agriculture news in marathi, Register for soil and water conservation works | Agrowon

मृद-जलसंधारणाच्या कामांसाठी नोंदणी करावी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

पुणे : सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नोंदणीकृत असणाऱ्या कंत्राटदारांना मृद व जलसंधारणाची कामे करण्यासाठी ई-निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यास मान्यता दिलेली आहे. मृद व जलसंधारणाची कामे करण्यासाठी मशिनधारकांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. जे. पलघडमल यांनी केले.

पुणे : सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नोंदणीकृत असणाऱ्या कंत्राटदारांना मृद व जलसंधारणाची कामे करण्यासाठी ई-निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यास मान्यता दिलेली आहे. मृद व जलसंधारणाची कामे करण्यासाठी मशिनधारकांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. जे. पलघडमल यांनी केले.

सामान्य प्रशासन विभागाच्या २६ नोव्हेबर २०१४ च्या निर्णयानुसार तीन लाखांपेक्षा अधिक रक्कमेची कामे ई-निविदाद्वारे करण्याचे आदेश आहेत. त्यानुसार मृद व जलसंधारणाची सर्व कामे ई-निविदाद्वारे करण्यात येत आहेत. ही कामे ई-निविदाद्वारे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडील नोंदणीकृत कंत्राटदार असणे अनिवार्य आहे.

तथापि मृद व जलसंधारणाची कामे छोटी-छोटी व विखुरलेल्या स्वरुपात असल्याने बऱ्याच वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नोंदणी असलेले कंत्राटदार ई-निविदा प्रक्रियेमध्ये भाग घेत नाहीत. याचा विचार करून मृद व जलसंधारण विभागाच्या परिपत्रकानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्याकडे मशिनधारकांची नोंदणी करून त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नोंदणीकृत असणाऱ्या कंत्राटदाराप्रमाणे मृद व जलसंधारणाची कामे करण्यासाठी ई-निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यास मान्यता दिलेली आहे.

मशिनधारकांनी नमूद कागदपत्रांसह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचेकडे नोदणी करावी. जिल्हा अधीक्षक अशा मशिनधारकांना नोंदणी प्रमाणपत्र देतील. अशा नोंदणीकृत मशिनधारकास फक्त सिमेंट नाला बांध व वळण बंधारा वगळून अन्य मृदा व जलसंधारण कामाच्या ई निविदेमध्ये कंत्राटदार म्हणून भाग घेता येईल.

सिमेंट नाला बांध व वळण बांधारा या उपचाराच्या ई-निविदेध्ये भाग घ्यावयाचा असल्यास मशिनधारकास सार्वजनिक बांधकाम विभागाकडील नोंदणी अनिवार्य राहील. ई-निविदेतील अटी व शर्तीनुसार काम न केल्यास नोंदणीकृत मशिनधारकास काळ्या यादीत टाकण्याचे अधिकार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना जिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेने राहतील.

पात्रता असलेल्या मशीनधारकांनी कंत्राटदार म्हणून नोंदणी करुन ई-निविदेमध्ये भाग घेण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यंत्र धारकासाठी आवश्यक पात्रता

मशिनधारक महाराष्ट्रातील रहिवासी असावा, स्वत:च्या मालकीची किंवा या प्रवर्गामध्ये असणारी तत्सम मशिनरी असावी,  पॅन कार्ड,  आधार कार्ड, राष्ट्रीयीकृत बँकेतील खाते, जीएसटी क्रमांक नोंदणी शुल्क म्हणून पाच हजार रुपयांचा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या नावे धनाकर्ष अर्जासोबत जमा करणे

नोंदणीसाठी लागणारे कागदपत्रे
- ओळखपत्र  पॅनकार्ड, आधारकार्ड  जीएसटी क्रमांक बँक खाते पुस्तक,  यंत्रांचे आर. सी. बुक  टीसीबुक, विमा पाॅलिसी  आयकर भरणा प्रमाणपत्र,  व्यवसाय कर भरणा प्रमाणपत्र व तत्सम कर भरणा प्रमाणपत्र

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...