agriculture news in marathi, Recurrence of Girna dam rotation has been started | Agrowon

गिरणा धरणाचे आवर्तन सुटले
टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 मार्च 2019

चाळीसगाव, जि. जळगाव : गिरणा पट्ट्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शुक्रवारी (ता. १५) सकाळी आठला गिरणा धरणातून दोन हजार क्‍युसेकने नदीत पाणी सोडण्यात आले. 

चाळीसगाव, जि. जळगाव : गिरणा पट्ट्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शुक्रवारी (ता. १५) सकाळी आठला गिरणा धरणातून दोन हजार क्‍युसेकने नदीत पाणी सोडण्यात आले. 

पाचोरा व भडगाव पालिकांसह विविध गावे, पंचायती, जिल्हा परिषदेचे सदस्यांनी नदीत पाणी सोडण्याची मागणी केली होती. १ मार्च किंवा ५ मार्च रोजी नदीत पाणी सुटेल, असे दावे मध्यंतरी काही लोकप्रतिनिधींनी केले. यादरम्यान पाटबंधारे विभागाने जिल्ह्याधिकाऱ्यांकडे पाणी सोडण्यास परवानगी मिळण्यासाठीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी गिरणा धरणातून आवर्तन सोडण्याला परवानगी दिली. हे आवर्तन कानळदा (ता. जळगाव)पर्यंत पोचेल. त्यासाठी पाच दिवस किमान लागू शकतात. 

गेल्या वेळी १५ जानेवारीला धरणातून आवर्तन सोडण्यात आले. २४ जानेवारीपर्यंत नदीत पाणी सोडले होते. त्या वेळी एक हजार १७५ दशलक्ष घनफूट एवढे पाणी सोडण्यात आले. या वेळेसही नऊ ते १० दिवस धरणातून पाणी सोडले जाईल. कारण उष्णतेमुळे नदीच्या शेवटच्या भागात पाणी पोचण्यासाठी अधिक दिवस लागू शकतात, असा अंदाज आहे. 

या आवर्तनामुळे नदीकाठच्या शिवारातील विहिरी, कूपनलिकांमधील पाणीपातळी वाढू शकेल. गिरणा पट्ट्यात वाढत असलेली पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. भूगर्भातील पाणीसाठा संपत असल्याने गिरणा नदीवर अवलंबून असलेल्या विहिरी, पाणी योजनांच्या कूपनलिकांनी तळ गाठला आले.

इतर ताज्या घडामोडी
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...
नाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...
शेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक  : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...
मीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर  : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...
दिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...
कोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर  : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...
जळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (...
नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार  : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....
पुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...
रणजितसिंहाच्या भाजप प्रवेशाने खरच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः पश्चिम...
काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी बारा...मुंबई ः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील...
आचारसंहिता भंगाच्या ७१७ तक्रारीमुंबई : नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी...
भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी...नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी तर...
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
इतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे...दरवर्षी पिढ्यानपिढ्या पावसाचे पाणी वेगवेगळे उपाय...
अभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा...महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२...