खानदेशात लाल कांद्याची आवक घटली; दर स्थिर

खानदेशात लाल कांद्याची आवक घटली; दर स्थिर
खानदेशात लाल कांद्याची आवक घटली; दर स्थिर

जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये लाल कांद्याची आवक रोडावली असून, जळगाव बाजार समितीत गुरुवारी (ता. १३) फक्त ६०० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. दर ५५० ते १३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळाले.  दर मागील आठवडाभरापासून स्थिर आहेत. बुधवारी (ता. १२) ८०० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती. मागील वर्षी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात प्रतिदिन २८०० क्विंटलपर्यंतची आवक बाजारात झाली होती. मागील हंगाम किंवा मागील वर्षाच्या तुलनेत कांद्याची लागवड खानदेशात कमी झाली होती. धुळे, जळगावात मिळून सात ते आठ हजार हेक्‍टर लागवड अपेक्षित होती. परंतु फक्त तीन हजार हेक्‍टरवर लागवड धुळे व जळगावात मिळून झाल्याचे सांगितले जात होते. परिणामी बाजारात आवक सुरवातीपासून कमी आहे.  दरम्यान, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दरात सुधारणा झाली. त्यापूर्वी दर किमान २५० व कमाल ८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. या महिन्यात कमाल दर १२०० रुपयांखाली गेलेले नाहीत. त्यात या आठवड्यात आणखी सुधारणा झाली असून, दर टिकून आहेत. आवक पुढे आणखी कमी होऊ शकते. कारण कमाल शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या लाल कांद्याची विक्री केली आहे. साठवणुकीची हवी तशी सुविधा नसल्याने कांद्याची जशी काढणी झाली, तशी विक्री अनेक शेतकऱ्यांनी केली होती. सध्या आवक जळगाव, यावल, भुसावळ व धुळे भागातून होत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यातील आवकही कमी झाली आहे. मागील आठवड्यात प्रतिदिन सरासरी १२०० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती. पांढऱ्या कांद्याची तर कुठलीही आवक होत नसल्याचे सांगण्यात आले. दर्जेदार लाल कांद्यास कमाल १४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर काही शेतकऱ्यांना जळगाव बाजार समितीत मंगळवारी (ता. ११) व बुधवारी मिळाला.  जळगाव जिल्ह्यातील अडावद (ता. चोपडा), किनगाव (ता. यावल) येथील उपबाजारातही कांद्याची आवक रोडावली आहे. अडावद येथेही कांद्याचे कमाल दर १४०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत असल्याचे सांगण्यात आले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com