agriculture news in marathi, Reduction in food grains in Khandesh | Agrowon

खानदेशात कडधान्यांच्या आवकेत घट
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

जळगाव : खानदेशात ज्वारीचे उत्पादन यंदा बऱ्यापैकी आलेले असून ज्वारीला दोन दर दिले जात आहेत. सर्वाधिक आवक दोंडाईचा (जि. धुळे), नंदुरबार, चोपडा व अमळनेर येथील बाजार समित्यांमध्ये होत आहे. कडधान्याची आवक मात्र रोडावली आहे.

जळगाव : खानदेशात ज्वारीचे उत्पादन यंदा बऱ्यापैकी आलेले असून ज्वारीला दोन दर दिले जात आहेत. सर्वाधिक आवक दोंडाईचा (जि. धुळे), नंदुरबार, चोपडा व अमळनेर येथील बाजार समित्यांमध्ये होत आहे. कडधान्याची आवक मात्र रोडावली आहे.

उडीद व मुगाचे दर सर्व बाजार समित्यांमध्ये ५१०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक आहेत. मात्र त्यांची आवक घटली असून, उडदाची प्रतिदिन ८००, तर मुगाची प्रतिदिन ६०० क्विंटल आवक पाचोरा, अमळनेर, दोंडाईचा व चोपडा बाजार समितीत होत आहे. नंदुरबार, रावेर, जळगाव बाजार समितीत कडधान्याची अत्यल्प आवक होत आहे. जळगाव बाजार समितीत लिलाव होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. परिणामी चोपडा, अमळनेरला शेतकऱ्यांची पसंती आहे. अनेक शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रात कडधान्य विक्रीसाठी नोंदणीही केली आहे.

उडदासह  मुगाची आवक आणखी कमी होऊ शकते. ज्वारीची आवक मात्र वाढत आहे. नंदुरबार, दोंडाईचा, चोपडा, अमळनेर व पाचोरा बाजार समितीत ज्वारीची प्रतिदिन सुमारे १००० क्विंटल आवक होत आहे. बारीक, अस्वच्छ ज्वारीला ९५० रुपये प्रतिक्विंटल, तर दर्जेदार ज्वारीला प्रतिक्विंटल १४०० रुपये दर आहेत.

सोयाबीनची आवकही कमी
मागील वर्षाच्या तुलनेत सोयाबीनची आवक कमी आहे. चोपडा, अमळनेर, शहादा व जळगाव बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची अधिक आवक होते. यंदा प्रतिदिन ६०० क्विंटलपर्यंतच आवक आहे. दर २८०० ते ३१०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. कमी दर्जाच्या सोयाबीनचे दर आणखी कमी असल्याची माहिती मिळाली. सोयाबीनची आवक पुढे आणखी कमी होऊ शकते. कारण, शेतकरी शासकीय खरेदी केंद्राच्या प्रतीक्षेत आहेत.

इतर बातम्या
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
मराठवाड्यात महायुतीचा करिष्मा कायमनांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
पुण्यात गिरीश बापट, बारामतीत सुप्रिया...पुणे  : देशभर मोदी लाट असतानाही राष्ट्रवादी...
राजू शेट्टी यांचा धक्कादायक पराभवकोल्हापूर : गेल्या दहा वर्षांपासून...
नगरमध्ये डॉ. सुजय विखे, शिर्डीत...नगर  : विसाव्या फेरीअखेर नगर लोकसभा...
साताऱ्यात उदयनराजे यांची हॅटट्रिक सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...
राजू शेट्टींच्या पराभवाने शेतकरी...कोल्हापूर ः शेतीविषयक विविध प्रश्‍नांबाबत देश...
मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित...नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...
पुन्हा मोदी लाट, काँग्रेस भुईसपाट नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
ये नया हिंदुस्थान है' : पंतप्रधानआज देशातील नागरिकांनी आम्हाला कौल दिला. मी...
...आवाज कुणाचा? लोकसभा २०१९चा आज निकालनवी दिल्ली : संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या...
कृषी विद्यापीठांना नकोय शिक्षण परिषदेचे...नागपूर : भारतीय कृषी संशोधन परिषदेने तयार...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील...
राज्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरूमुंबई : राज्यातील यंदाच्या भीषण दुष्काळाची...
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...