agriculture news in marathi, regional workshop on grapes, nashik, maharashtra | Agrowon

द्राक्ष बागायतदार संघाचा मार्केटिंग, ब्रॅँडिंगवर भर ः राजेंद्र पवार
टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

काही निर्यातदारांकडून रसायनांचे ‘रेसीड्यू रिपोर्टस’ शेतकऱ्यांना दिले जात नाहीत. ते थेट द्राक्ष उत्पादकांना मिळावेत अशी मागणी आहे. त्यासाठी द्राक्ष उत्पादक सर्वस्तरावर पाठपुरावा करीत आहे. याबाबत संघातर्फे प्रयत्न केले जातील. येत्या हंगामात शेतकऱ्यांच्या या प्रश्‍नावर मार्ग निघेल.
- राजेंद्र पवार, अध्यक्ष, राज्य द्राक्ष बागायतदार संघ.

नाशिक  : ‘‘गोड चवीची, रेसीड्यू सिड्यू फ्री द्राक्ष उत्पादन मिळविण्यात प्रयोगशील द्राक्ष उत्पादकांनी यश मिळवले आहे. गुणवत्तेमुळे जागतिक, देशांतर्गत बाजारपेठेत मागणी वाढत आहे. येत्या काळात राज्य द्राक्ष बागायतदार संघाकडून द्राक्षांच्या मार्केटिंग व ब्रॅँडिंगवर भर देण्यात येणार आहे``, असे प्रतिपादन राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी केले.

द्राक्ष बागायतदार संघाचे ‘ऑक्‍टोबर छाटणी'' या विषयावरील विभागीय चर्चासत्र शुक्रवारी (ता. ५) येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात झाले. यावेळी श्री. पवार अध्यक्षस्थानी होते. संघाचे माजी अध्यक्ष अशोक गायकवाड, सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे, संघाचे खजिनदार कैलास भोसले, संचालक माणिकराव पाटील, विभागीय अध्यक्ष रवींद्र बोराडे, कृषी उपसंचालक नरेंद्र आघाव, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. एस. डी. सावंत, डॉ. सोमकुंवर, डॉ. अजय उपाध्याय, मधुकर क्षीरसागर उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, ‘‘जगभरात विविध पिकांचे संघ, मंडळे स्थापन झाली आहेत. त्याद्वारे शेतकरी व सरकार एकत्रितपणे आपल्या प्रश्‍नांवर मार्ग काढतात. संघ मागील ६० वर्षांपेक्षा अधिक काळापासून द्राक्षशेतीसाठी कार्यरत आहे. संघाकडून द्राक्ष उत्पादकांना प्रमाणित जीए, खते आदी निविष्ठा रास्त दरात उपलब्ध करून दिली जात आहेत त्याला प्रतिसाद वाढत अाहे. त्यातून होणाऱ्या स्पर्धेमुळे बाजारातील शेतकऱ्यांची अडवणूक कमी झाली आहे.``

`द्राक्षांच्या नवीन जाती व त्यांचे व्यवस्थापन'' या परिसंवादात प्रयोगशील द्राक्ष उत्पादक चंद्रकांत लांडगे, अजित नरोटे, सुरेश एकुंडे, विनायक पाटील, रघुनाथ झांबरे, अनंत मोरे यांनी मार्गदर्शन केले. आघाव यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. संघाचे नाशिक विभागाचे सचिव अरुण मोरे यांनी सूत्रसंचालन केले.  

शिंदे म्हणाले, द्राक्षांच्या उत्पादनावर खूप चांगलं काम शेतकऱ्यांनी आणि शास्त्रज्ञांनी केलं आहे. १५ हजार कोटींची क्षमता असणाऱ्या द्राक्ष उद्योगासाठी सुसंघटित मार्केटिंग मॉडेल उभे राहण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारी पातळीवरही धोरणात्मक निर्णय होणे आवश्‍यक आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...
नगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...
तासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली  ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...
विसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद   : येथे रविवारी (ता....
वऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला  ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर  ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...
‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर  : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...
पीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा   ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...
इंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे  : सरकारने आता तांत्रिक...
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...