agriculture news in Marathi, Recovery of farmers' money from agent | Agrowon

शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची अडत्यांकडून वसुली 
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे देण्याचा कायदा असतानादेखील गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अडत्याने ५२ कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे ४९ लाख रुपये थकवले होते. शेतकऱ्यांच्या तक्रारींनंतर थकविलेले पैसे बाजार समितीने वसूल करून दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी, पुढे असे प्रकार होऊ नयेत यासाठी अडत्यांवर कडक कारवाई करत, या पैशांवरील व्याजदेखील मिळावे, अशी मागणी होऊ लागली आहे. 

पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे देण्याचा कायदा असतानादेखील गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अडत्याने ५२ कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे ४९ लाख रुपये थकवले होते. शेतकऱ्यांच्या तक्रारींनंतर थकविलेले पैसे बाजार समितीने वसूल करून दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी, पुढे असे प्रकार होऊ नयेत यासाठी अडत्यांवर कडक कारवाई करत, या पैशांवरील व्याजदेखील मिळावे, अशी मागणी होऊ लागली आहे. 

बाजार समितीमधील मे. पिंपळे आणि कंपनी या गाळ्यावर ५२ कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा विक्री केला होता. मात्र, अडत्याकडून पैसे देण्यास विलंब आणि टाळाटाळ होत होती. यानंतर शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे लेखी तक्रार केली. बाजार समिती प्रशासक बी. जे. देशमुख यांनी यात लक्ष घालून संबंधित तक्रारींवर सुनावणी घेत शेतकऱ्यांना ४९ लाख ६२ हजार २२४ रुपये परत मिळवून दिले.

याबाबत शेतकरी श्‍यामराव फडतरे (रा. बोपगाव, ता. पुरंदर) म्हणाले, ‘‘काही महिन्यांपूर्वी मे. पिंपळे आणि कंपनी या गाळ्यावर ५ टन कांदा विक्री केली होता. त्याची पट्टी सुमारे ७१ हजार रुपयांची   झाली. मात्र, वारंवार अडत्याला   भेटूनदेखील त्याच्याकडून पैसे दिले जात नव्हते. बाजार समितीकडे तक्रार केल्यानंतर समिती प्रशासनाने दखल घेत पैसे मिळवून दिले.’’

कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा विक्रीचे सुमारे ६४ लाख १३ हजार ९१० रुपये दिले नसल्याची तक्रार केली होती. त्यानुसार बाजार समितीने संबंधित आडत्याने किती पैसे दिले आणि किती बाकी आहेत, याची शहानिशा करून सर्व अर्जांवर सुनावणी घेतली. त्यानंतर सर्व तक्रारदार शेतकऱ्यांचे ४९ लाख ६२ हजार २२४ रुपये त्यांना मिळवून दिले. बाजार समिती शेतकऱ्यांच्या हितासाठीच कार्यरत आहे. पुणे बाजार समितीत शेतकऱ्यांची फसवणूक अथवा पैसे थकविल्यास तत्काळ कार्यवाही करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केले जाते. अडते पैसे थकवित असतील, तर त्याची शेतकऱ्यांनी तातडीने तक्रार करावी. त्याची तत्काळ दखल घेतली जाईल.
- बी. जे. देशमुख, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे.

इतर ताज्या घडामोडी
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...
अठराशेवर गावांमध्ये घेतल्या जाणार २६५२...औरंगाबाद   : येत्या खरीप हंगामात...
खानदेशात बाजरी मळणीचा हंगाम आटोपलाजळगाव  ः खानदेशात बाजरीचा मळणी हंगाम आटोपला...
धुळे, नंदुरबारमध्ये राष्ट्रीयीकृत...धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा बॅंकेने १२ हजारांवर...
कोल्हापुरात ‘पाणीबाणी’ची शक्यताकोल्हापूर : जिल्ह्यात वेळेवर पाऊस सुरू न झाल्यास...
आरग येथे नागिलीच्या पानांचे सौदे सुरूसांगली  ः कधीकाळी खाण्यासाठी वापरण्यात...
अकोला जिल्ह्यात २० टक्क्यांपर्यंत...अकोला :  आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक...
नगर जिल्ह्यातील १२४ गावांचे पाणी दूषितनगर  : जिल्ह्यातील २६४५ गावांचे पाणीनमुने...
बुलडाणा जिल्हा कृषी विक्रेता संघटनेच्या...बुलडाणा ः जिल्हा कृषी विक्रेता संघटनेची १४...
निफाड तालुक्यात द्राक्षबागांच्या...नाशिक  : निफाड तालुक्यातील द्राक्षबागांमध्ये...
सोलापूर जिल्हा परिषद करणार ‘रोहयो’ची...सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या वतीने यंदाच्या...
भूगर्भात पाणीसाठा टिकविण्यासाठी भूमिगत...भूमिगत बंधारा बांधण्याचे काम जमिनीखाली असल्याने...
सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांत टाकली...नागपूर ः दुष्काळी मदत नाही, कर्जमाफीच्या...
वडगाव येथील पाटबंधारे कार्यालयासमोर...वडगाव निंबाळकर, जि. पुणे  ः नीरा डावा...
पुणे बाजार समितीवर पुन्हा प्रशासकीय...पुणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुणे बाजार...
अळिंबी उत्पादनातून केली संकटांवर मातलोणी (जि. जळगाव) येथील अनिल माळी यांच्याकडे कृषी...