agriculture news in marathi, A rectangular anchor, rotatewater subsidy will increase | Agrowon

पलटी नांगर, रोटाव्हेटरचे अनुदान वाढणार : जळगाव जिल्हा परिषद
टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 फेब्रुवारी 2019

कृषी विभागाठी पुढे किती तरतूद असेल, हे सांगणे शक्‍य नाही. परंतु पलटी नांगर, रोटाव्हेटर योजनेसाठी निधी वाढविण्यात येणार आहे. रोटाव्हेटरसाठी ४०, तर पलटी नांगरासाठी ३० हजार रुपये प्रतिलाभार्थी अनुदान मिळेल.
- मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव

जळगाव : जिल्हा परिषदेच्या आगामी अंदाजपत्रकात (स्वनिधी) कृषी विभागासाठी तरतूद वाढविली जाण्याची शक्‍यता आहे. यातच पलटी नांगर व रोटाव्हेटर योजनेसाठीचे अनुदान पुढील वित्तीय वर्षात लाभार्थी शेतकऱ्यांना वाढवून दिले जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेतील कृषी विभागातर्फे देण्यात आली.  

पलटी नांगर योजनेसह रोटाव्हेटरला मागील काही वर्षांत चांगला प्रतिसाद मिळाला. कृषी विभागातर्फे या योजना राबविल्या जातात. परंतु बाजारात किमान ७५ हजारांपासून दर्जेदार पलटी नांगर मिळतो. त्यासाठी जिल्हा परिषद प्रत्येकी २५ हजार रुपये अनुदान देते. हे अनुदान तोकडे असल्याचे शेतकरी, लाभार्थींनी वारंवार जिल्हा परिषदेचे सदस्य, पदाधिकारी यांच्या लक्षात आणून दिले. 

रोटाव्हेटरसाठी ३० हजार रुपये अनुदान या वित्तीय वर्षात देण्यात आले. दर्जेदार रोटाव्हेटर लाख रुपयांपुढेच मिळतो. डीबीटीमुळे प्रथम बाजारात खरेदी करून पूर्वसंमती मिळाल्यास अनुदानासाठी शेतकरी प्रस्ताव सादर करतात. ते मार्गी लावून घेण्यासाठी सदस्य, पदाधिकाऱ्यांकडे सतत पाठपुरावादेखील करावा लागतो. असे असतानाही शेतकऱ्यांचा प्रतिसाद या योजनांना मिळाला. त्यामुळे रोटाव्हेटर व पलटी नांगरसाठी पुढील वित्तीय वर्षात प्रत्येकी ४० हजार व ३० हजार रुपये अनुदान देण्यात येईल. या संदर्भात कृषी समिती अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले.

पाइप योजनेचे अनुदान खर्च

कृषी विभागात मध्यंतरी निधी खर्चाची धावपळ सुरू होती. यात बॅटरीचलित फवारणी पंप व एचडीपीई पाइप योजनेसाठी ९० टक्‍क्‍यांवर खर्च झाला. निधी शिल्लक नाही. कुठलाही निधी वळविण्याची गरज अधिक नाही, असे कृषी विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले.

इतर ताज्या घडामोडी
कृषी विभाग म्हणते, पॉलिहाउस, शेडनेट...जळगाव ः खानदेशात १ ते ११ जून यादरम्यान झालेल्या...
केळी पीकविमाधारकांना परताव्यांची...जळगाव  ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत...
कांदा निर्यात, प्रक्रियेवर भर गरजेचा ः...राजगुरुनगर, जि. पुणे : कांदा बाजारभावातील अनिश्‍...
सात महिन्यांपूर्वी विकलेल्या मुगाचे...अकोला ः नाफेडने खरेदी केलेल्या मुगाचे पैसे सात...
महावितरण’द्वारे देखभाल, दुरुस्तीची ९०३३...‘सातारा : थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व...
रत्नागिरीत खतनिर्मिती कारखान्यावर छापारत्नागिरी : येथील एमआयडीसी परिसरात मच्छीच्या...
आषाढी पालखी सोहळ्यासाठी आरोग्य विभाग...पुणे : आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर...
गोंदिया जिल्ह्यात २ लाख हेक्‍टरवर...गोंदिया ः राइससिटी असा लौकिक असलेल्या गोंदिया...
औरंगाबाद जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती औरंगाबाद : जिल्ह्यातील ७७८ गाव व २७२...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत कापूस...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत २०१८-...
जतला कर्नाटकातून पाणी मिळणे धूसरसांगली : कर्नाटकातून कृष्णेचे पाणी जत तालुक्याला...
आषाढी वारीत ३५ हजार विद्यार्थी करणार...सोलापूर : आषाढी वारीत पाच विद्यापीठांतील ३५ हजार...
कात्रजकडून गायीच्या दूध खरेदीदरात वाढपुणे  : दुष्काळी स्थितीत दूध उत्पादक...
विधीमंडळ अधिवेशन ः सलग तिसऱ्या दिवशीही...मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही...
हायब्रीड बियाणे किमतीवर सरकारी नियंत्रण...पुणे  : महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती...
सरकारला शेतकऱ्यांचे काहीच पडलेले नाही ः...मुंबई  : ''किडनी घ्या; पण बियाणे द्या...
‘सर्जा-राजा’ला माउलींच्या रथाचा मानमाळीनगर, जि. सोलापूर  : संत ज्ञानेश्‍वर...
पूर्णवेळ संचालकानेच लावले  `केम`...अमरावती  ः कृषी समृद्धी समन्वयित प्रकल्पातील...
तत्कालीन प्रकल्प अधिकारी ‘केम’...मुंबई : विदर्भातील सहा जिल्ह्यांतील कृषी...
कृषी सल्ला : पानवेल, गुलाब, ऊस, मका,...हवामान ः पुढील पाचही दिवस आकाश अंशतः ढगाळ राहील...