agriculture news in marathi, reduction in cow and buffalo milk rate by 2 rupees , Maharashtra | Agrowon

गायी, म्हशीच्या दूध दरात दोन रुपयांची कपात
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

मुंबई : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने सहकारी व खासगी दूध संस्थांकडील पिशवीबंद दूध वगळून उर्वरित गायीच्या दुधाला प्रति लिटर ५ रुपये अनुदान जाहीर केले. या निर्णयाची अद्यापही अंमलबजावणी झाली नसल्याची तक्रार असताना राज्य शासनाने आता आधीच्या दूधदर वाढीवरून घूमजाव करीत दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. गायीच्या आणि म्हशीच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने सहकारी व खासगी दूध संस्थांकडील पिशवीबंद दूध वगळून उर्वरित गायीच्या दुधाला प्रति लिटर ५ रुपये अनुदान जाहीर केले. या निर्णयाची अद्यापही अंमलबजावणी झाली नसल्याची तक्रार असताना राज्य शासनाने आता आधीच्या दूधदर वाढीवरून घूमजाव करीत दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. गायीच्या आणि म्हशीच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दुधाच्या खरेदीदरात गेल्या दोन वर्षांत तीनदा वाढ करण्यात आली होती. सुरवातीला दोनदा प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्यात आली. तर त्यानंतर जून २०१७ मध्ये आणखी तीन रुपयांची दरवाढ करण्यात आली. गाय आणि म्हैशीच्या दूध दरात ही वाढ करण्यात आली होती. त्यामुळे गायीचे दूध प्रति लिटर २७ रुपये आणि म्हशीचे दूध प्रति लिटर ३६ रुपये या दराने खरेदी करणे अपेक्षित होते. ही दरवाढ सरकारी, सहकारी आणि खासगी दूध संघांना बंधनकारक होती.

मात्र, मधल्या काळात अतिरिक्त दूध आणि भुकटीचे दर कोसळल्यामुळे दूध संघ १७ ते १८ रुपयांना शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करीत होते. त्याविरोधात पावसाळी अधिवेशनादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या आंदोलनामुळे शासनाने संघांना २५ रुपये दर देण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी शासनाने संघांना अनुदान जाहीर केले आहे. हे अनुदान अजूनही मिळत नाही, अशी तक्रार आहे. 

पशुसंवर्धन, दुग्धविकास सचिव यांच्या अध्यक्षतेखालील प्रदत्त समितीने नुकतीच एक बैठक घेऊन दूध दराबाबत आढावा घेतला. तसेच आरे भूषण या दुधाच्या ब्रँडच्या विक्री दरातही बदल करण्यात आला असून हे दूध आता ३७ रुपये लिटर तर साडेअठरा रुपये दराने अर्धा लिटर दूध मुंबईत मिळणार असून उर्वरित महाराष्ट्रात ३६ रुपये लिटर दराने विक्री करण्यात येणार आहे.

तसेच दूध वितरकांच्या कमिशनच्या दरातही बदल करण्यात आला असून आतापर्यंत टप्पेनिहाय मिळणारे कमिशन बंद करण्यात आले असून यापुढे फक्त सरसकट कमिशन देण्यात येणार असल्याने अडीच रुपये ते साडेतीन रुपये इतक्या टप्प्यांनुसार मिळणाऱ्या कमिशनऐवजी आता सरसकट ३ रुपये कमिशन देण्यात येणार असल्याचेही शासन निर्णयात म्हटले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ ऑक्टोबरपासून करण्यात येणार आहे.

बैठकीत झाला निर्णय
पशुसंवर्धन, दुग्धविकास सचिव यांच्या अध्यक्षतेखालील प्रदत्त समितीने नुकतीच एक बैठक घेऊन दूध दराबाबत आढावा घेतला. या बैठकीनंतर राज्यातील दूध दरात कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफच्या असलेल्या गायीच्या दुधासाठी २५ रुपये प्रतिलिटर तर ६ फॅट आणि ९ एसएनएफ असलेल्या म्हशीच्या दुधासाठी ३४ रुपये प्रतिलिटर दर देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्याने आता शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा असंतोष पसरण्याची शक्यता आहे. 

दूध उद्योगाबाबतचे निर्णय असे...

  • गायीच्या दुधासाठी ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफसाठी २५ रुपये दर
  • ६ फॅट आणि ९ एसएनएफ असलेल्या म्हशीच्या दुधासाठी ३४ रुपये दर
  • ‘आरे भूषण’च्या दुधाची विक्री मुंबईत ३७ रुपये आणि उर्वरित महाराष्ट्रात ३६ रुपये दराने
  • दूध वितरकांना मिळणारे टप्पेनिहाय कमिशन बंद
  • यापुढे सरसकट ३ रुपये कमिशन देण्यात येणार 
  • निर्णयाची अंमलबजावणी १ ऑक्टोबरपासून

इतर अॅग्रो विशेष
गोकुळकडून गायीच्या दूध खरेदी दरात २...कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध संघाने (गोकुळ)...
तीस टन हापूसची रत्नागिरीतून थेट निर्यातरत्नागिरी ः रत्नागिरीतील प्रक्रिया केंद्रातून...
उन्हाचा चटका; उकाडा नकोसापुणे : मे महिन्याच्या सुरवातीपासून कमाल तापमान...
पूर्वमोसमी वळीवाच्या सरींचाही दुष्काळपुणे: उन्हाच्या झळा वाढल्याने राज्याला तीव्र...
ग्राम स्तरावरील पीककापणी प्रयोग रद्द !पुणे: राज्यात येत्या खरिपात पीकविम्यासाठी ग्राम...
पराभव मान्य; पण लढाई संपलेली नाही... :...राज्यातील शेतकरी चळवळीचा चेहरा असलेले स्वाभिमानी...
दुधाचा कृशकाळ सुरू होऊनही दर कमीच !पुणे: दुष्काळामुळे दुधाचा कृशकाळ सुरू झालेला असून...
उष्ण, कोरड्या हवामानाचा अंदाज पुणे: राज्यातील कमाल तापमानाचा पारा गेल्या काही...
एचटीबीटीविरोधात मोहीम तीव्र पुणे: राज्यात सुरू असलेल्या अनधिकृत तणनाशकाला...
फलोत्पादनासाठी अर्ज करण्यात नगर अव्वलनगर : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानअंतर्गत...
राज्यात पाणीटंचाईचा आलेख वाढताचपुणे: उन्हाचा चटक्याबरोबरच राज्यात पाणीटंचाईचा...
शेतकरी कंपन्या लातूरमध्ये उभारणार डाळी...लातूर : स्पर्धाक्षम बाजार घटक म्हणून शेतकरी...
देशातील जलाशयांमध्ये २१ टक्के पाणीसाठानवी दिल्ली ः उन्हाचा चटका वाढतानाच देशभरात...
नंदुरबारच्या दुर्गम भागात ‘सातपुडा भगर'...अक्कलकुवा तालुक्‍यातील आदिवासी महिला,...
गटशेती : काळाची गरजशेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने शेती...
शिक्षण, आरोग्य अन्‌ प्रशिक्षणातून...नांदगाव (ता. बोदवड, जि. जळगाव) गावामध्ये विजय...
सरकारबी मदत करंना अन्‌ बॅंका कर्ज देईनातनांदेड ः गेल्या वर्षीबी अन्‌ औंदाबी पावसानं मारलं...
पाण्याअभावी संत्राबागा होताहेत सरपणपरभणी ः जिल्ह्यातील प्रमुख संत्रा उत्पादक गाव...
‘कृष्णा’ आली दिघंचीच्या अंगणीदिघंची, जि. सांगली ः  अनेक वर्षे दिवास्वप्न...
जनावरांच्या बाजारातील व्यवहार उधारीवरचपरभणी: खरिपाच्या पेरणीच्या तोंडावर काहीशी...