नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम
बातम्या
जळगाव : मूग व उडदाची शासकीय खरेदी करण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली असून, गुरुवारपासून (ता. २७) ९ ऑक्टोबरपर्यंत खरेदीसंबंधीची नोंदणी पाचोरा, जळगाव व अमळनेर येथे होईल. सोयाबीन खरेदीसंबंधीची नोंदणी १ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
जळगाव : मूग व उडदाची शासकीय खरेदी करण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली असून, गुरुवारपासून (ता. २७) ९ ऑक्टोबरपर्यंत खरेदीसंबंधीची नोंदणी पाचोरा, जळगाव व अमळनेर येथे होईल. सोयाबीन खरेदीसंबंधीची नोंदणी १ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
मुगाची ६९७५ रुपये प्रतिक्विंटल या दरात, तर उडदाची ५६०० आणि सोयाबीनची ३३९९ रुपये प्रतिक्विंटल या दरात खरेदी केली जाईल. खरेदी लक्ष्यांक किती, या संदर्भात अजून स्पष्ट झालेले नाही. शासकीय खरेदी केंद्रात उडीद व मुगाची विक्री करण्यासाठी नोंदणी बंधनकारक आहे. त्यासाठी आधार क्रमांक, सातबारा (मूग, उडीद यांची नोंद असलेला) व बॅंक खाते क्रमांक द्यावा लागेल. आधार संलग्न असलेल्या बॅंक खात्यावर उडीद व मुगाचे चुकारे अदा केले जातील.
खरेदीसाठी सबएजंट म्हणून जळगाव येथे कृषी औद्योगिक सहकारी संस्था, पाचोरा येथे भडगाव शेतकरी सहकारी संघ व अमळनेरातही शेतकरी संघाची नियुक्ती केली आहे. शेतकऱ्यांना नोंदणीसाठी जळगाव येथे कृषी औद्योगिक सहकारी संस्थेच्या विसनजीनगरातील कार्यालयात संपर्क करावा लागेल. तर पाचोरा येथे शेतकी संघाच्या बाजार समितीच्या कार्यालयात आणि अमळनेर येथे अमळनेर शेतकरी संघाच्या कार्यालयात नोंदणी करता येईल.
सोयाबीनसंबंधीची नोंदणी ३१ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील, अशी माहिती मार्केटिंग फेडरेशनचे पणन अधिकारी परिमल साळुंखे यांनी दिली. मूग व उडदाच्या विक्रीसंबंधीच्या नोंदणीसाठी केवळ १४ दिवस मिळणार असल्याने सर्वच शेतकऱ्यांची नोंदणी शक्य नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
खरेदी १० ऑक्टोबरपासून शक्य
मूग व उडदाची खरेदी १० ऑक्टोबरपासून पाचोरा, जळगाव व अमळनेर येथील बाजार समित्यांमध्ये सुरू होईल. पाचोरा बाजार समितीतील भडगाव शेतकी संघाच्या कार्यालयात व अडत दुकानात खरेदी होईल. अमळनेर शेतकी संघाची खरेदीही अमळनेर बाजार समितीमध्ये होईल. जळगाव येथील कृषी औद्योगिक सहकारी संस्थेची खरेदी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील संस्थेच्या गोदाम व कार्यालयात केली जाईल. सोयाबीनची खरेदी मात्र नोव्हेंबरमध्ये सुरू होईल, असे संकेत मिळत आहेत.
- 1 of 565
- ››