agriculture news in marathi, Registration of farmers' e-name portal in Gram Sabha | Agrowon

ग्रामसभेतच शेतकऱ्यांची ई-नाम पोर्टलवर नोंदणी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

लातूर : राज्यात राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) ही योजना हळूहळू प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यातून जास्ती जास्त शेतकरी ई-नाम पोर्टलवर कशापद्धतीने येतील याचा प्रयत्न केला जात आहे. यातून आता प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या ग्रामसभेत ई-नामची अंमलबजावणी करणाऱ्या बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील गावांच्या ग्रामसभेत शेतकऱ्यांची ई-नामवर नोंदणी करण्यात येणार आहे.

लातूर : राज्यात राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) ही योजना हळूहळू प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यातून जास्ती जास्त शेतकरी ई-नाम पोर्टलवर कशापद्धतीने येतील याचा प्रयत्न केला जात आहे. यातून आता प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या ग्रामसभेत ई-नामची अंमलबजावणी करणाऱ्या बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील गावांच्या ग्रामसभेत शेतकऱ्यांची ई-नामवर नोंदणी करण्यात येणार आहे.

असा उपक्रम संबंधीत बाजार समितींनी राबवावा, असे आदेश पणन मंडळाने दिले आहेत. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) योजनेअंतर्गत राज्यातील ६० कृषी उत्पन्न बाजार समित्यांची दोन टप्प्यात निवड झालेली आहे. योजनेच्या कार्यप्रणालीप्रमाणे बाजार समितीमध्ये आलेल्या सर्व शेतमालाची ई-नाम पोर्टलवर गेट एन्ट्री, लॉट मॅनेजमेंट, शेतमालाची गुणवत्ता तपासणी, ई लिलाव, शेतमालाच्या वजनाची नोंद, आॅनलाईन पेमेंट, आउट गेट एन्ट्री या प्रमाणे आॅनलाइन कामकाज होत आहे. बाजार समित्यात येणारे शेतकरी प्रामुख्याने ग्रामीण भागातून येतात.

या शेतकऱ्यांना ई-नाम योजना व त्याचे फायदे माहिती होणे गरजेचे आहे. या योजनेला गती देण्यासाठी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १२ जानेवारीस बैठक घेऊन सूचनाही दिल्या आहेत. यातूनच आता प्रजासत्ताकदिनी (ता. २६) बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रातील गावात होणाऱ्या ग्रामसभेत या योजनेचा प्रचार व प्रसार करावा; तसेच गावातील सर्व शेतकऱ्यांची ई-नाम पोर्टलवर नोंदणी करावी.

याकरिता ग्रामसभेत ई-नाम डेस्क तयार करावा. या पोर्टलवर ग्रामसभेतच शेतकऱ्यांची सर्व माहिती भरून घेण्याच्या सूचना पणन मंडळाने दिल्या आहेत. तसेच या संबंधीचा अहवाल ३१ जानेवारीपर्यंत पाठवावा, असे आदेशही मंडळाने दिले आहेत.

लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीचा ई-नाममध्ये समावेश आहे. प्रजासत्ताकदिनी (ता. २६) समितीच्या कार्यक्षेत्रातील प्रमुख वीस गावात या विषयाची जागृती करून शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. यात गंगापूर, हरंगुळ (खु.), पेठ, वासनगाव, ममदापूर, चांडेश्वर, मुरुड, चिखुर्डा, मळवटी, खंडापूर, पाखरसांगवी, बाभळगाव, सेलू, बोरी, बोरवटी, भातखेडा, कव्हा, कासारखेडा, सिकंदरपूर, उरमगा या गावांचा समावेश आहे. याकरिता नियोजन करण्यात आले आहे.
- मधुकर गुंजकर, सचिव, लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समिती.

 

इतर अॅग्रो विशेष
जलदगती मार्गाने निर्जलपर्वाकडे...‘‘पाण्याची उपलब्धता कमी होत जाणे हे हवामान बदलाचे...
पुढचं पाऊलप्र बोधन आणि संघर्षाच्या माध्यमातून गेली चौदा...
नोकरशहांच्या दुर्लक्षामुळे जल...राज्यात दुष्काळग्रस्त गावे वाढत असून, जलाशयांची...
ठिबक सिंचनातील आधुनिक तंत्रज्ञान : अरुण...राज्यात लागवडीखालील २२५ लाख हेक्टर क्षेत्रांपैकी...
परंपरागत जल व्यवस्थांचा संपन्न वारसा :...परंपरागत जल व्यवस्थांमधून घेण्याजोग्या आणि आजही...
कोरडवाहूचे जल व्यवस्थापन : चिपळूणकर,...पाण्याचे व्यवस्थापन हे केवळ बागायती पिकांसाठी...
फड पद्धतीमुळे झाला कायापालट : दत्ता...फड या जल व्यवस्थापन पद्धतीचे तंत्र अगदी सोपे आहे...
समन्यायी जल व्यवस्थापनाला पर्याय नाही...लोकशाहीकरण वा पुनर्संजीवक विकास ही फुकाफुकी...
डोळ्यांत अंजन घालणारी नागलीची कहाणी :...योग्य पीकपद्धती विकसित केली नाही तर जल व्यवस्थापन...
जल व्यवस्थापनाची सप्तपदी : नागेश टेकाळेनिसर्गदेवतेने दिलेला जलरूपी प्रसाद आज आपण तिने...
जल व्यवस्थापन हाच कळीचा मुद्दा... :...पर्यावरणातील बदल, दुष्काळ, मातीचे बिघडणारे आरोग्य...
जल व्यवस्थापनासाठी हवी लोकचळवळलक्षावधी हेक्टर जमीन, हजारो टीएमसी पाणी आणि...
चैत्र यात्रेनिमित्त भाविकांनी दुमदुमला...ज्योतिबा डोंगर, जि. कोल्हापूर  : ‘...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींमुळे...
‘ॲग्रोवन'चा आज १४वा वर्धापन दिन; जल...पुणे : लाखो शेतकऱ्यांच्या कुटुंबातील घटक बनलेल्या...
यंदा बीटी कापूस बियाणे मुबलक : कृषी...पुणे : राज्याच्या कापूस उत्पादक भागातील...
फलोत्पादन अनुदान अर्जासाठी शेवटचे चार...पुणे : एकात्मिक फलोत्पादन अभियानातून (एमआयडीएच)...
वीज पडून जाणारे जीव वाचवामागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर...
जल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणीजलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...