agriculture news in marathi, Recruitment In Co_operative Development Corporation | Agrowon

सहकार विकास महामंडळासाठी लवकरच अधिकारी भरती
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 1 जून 2018

पुणे : मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या बंद अवस्थेतील सहकार विकास महामंडळाची पुनर्रचना करीत ऊर्जितावस्था आणण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून महामंडळाची पुनर्रचना करण्यात आली असून, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर कामकाज सुरळीत करण्यासाठी मुख्यालय आणि विभागीय कार्यालयांसाठी सुमारे ४० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कंत्राटी व प्रतिनियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 

पुणे : मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या बंद अवस्थेतील सहकार विकास महामंडळाची पुनर्रचना करीत ऊर्जितावस्था आणण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून महामंडळाची पुनर्रचना करण्यात आली असून, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर कामकाज सुरळीत करण्यासाठी मुख्यालय आणि विभागीय कार्यालयांसाठी सुमारे ४० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कंत्राटी व प्रतिनियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 

सहकार विकास महामंडळाच्या माध्यमातून सहकारी संस्थांना वित्तपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या महामंडळाची पुनर्रचना करण्यात आली असून, कंपनी कायद्याखाली महामंडळाची नाेंदणी करण्यात आली आहे. तर जुने संचालक मंडळ बरखास्त करून आता केवळ सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पणन संचालक, सहकार आणि साखर आयुक्तांची संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महामंडळाचे कामच बंद असल्याने रिझर्व्ह बॅंक आॅफ इंडियाने महामंडळाचा परवाना रद्द केला हाेता. हा परवाना पुन्हा मिळविण्याची प्रक्रिया सुरू केली असून, येत्या १५ दिवसांत परवाना मिळाल्यानंतर सहकारी संस्थांना वित्त पुरवठा करण्याबराेबरच भागभांडवल उभारणीसाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

इतर ताज्या घडामोडी
पाणीटंचाई निवारणासाठी ३२ कोटीनागपूर : ग्रामीण भागातील पाणीटंचाई...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा अग्रीम...परभणी ः परभणी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १२...नांदेड ः चालू कापूस खरेदी हंगामामध्ये नांदेड,...
बेदाणानिर्मिती शेडवर बसू लागली यंत्रेसांगली ः जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज...
उन्हाळी भुईमुगावरील कीड नियंत्रणउन्हाळी भुईमुगावर खालील विविध अळ्यांचा...
जातपडताळणीचा ‘ऑफलाइन’ छळ पुणे  : शासनानेच वाटलेल्या जातप्रमाणपत्रांची...
लागवड उन्हाळी तिळाची...उन्हाळी हंगामात लागवडीसाठी एकेटी १०१, पीकेव्ही एन...
सांगलीत शनिवारपासून सेंद्रिय परिषद,...सांगली ः रेसीड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया...
उन्हाळी भुईमुगावरील पानेे खाणारी अळी या अळीला तंबाूखूवरील पाने खाणारी अळी म्हणूनही...
लोहाच्या कमतरतेवरील वनस्पतींची...हेन्रिच हेईन विद्यापीठ डस्सेलडॉर्प आणि...
नेरच्या नदी पात्रातील भराव काढादेऊर, ता.धुळे : पांझरा नदी पात्रातील नव्या...
सौर कृषिपंप योजनेसाठी पुणे जिल्ह्यातून...पुणे : शेतकऱ्यांना दिवसा व सौरऊर्जेद्वारे शाश्वत...
अपारंपरिक ऊर्जा काळाची गरज : बावनकुळेभंडारा : पारंपरिक ऊर्जेची मर्यादा लक्षात घेऊन...
नांदेड जिल्ह्यामध्ये १८ टॅंकरद्वारे...नांदेड ः जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाई उद्भवलेली ११...
परभणी, नांदेड जिल्ह्यात २ लाख खात्यांवर...परभणी ः परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील दुष्काळामुळे...
टेंभूच्या नेवरी वितरिकेची कामे २२...सांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेच्या नेवरी वितरिका...
पाणीटंचाईमुळे कांदा लागवडीच्या...पुणे ः वाढत असलेल्या पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यामध्ये तुरीचे उत्पादन...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती...
अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत १२ कोटी...कोल्हापूर : शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास...
कचारगडला `अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा...गोंदिया ः कचारगड हे देशभरातील भाविकांचे...