राज्यात हिरवी मिरची प्रतिक्विंटल १००० ते ४५०० रुपये

हिरवी मिरची
हिरवी मिरची

औरंगाबादेत प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी हिरव्या मिरचीची ८५ क्‍विंटल आवक झाली. या मिरचीला १५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. महिनाभरातील प्रत्येक गुरुवारची हिरव्या मिरचीची आवक व दराचा आढावा घेता आवक व दरात चढउतार कायम राहिला. २६ ऑक्‍टोबरला ५३ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला २६०० ते ३२०० रुपये दर मिळाला. १९ ऑक्‍टोबरला हिरव्या मिरचीची आवक ८० क्‍विंटल, तर दर २५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १२ ऑक्‍टोबरला १०७ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ५ ऑक्‍टोबरला औरंगबाद बाजार समितीमध्ये हिरव्या मिरचीची ७१ क्‍विंटल आवक झाली होती, तर दर २२०० ते ३४०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. पुण्यात प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २) हिरव्या मिरचीची सुमारे १५ ते १६ टेंपाे आवक झाली हाेती. या वेळी हिरव्या मिरचीस प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर हाेता. बाजार समितीमध्ये हिरव्या मिरचीची प्रामुख्याने आवक आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमधून हाेत असते, तर पुणे विभागातील विविध जिल्‍ह्यांमधूनदेखील आवक हाेत असते; मात्र परराज्यांतील आवकेपेक्षा तुलनेने कमी अाहे.  बाजार समितीतील आवक व दर (प्रतिक्विंटल/रुपये)

दिनांक     आवक     किमान     कमाल
१ नाेव्हेंबर  ८६६     १८००     ३०००
३१ आॅक्टाेबर   ७२०      २०००     २५०० 
३० आॅक्टाेबर ९०१      २०००     २५००
२९ आॅक्टाेबर ६२०      १६००     ३०००

    अकोल्यात प्रतिक्विंटल ३००० ते ४५०० रुपये अकोला ः येथील भाजी बाजारात हिरवी मिरची सध्या ३००० ते ४५०० रुपये क्विंटलने विकत अाहे. दररोज अकोला जिल्ह्यासह बुलडाणा, वाशीम व मराठवाड्यातील काही भागातून येथे मिरचीची २० क्विंटलपेक्षा अधिक अावक होत अाहे. येथील बाजारात हलक्या प्रतिची मिरची २५०० ते ३००० दरम्यान विकली जात असून, चांगल्या मिरचीचा दर तीन हजारांपासून पुढे मिळत अाहे. उच्चदर्जाची मिरची ४५०० पर्यंत विकत असल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. किरकोळ बाजारात हिरवी मिरची सर्रास ५० ते ६० रुपये किलोने ग्राहकांना विकली जात अाहे. सध्या मिरचीची अावक कमी असल्याने दर स्थिरावले अाहेत. अाणखी काही दिवस हे दर कायम राहण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. जळगावात प्रतिक्विंटल ११०० ते २१०० रुपये जळगाव ः बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २) हिरव्या मिरचीची ५२ क्विंटल आवक झाली होती. या वेळी हिरव्या मिरचीस ११०० ते २१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला, अशी बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. सध्या सिल्लोड (जि. औरंगाबाद), पहूर, पाळधी (ता. जामनेर), भुसावळ तालुक्‍यातून मिरचीची आवक होत आहे. मागील महिन्याच्या अखेरीस आवकेत वाढ झाली होती; पण आवकेत या महिन्याची सुरवात होत असतानाच आणखी घट झाली आहे. त्यामुळे दरही काहीसे वधारले आहेत. पुढील आठवड्यात आवकेत वाढ होऊ शकते, असा अंदाज बाजार समितीच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.  बाजार समितीतील आवक व दर (प्रतिक्विंटल/रुपये)

दिनांक     आवक     किमान     कमाल     सरासरी
२ नोव्हेंबर  ५२     ११००     २१००     १५००
२६ ऑक्‍टोबर  ६५     १२००     २०००     १६००
१९ ऑक्‍टोबर  ३६     १०००     २१००     १५००
१२ ऑक्‍टोबर ४०     १२००     ३०००     १८००

  सोलापुरात प्रतिक्विंटल १००० ते ३००० रुपये सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरवी मिरचीची आवक खूपच कमी होती. त्यामुळे मिरचीला उठाव मिळाला, त्याचे दरही तेजीत राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरव्या मिरचीची आवक रोज साधारण २० ते ५० क्विंटल आवक झाली. मिरचीची सगळी आवक स्थानिक भागातूनच झाली. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल १००० ते ३००० व सरासरी २००० रुपये असा दर मिळाला. त्याआधीच्या आठवड्यातही हिरव्या मिरचीला प्रतिदहा किलोस ७० ते २५० व सरासरी १०० रुपये इतका दर मिळाला. त्या आठवड्यात मिरचीची रोज ८० क्विंटलपर्यंत आवक झाली. त्या आधीच्या आठवड्यातही ५० क्विंटलपर्यंत आवक झाली. हिरव्या मिरचीला प्रतिदहा किलोसाठी १०० रुपये, सरासरी १५० रुपये आणि सर्वाधिक २२० रुपयांपर्यंत दर होता. ५० ते ७० रुपयांचा फरक वगळता दरातील तेजी कायम राहिल्याचे दिसून येते. मुंबईत प्रतिक्विंटल ३००० ते ३४०० रुपये मुंबई : माॅन्सूनच्या माघारीनंतर आवक घटल्याने शेतमालाचे भाव वधारले असताना मुंबई बाजार समितीत हिरव्या मिरचीची आवक वाढून दर स्थिरावले आहेत. आठवडाभरात  सरासरी दीड हजार क्विंटल मिरची आवक झाली असून, प्रतिक्विंटल सरासरी ३२०० रुपये दर होता.  बुधवारी (ता. १) ११०६ क्विंटल आवक होऊन ३००० ते ३४०० व सरासरी ३२०० रुपये दर होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. बाजार समितीमध्ये ३२ रुपये प्रतिकिलो दराने खरेदी होणाऱ्या मिरचीची होलसेल विक्री दर ६० रुपये प्रतिकिलो असून, ग्राहकांना प्रतिकिलो ८० रुपयांनी खरेदी करावी लागत असल्याचे स्थानिक व्यापारी सोमनाथ पवळे यांनी सांगितले. बाजारात आवक कमी असून, मिरचीचे दर वाढले आहेत. पुढील काही दिवसांत मिरची दर आणि आवक स्थिर राहील, असे व्यापाऱ्यांचे म्हणने आहे. मागील आठवड्यात (ता. २५) २२५५ क्विंटल आवक होऊन हिरव्या मिरचीस ३४०० ते ३६०० व सरासरी ३५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. साताऱ्यात प्रतिक्विंटल २००० ते २८०० रुपये सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. २) हिरव्या मिरचीची २६ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीस क्विंटलला २००० ते २८०० रुपये दर मिळाला. गतमहिन्यापासून हिरव्या मिरचीचे दर स्थिर असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. सातारा, कोरेगाव, फलटण तालुक्‍यातून मिरचीची आवक होत आहे. १७ ऑक्‍टोबरला हिरव्या मिरचीची १० क्विंटल आवक होऊन क्विंटलला १००० ते २००० रुपये दर मिळाला होता. हा अपवाद क्विंटलला २००० ते २५०० या दरम्यान दर स्थिर राहिले. हिरव्या मिरचीची ४० ते ५० रुपये प्रतिकिलोप्रमाणे किरकोळ विक्री केली जात आहे. बाजार समितीतील आवक व दर (प्रतिक्विंटल/रुपये)

दिनांक     आवक     किमान     कमाल
३१ ऑक्‍टोबर १७     २०००     २५००
२४ ऑक्‍टोबर १८     २०००     ३०००
१७ ऑक्‍टोबर  १०     १०००     २०००
१० ऑक्‍टोबर   ३२     २०००     २५००

नागपुरात प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये  नागपूर ः येथील कळमणा बाजारात हिरव्या मिरचीची आवक गेल्या पंधरवड्यापासून स्थिर असल्याचे चित्र आहे. २५५ ते २६० क्‍विंटल अशी बाजार समितीमधील आवक असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. बाजारातील आवक स्थिर असली तरी दरात मात्र चढउतार होत आहेत. २३ ऑक्‍टोबर रोजी ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर होता. त्यात दुसऱ्याच दिवशी २४ ऑक्‍टोबरला घसरण होत हे दर २५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलवर पोचले. त्यानंतर दर आणि आवक स्थिर राहिली. १ नोव्हेंबर रोजी दरात पुन्हा घसरण होत २००० ते २५०० रुपयांवर ते पोचले. २ नोव्हेंबरला २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलने हिरव्या मिरचीचे व्यवहार झाल्याचे सूत्रांनी सांगितले. किरकोळ मागणी घटल्याने दरात तेजीची शक्‍यता व्यापाऱ्यांनी फेटाळली. यापुढील काळात हिरवी मिरची २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.      परभणीत प्रतिक्विंटल २२०० ते ३००० रुपये परभणी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत फळे -भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. २) हिरव्या मिरचीची ४५ क्विंटल आवक होती. तीस २२०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. सध्या येथील फळे -भाजीपाला मार्केटमध्ये स्थानिक परिसरातून हिरव्या मिरचीची आवक येत आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी ३० ते ४७ क्विंटल आवक झाली, तर सरासरी २००० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. किरकोळ विक्री ३० ते ४० रुपये प्रतिकिलो दराने विक्री सुरू होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले. बाजार समितीतील आवक व दर (प्रतिक्विंटल/रुपये)

दिनांक     आवक     किमान     कमाल
१२ आक्टोबर  ४७     २०००     ३०००
१९ आॅक्टोबर   ३०     २५००     ३२००
२६ आॅक्टोबर ५०     २०००     ३७००
२ नोव्हेंबर ४५     २२००     ३०००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com