agriculture news in marathi, Registration of 857 farmers for soyabean sale | Agrowon

सोयाबीन विक्रीसाठी ८५७ शेतकऱ्यांची नोंदणी
माणिक रासवे
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

परभणी : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडमार्फत मूग, उडीद, सोयाबीन विक्री करण्यासाठी नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ११ खरेदी केंद्रांवर गुरुवार (ता. १२) पर्यंत ८५७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

परभणी : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडमार्फत मूग, उडीद, सोयाबीन विक्री करण्यासाठी नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ११ खरेदी केंद्रांवर गुरुवार (ता. १२) पर्यंत ८५७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

सातबारावर चालू वर्षीच्या पीकपेऱ्यांच्या नोंदी अद्ययावत करण्यात न आल्यामुळे शेतकऱ्यांना नोंदणीसाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील केंद्रावर पीकपेऱ्यांची नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र असून, त्यामुळे अद्याप खरेदी सुरू झालेली नाही. दरम्यान, पुढील आठवड्यापासून सोयाबीन खरेदी केंद्रे कार्यान्वित केली जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा मार्केट अधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली.

यंदापासून आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या खरेदी केंद्रांवर मूग, उडीद, सोयाबीन, तूर विक्रीस आणण्यापूर्वी सातबारा उतारा, पेरा प्रमाणपत्र, आधार कार्ड, बॅंक पासबुक आदी कागदपत्रांसह नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. नोंदणी केल्यानंतरच संबंधित शेतकऱ्यास एसएमएसद्वारे शेतमाल खरेदी केंद्रावर घेऊन येण्यासाठी संदेश पाठविण्यात येणार आहे. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील एकूण ११ केंद्रांवर नोंदणी सुरू झाली आहे.

गुरुवार (ता. १२)पर्यंत परभणी जिल्ह्यातील परभणी केंद्रावर ६, मानवतमध्ये १० शेतकऱ्यांनी नोंदणी केली. परंतु जिंतूर, सेलू, गंगाखेड येथील केंद्रांवर नोंदणी झालेली नाही. शेतकरी फक्त नोंदणीविषयी चौकशी करत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली येथे १५०, जवळा बाजार येथे २०, वसमत येथे १५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे ३६०, बिलोली ७६, देगलूर येथे २२० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तीन जिल्ह्यांत मिळून ८५७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

दरम्यान नवीन महसूल वर्ष सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. परंतु अनेक सजांच्या तलाठ्यांनी संगणकीकृत सातबारावर २०१७-१८ च्या खरीप हंगामातील पीकपेऱ्यांच्या नोंदी केलेल्या नाहीत. हस्तलिखित पीकपेरे देण्याचे बंद केले आहे. त्यामुळे पीकपेऱ्यांची नोंदणी करता येणे अशक्य झाले आहे. त्यामुळे सोयाबीनची नोंदणी करून घेतली जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत.

पुढील आठवड्यात सोयाबीन खरेदी
खुल्या बाजारातील सोयाबीनचे दर आधारभूत किंमत दरापेक्षा कमी  झाले आहेत. त्यामुळे हमीभावाने सोयाबीनची खरेदी करण्यासाठी पुढील आठवड्यामध्ये नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सोयाबीन खरेदी केंद्रे कार्यान्वित केली जाणार आहेत. शेतकऱ्यांनी १२ टक्क्यांपेक्षा कमी असलेले एफएक्यू दर्जाचे, काडीकचराविरहित सोयाबीन या केंद्रावर विक्रीस आणावे. तत्पूर्वी संबंधित खरेदी केंद्रावर या वर्षीच्या संपूर्ण पेऱ्यांची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी रामप्रसाद दांड (नांदेड) आणि के. जे. शेवाळे (परभणी) यांनी केले आहे.

इतर बातम्या
भारताला 'बीजी थ्री’कापसाची अद्याप...भारतात बीटी कापसातील ‘बीजी टू’ हे तंत्रज्ञान...
सोलापूर विद्यापीठ उभारणार कृषी पर्यटन...सोलापूर  : सोलापूर विद्यापीठाच्या वतीने हिरज...
नाशिक जिल्ह्यातील सहा धरणे कोरडीनाशिक : जिल्ह्याला एकीकडे पावसाने हुलकावणी...
नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईग्रस्त गावांची...नाशिक : मॉन्सूनचे आगमन होऊनही नाशिक विभागातील...
कर्जमाफीचा पुन्हा बॅंकांनाच फायदा ः...सोलापूर ःशेतकऱ्यांना द्यावयाच्या कर्जमाफीचा...
कर्जमाफीच्या याद्या बॅंकेबाहेर लावापरभणी  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
सोलापूर बाजार समिती निवडणूकीत...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
मुबलक पाणी... पण् पैशाअभावी शेत नापेरजळगाव ः कर्जमाफीच्या यादीत पाच महिन्यांपूर्वी नाव...
एच. टी. तंत्रज्ञानाला मान्यता देऊन...पुणे ः राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या कापूस...
कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात आज...पुणे : राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली...
'श्रीं'ची पालखी निघाली पंढरीला...शेगाव जि. बुलडाणा ः श्री संत गजानन महाराज...
नाशिककरांना आज मिळणार जमीन समृद्ध... नाशिक ः ‘समृद्ध माती, जमीन सुपीकता आणि पीक...
सांगलीतील दुष्काळी भागात दूध संकलन घटलेसांगली : जिल्ह्यातील दुष्काळी भागात शेतीबरोबर...
माॅन्सूनची प्रगती शनिवारनंतर ?पुणे : जवळपास आठवडाभरापासून नैऋत्य मोसमी...
`एचटीबीटी` कापूस बियाण्याच्या...पुणे : बोंड अळीला प्रतिकारक म्हणून चढ्या...
पुणे विभागात ७० टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे  : मॉन्सून दाखल झाल्यानंतरही समाधानकारक...
परभणी विभागात महाबीजचे ३० हजार हेक्टरवर...परभणी : महाबीजच्या परभणी विभागांतर्गत येणाऱ्या...
मराठवाड्यातील ३२ मध्यम प्रकल्पांतील...औरंगाबाद  : मराठवाड्यातील ३२ मध्यम...
तीन जिल्ह्यांत एक लाख २० हजार हेक्टरवर... नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
रत्नागिरीत साडेसहा हजार हेक्‍टरवर भात...रत्नागिरी : समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील ६६६४...