पादकता वाढविण्यास मदत होणार आहे. पुढील दोन वर्षांत उपरोक्त प्रकल्प राबविण्यासाठी कार्यकारी परिषदेने नुकतीच मान्यता दिली आहे.

या संयुक्त उपक्रमासंदर्भात विद्यापीठ स्तरावर उपलब्ध सोयी-सुविधा, तांत्रिक पाठबळ आदींची पाहणी करण्यासाठी नुकतेच डेन्मार्क येथील प्रमुख संशोधक डॉ. बी. घली यांनी विद्यापीठाला भेट दिली. याभेटी दरम्यान डॉ. बी. घली यांनी कुलगुरू डॉ. विलास भाले यांची विशेष भेट घेत उपक्रमाविषयी सविस्तर अवगत केले. तर डॉ. भाले यांनी विद्यापीठातील कृषी विद्या विभागांच्या उपलब्धी सोबतच सेंद्रिय शेती, कृषी जैवतंत्रज्ञान, फलोत्पादन, वनशेती , पशुविज्ञान व दुग्धव्यवसाय, कीड व रोग व्यवस्थापन विभाग, मत्स्यव्यवसाय आदी विषय सामंजस्य करारासाठी उपयुक्त असल्याचे सांगत उभय देशातील या करारामुळे आपल्या देशातील विद्यार्थ्याना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपले शैक्षणिक कार्य करण्याची संधी उपलब्ध झाली असल्याचे सांगितले.

या प्रसंगी या उपक्रमाचे विद्यापीठातील संशोधक डॉ. गावंडे, कुलगुरू कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. शशांक भराड, जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे आदींची उपस्थिती होती.

इतर ताज्या घडामोडी
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...
मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत...पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...
नगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...
सांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...