agriculture news in marathi, Refugee cultivation can prevent the pink boll worm | Agrowon

रेफ्यूजी लागवडीने बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखणे शक्‍य : डॉ. जाधव
टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 डिसेंबर 2017

नांदेड : बीटी कपाशीच्या सभोवती बिगर बीटी (नॉन बीटी) कपाशीची लागवड केलेल्या शेतामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने बीटी कपाशीचे तंत्रज्ञान योग्य पद्धतीने राबविणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन कृषी आयुक्तालयातील संचालक (विस्तार) डॉ. सु. ल. जाधव यांनी केले.

नांदेड : बीटी कपाशीच्या सभोवती बिगर बीटी (नॉन बीटी) कपाशीची लागवड केलेल्या शेतामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने बीटी कपाशीचे तंत्रज्ञान योग्य पद्धतीने राबविणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन कृषी आयुक्तालयातील संचालक (विस्तार) डॉ. सु. ल. जाधव यांनी केले.

डॉ. जाधव यांनी वारंगाफाटा (जि. हिंगोली) येथील बालाजी भीमराव कदम यांच्या शेतातील बीटी कपाशीच्या पिकांची पाहणी नुकतीच केली आहे. या वेळी डॉ. जाधव म्हणाले, की भारतात २००२ मध्ये बीटी कपाशीचे तंत्रज्ञान आले. बीटी कपाशीच्या बियाण्यासोबत नॉन बीटी कपाशीचे बियाणेदेखील मिळत असते. कापसावरील बोंड अळ्या बीटी तंत्रज्ञानास प्रतिकारक्षम बनू नये, म्हणून लागवड करत असताना बीटी कपाशीच्या चारही बाजूंनी नॉन बीटी बियाण्याची लागवडदेखील करायची असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नॉन बीटीचे बियाणे फेकून देऊ नये.

कपाशीचा हंगाम संपल्यानंतर फरदड कापूस उत्पादन घेतले जात असल्यामुळे आता बीटी कपाशीवर गुलाबी बोंड अळी हल्ला करू लागल्याने शेतकऱ्यांनी बीटी कपाशीच्या चारही बाजूंनी नॉन बीटी कपाशीची लागवड करावी. फरदड कपाशीचे उत्पादन घेऊ नये. गुलाबी बोंड अळीग्रस्त कपाशीचे पीक उपटून नष्ट करावे, असा सल्ला डॉ. जाधव यांनी शेतकऱ्यांना दिला. या वेळी कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...