agriculture news in marathi, Reconstruction of Melghat Tiger Project | Agrowon

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची होणार पुनर्रचना
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या  पुनर्रचनेला शासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे आता आदिवासी व प्रशासनात काही वर्षांपासून सुरु असलेल्या संघर्षाला पूर्णविराम मिळण्याची शक्‍यता आहे.

अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या  पुनर्रचनेला शासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे आता आदिवासी व प्रशासनात काही वर्षांपासून सुरु असलेल्या संघर्षाला पूर्णविराम मिळण्याची शक्‍यता आहे.

बफरक्षेत्र हे आता क्षेत्रसंचालकांच्या नियंत्रणाखाली येणार आहे. प्रशासनाला त्यामुळे प्रभावीपणे काम करता येईल. अमरावती वनवृत्तामध्ये पूर्व व पश्‍चिम मेळघाटातील बफरक्षेत्र व्याघ्र प्रकल्पाकडे वळते केले. त्यानंतर उर्वरित दोन प्रादेशिक वनवृत्तामध्ये मेळघाट प्रादेशिक वनविभाग निर्माण करण्यात येत आहे. उपवनसंरक्षक पश्‍चिम मेळघाट वनविभाग यांच्या पदनामात उपवनसंरक्षक मेळघाट (प्रादेशिक) वनविभाग असा बदल करण्यात आला आहे. या विभागाचे मुख्यालय परतवाडा येथे राहील.

नव्या मेळघाट प्रादेशिक वनविभागाचे वनपरिक्षेत्रनिहाय नियोजनासाठी तीन उपविभाग होत आहेत.  कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपविभाग एकचे मुख्यालय धारणी, उपविभाग दोनचे मुख्यालय घटांग आणि उपविभाग तीनचे मुख्यालय परतवाडा येथे राहील. या उपविभागाचे व्यवस्थापन सहाय्यक वनसंरक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे राहील. यवतमाळ वनवृत्ताअंतर्गंत अकोला (प्रादेशिक) वनविभागाचे बफरक्षेत्र व्याघ्रप्रकल्पाकडे हस्तांतरित करण्यात येईल. तसेच अकोला (प्रादेशिक) वनविभागाकडे असलेले वाशीम जिल्हयाचे वनक्षेत्र वगळण्यात येईल. अकोला जिल्हयातील वनक्षेत्रासाठी अकोला वनविभागाची पुर्नरचना होत आहे. वाशीम जिल्हयातील क्षेत्रासाठी वाशीम वनवृत्त निर्माण करण्यात येत आहे.

इतर बातम्या
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील बीड व...
वर्षावनातील विविधतेसाठी किडी,...संशोधकांना उष्ण कटिबंधीय वर्षावनातील विविधतेने...
शिक्षण,विज्ञानाच्या प्रगतीकडे लक्ष...वाळवा, जि. सांगली : ‘‘स्वबळावर उत्पादन क्षमता...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...
वाशीम जिल्ह्यात आज ३२ ग्रामपंचायतींची...वाशीम : राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या...
अंकलगी तलाव आटू लागलासांगली : जत पूर्व भागातील ४१ गावांना पाणीपुरवठा...
मराठवाड्यातील प्रकल्पांतील उपयुक्‍त...औरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा...
पशुधन सहायकांच्या पदोन्नतीप्रकरणात...नागपूर : निकष डावलून राज्यातील पशुधन सहायकांना...
दक्षिण महाराष्ट्रात पक्षांपेक्षा ‘...कोल्हापूर: राज्याच्या इतर भागांप्रमाणे दक्षिण...
पिनाकीचंद्र घोष लोकपालपदीनवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
नाशिक शहरात धावणार 'ई- पिंक रिक्षा'नाशिक : नाशिक शहरातील हिरकणी अटल अभिनव सहकारी...
व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह नवे नौदलप्रमुखनवी दिल्ली: व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह यांची भारतीय...
नगर : चार छावण्यांची परवानगी रद्दनगर : पशुधन वाचविण्यासाठी छावणीला मंजुरी...
औरंगाबादेत चिंच २५०० ते ८५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
तमिळनाडूतील १११ शेतकऱ्यांचे मोदींना...तिरुचिरापल्ली, तमिळनाडू : विविध मागण्यांकडे...
भर दुष्काळात राज्यातील शेळ्या-मेंढ्या...नगर ः दुष्काळी भागातील जनावरे जगवण्यासाठी छावण्या...