agriculture news in marathi, Registration of pulse purchase Decline in Farmer's Union | Agrowon

कडधान्य खरेदीच्या नोंदणीस शेतकरी संघात नकार
टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 जानेवारी 2018

जळगाव : केंद्र शासनाने शासकीय उडीद व मुगाच्या खरेदीला १२ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिल्यानंतर शेतकरी, धान्य विक्रीसंबंधी नोंदणीसाठी शेतकरी संघात गेले असता, त्यांना नोंदणी न करता कर्मचाऱ्यांनी उर्मटपणा करून परत पाठविले. हा प्रकार शेतकरी संघात आसोदे (ता. जळगाव) येथील एका शेतकऱ्याबाबत घडला असून, या शेतकऱ्याने आपल्याबाबत घडलेल्या प्रकाराची माहिती ॲग्रोवनला दिली.

जळगाव : केंद्र शासनाने शासकीय उडीद व मुगाच्या खरेदीला १२ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिल्यानंतर शेतकरी, धान्य विक्रीसंबंधी नोंदणीसाठी शेतकरी संघात गेले असता, त्यांना नोंदणी न करता कर्मचाऱ्यांनी उर्मटपणा करून परत पाठविले. हा प्रकार शेतकरी संघात आसोदे (ता. जळगाव) येथील एका शेतकऱ्याबाबत घडला असून, या शेतकऱ्याने आपल्याबाबत घडलेल्या प्रकाराची माहिती ॲग्रोवनला दिली.

यातच उडीद व मुगाच्या खरेदीला शासनाने मुदतवाढ दिल्याचे सांगितले जात असले तरी अजून नोंदणीसंबंधी मार्केटिंग फेडरेशनला कोणतेही आदेश नसल्याचेही समोर आले आहे. आसोदे येथील सचिन चौधरी यांचा ४० गोण्या उडीद विकायचा राहिला आहे. सध्या बाजार समितीत ४८०० रुपयांवर दर नाहीत. अधिक दर सांगितले जात असले तरी अडतदार एवढे दर मिळू देत नाहीत. यातच केंद्र शासनाने उडीद व मुगाच्या शासकीय खरेदीसंबंधी मुदतवाढ दिली.

शासकीय खरेदी केंद्रात पाच हजार ४०० दर होते. यामुळे सचिन चौधरी हे जळगाव तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री संघात उडीद विक्रीबाबतच्या नोंदणीसाठी गेले. या केंद्रात नोंदणी करून घेण्यासाठी चौधरी यांनी संबंधित कर्मचाऱ्यास सांगितले. परंतु संबंधित कर्मचाऱ्याने कुठलीही शासकीय उडीद खरेदी सुरू नाही. आम्हाला सूचना नाहीत, ज्यांनी शासकीय उडीद खरेदीला मुदतवाढ दिल्याचे तुम्हाला सांगितले त्यांच्याकडे जा, असे संबंधित कर्मचाऱ्याने उर्मटपणे सांगितले. यामुळे आपण हताश होऊन शेतकरी संघातून परतलो, असे चौधरी म्हणाले.

आम्हाला अजून उडीद व मूग खरेदीच्या नोंदणीचे आदेश नाहीत, त्यामुळे नोंदणी सुरू नाही. परंतु ज्यांनी मुदतीत नोंदणी केली होती. त्यांचा उडीद आम्ही खरेदीची मुदत संपल्यानंतरही खरेदी केला. शासनाच्या आदेशानंतरच नोंदणी करता येईल.
- परिमल साळुंखे,
पणन अधिकारी, मार्केटिंग फेडरेशन

खरेदीला मुदतवाढीचे वृत्त शासनाने जारी केले, मग खरेदीसाठी नोंदणीही सुरू करायला हवी. शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा व त्यांच्या अडवणुकीला प्रोत्साहन देण्याचा प्रकारच शासन करीत आहे.
- सचिन चौधरी,
तक्रारदार शेतकरी, आसोदे (जि. जळगाव)

इतर बातम्या
रसायन विरहित फायद्याची शेती शक्य भारतात आज नेमकी सेंद्रिय व नैसर्गिक शेती...
राज्यातील जमिनीत जस्त, लोह, गंधक,...डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृद...
केवळ जमीन आरोग्यपत्रिकेचा उपयोग नाही :...परभणी :जमीन आरोग्यपत्रिकेतील शिफारशीनुसार...
विदर्भात किमान तापमानात सरासरीच्या...पुणे : विदर्भाच्या काही भागांत थंडीत वाढ झाली आहे...
सेंद्रिय कर्बवाढीला धोरणात्मक रूप...राज्यातील शेतकरीवर्गाच्या उत्पन्नवाढीचा...
जमीन सुपीकतेसाठी गावनिहाय कार्यक्रम हवा...देशात हरितक्रांती अत्यावश्यक होती. मात्र, ...
निर्यातक्षम मोसंबीसाठी एकच बहर घ्यावा...जालना :  निर्यातक्षम मोसंबी उत्पादनासाठी...
सावधान, सुपीकता घटते आहे... पुणे : महाराष्ट्रातील भूभागाचे मोठ्या...
अॅग्रोवनच्या कृषी प्रदर्शनाला जालन्यात...जालना : सर्वांची उत्सुकता लागून असलेल्या सकाळ-...
सुबोध सावजींचा विहिरीतच मुक्कामअकोला ः पाणीपुरवठा योजनांच्या कामात मोठ्या...
साखर दरप्रश्नी सरकारने हस्तक्षेप करावा...लातूर ः केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना...
धोरणकर्त्यांना शेतमाल उत्पादकांपेक्षा...बारामती, जि. पुणे : देशातील धोरणकर्त्यांना शेतमाल...
जैवइंधन, जैवखते, ठिबक उपकरणांच्या...२९ वस्तू आणि ५३ सेवांच्या जीएसटी दरामध्ये कपात...
माफसू : मुलाखतीपासून उमेदवार वंचितनागपूर : महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान...
कारखाने, ऊस उत्पादकांचे नुकसान...नवी दिल्ली : साखरेच्या घाऊक दरात घसरण होऊनही...
इंडोनेशिया, चीनला द्राक्ष निर्यातीत...नाशिक : रशिया, चीन, इंडोनेशिया अशा काही देशांनी...
किमान तापमानाचा पारा वाढू लागलापुणे : दक्षिण कर्नाटकाच्या परिसरात चक्राकार...
कृषी संजीवनी प्रकल्पाची मंजुरी अंतिम...मुंबई : दुष्काळापासून शेतीचे संरक्षण आणि खारपाण...
प्रतीक्षा संपली... आजपासून जालन्यात ॲ...जालना : सर्वांना उत्सुकता लागून असेलल्या सकाळ -ॲ...
शासकीय कृषी महाविद्यालय सुरू करण्याबाबत...अकोला : शासनाने जाहीर केलेल्या कृषी...