agriculture news in marathi, reconciliation agreement between state government and tata trust for water conservation,vidarbha, maharashtra | Agrowon

‘जलयुक्त’अंतर्गत विदर्भात होणार ४० कोटींची कामे
टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 डिसेंबर 2017
अकोला ः जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत अकोला, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यामध्ये टाटा ट्रस्ट राज्य शासनासोबत काम करणार असून, याअंतर्गत सुमारे ४० कोटी रुपये खर्चून कामे केली जाणार आहेत. मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, टाटा ट्रस्टचे विभागीय प्रमुख मुकुल गुप्ते व विदर्भ प्रमुख राहुल दाभने यांच्या उपस्थितीत नुकताच याबाबत संयुक्त सामंजस्य करार झाला अाहे.
अकोला ः जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत अकोला, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यामध्ये टाटा ट्रस्ट राज्य शासनासोबत काम करणार असून, याअंतर्गत सुमारे ४० कोटी रुपये खर्चून कामे केली जाणार आहेत. मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, टाटा ट्रस्टचे विभागीय प्रमुख मुकुल गुप्ते व विदर्भ प्रमुख राहुल दाभने यांच्या उपस्थितीत नुकताच याबाबत संयुक्त सामंजस्य करार झाला अाहे.

तीन वर्षात अकोला जिल्ह्यात १२ कोटी ७८ लाख रुपयांची कामे केली जाणार असल्याची माहिती गुरुवारी (ता. २१) जिल्हाधिकारी अास्तिककुमार पाण्डेय यांनी दिली. यावेळी मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी भगवान सैंदाने, बाळापूरचे उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, टाटा ट्रस्टचे जिल्हा व्यवस्थापक अाशिष मुडावदकर उपस्थित होते.

 
जिल्हाधिकारी पाण्डेय म्हणाले, की जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत अकोला जिल्ह्यात ३० किलोमीटर लांबीचे नाले खोलीकरण व नदीचे पुनरुज्जीवन केले जाईल. त्यात बंधारेही बांधले जातील. या कामांसाठी शासनाचा वाटा ५५, टाटा ट्रस्टचा वाटा ४० टक्के अाणि पाच टक्के लोकसहभाग राहील. या अभियानातून जिल्ह्यात ६७५० एकर जमीन संरक्षित अोलिताखाली येईल. यासाठी १२ कोटी ७८ लाख खर्च अपेक्षित अाहे. यात टाटा ट्रस्ट सात कोटी ३ लाख ४२ हजार रुपये वाटा देणार अाहे. दरवर्षी १० किलोमीटर काम केले जाणार असून यासाठी मूर्तिजापूर व पातूर तालुक्याची पहिल्या टप्प्यात निवड करण्यात अाली. कमळगंगा अाणि निर्गुणा नदीचे काम केले जाईल.
 
यावेळी टाटा ट्रस्टचे मार्केटिंग मॅनेजर रोशन अढाऊ, डेअरी व्यवस्थापक डॉ. महेश बेंद्रे, मृद व जलसंधारण तज्ज्ञ सुधीर नाहते, विजय राठी, शंकर अमलकंठीवार, अंबादास चाळगे व सहायक राणी गुडधे उपस्थित होते.
 

अाशिष मुडावदकर यांनी सांगितले, की या कराराअंतर्गत अकोला, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातही २०१८ ते २०२१ या तीन वर्षात काम केले जाईल. यात यवतमाळमध्ये ५०, अकोल्यात ३० अाणि अमरावतीमध्ये २० किलोमीटरची कामे केली जात अाहे. यासाठी सुमारे ४० कोटी रुपये खर्च केला जाणार असून २२ हजार ५०० हेक्टर सिंचन क्षमता तयार केली जाईल.

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...
...कृत्रिम पावसाचीही तयारी !सोलापूर  : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक...
आरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजनचराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन...
राज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी...मुंबई  : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या...
शेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा...कोल्हापूर  : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र...
अंडी उत्पादनात दररोज एक लाखाने घटविटा, जि. सांगली  : वाढती उष्णतेची झळ...
व्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे ३०...येवला, जि. नाशिक  : अंदरसूल येथील कांदा...
'शेतकरी आत्महत्येला सरकारचे धोरण...नगर  ः देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या...
दुग्ध विकासाला हवी वैज्ञानिक क्रांतीची...नागपूर  : दुग्ध व्यवसायाचा विकास करायचा असेल...
चंदगडमध्ये काजू उत्पादन घटले चंदगड, जि. कोल्हापूर  ः काजूच्या...
पुणे विभागातील धरणांत २११.४० टीएमसी... पुणे  ः उन्हाचा ताप वाढू लागताच पुणे...
नांदेड जिल्ह्यात ८ लाख हेक्टरवर खरीप... नांदेड :  नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप...
नगर जिल्ह्यात ३८ हजार क्विंटल हरभरा... नगर : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ हरभरा खरेदी...
बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची मदत... नागपूर  : बोंड अळीसंदर्भातील आदेश चुकीचा...
उभी पिके जळू लागल्याने बॅंक संचालकाची...वालचंदनगर, जि. पुणे : इंदापूर अर्बन बॅंकेचे...
‘कृषिसेवक’साठी किमान पदवीची पात्रता हवीअकोला : कृषी सहायक, कृषिसेवक या पदावर...
हिंगोलीत हळद ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल हिंगोली  : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार...
राष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...
भाजीपाला सल्ला : वाल, भेंडी, गवारवाल : या पिकावर मावा, करपा व पानावरील ठिपके या...