व्याज सवलती योजनेबाबत बँकांनी गांभीर्य बाळगावे

व्याज सवलती योजनेबाबत बँकांनी गांभीर्य बाळगावे
व्याज सवलती योजनेबाबत बँकांनी गांभीर्य बाळगावे

सोलापूर : पीककर्जाची नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी राज्य सरकारच्या वतीने डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबविण्यात येते. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी राष्ट्रीयीकृत बॅंका उदासीन आहेत. त्यामुळे या योजनेतील रक्कम शासनाकडे जमा करण्याची वेळ आली असल्याचा मुद्दा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित झाला. शेतकऱ्यांचे प्रस्ताव सादर न करणाऱ्या बॅंकांनी हा विषय गांभिर्याने घेऊन आठवड्यात निकाली काढावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या. 

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सहकार उपनिबंधक व अग्रणी बॅंकेच्या व्यवस्थापकाची बैठक घेतली. जिल्ह्यातील युको, ॲक्‍सिस बॅंकेकडे पात्र शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. आयसीआयसीआय बॅंकेने माहितीच दिली नसल्याचा मुद्दा उपस्थित झाला. प्रलंबित प्रस्ताव तत्काळ मार्गी लावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत.

योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी जिल्हा उपनिबंधकांकडे प्रस्ताव सादर न करणाऱ्या बॅंकांवर कारवाई करण्याबाबत उपनिबंधकांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित असल्याचा मुद्दा जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मांडला होता. प्रस्ताव सादर न करणाऱ्या बॅंकांवर कारवाई करण्याबाबत ठोस निर्णय अपेक्षित आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com